छत्रपती शाहू महाराज यांचे स्त्री विषयक धोरण –
छत्रपती शाहू महाराज यांचे स्त्री विषयक धोरण पाहताना आपल्याला एक पत्र पाहायला मिळते ते पुढीलप्रमाणे.
छत्रपती थोरले शाहू रोजीनिशी
पत्र. क्र. १८९
इ. स १७३५-३६
सित सलीसाम माय व अलफ मोहरम
अजम अबुदूल्ला खान याची कन्या सुरतेहून औरंगाबादेस येत होती त्यासी मागीऀ येतां नवापूरानजीक राजश्री बाबूराव दाभाडे सेनाखासखेल यांची अटकावून ठेविली म्हणून हुजूर विदेत झाले. तरी नवाबाचा स्वामीचा स्नेह, अबदुल्लाखाल त्याचे दिवाण, त्याची कन्या अटकवावी हे गोष्टी कायाऀची नव्हे. प्रस्तुत नवाबानी व राजश्री पंत सुमंत यांणी व खान मरशारनिल्हे नी कित्येक विषय लिहीले त्यावरून आज्ञपत्र सादट केले असे. तरी तुझी बाबूरायास ताकीद करुन कन्यासमेत भार बारदारी वस्तभाव देखील निरोप देऊन शहरास सुखरुप पोहोचवणे. स्वामीच्या स्नेहास अंतर होई गोष्ट न करणे ,याउपरी धडीचा विलंब न लावताच निरोप देवणे :त्याची वस्तभाव पावालियाची रसीद घेऊन हुजूर पाठविणे या कामास कमाजी भाकरे व जिवनराव कदम दिमंत पाठविले आहे
पत्रातील आशय :-
सदर पत्र हे छत्रपती थोरले शाहू महाराजांनी सेनापती उमाबाई दाभाडे यांनी लिहिले आहे. सुरतचा नवाब व मराठ्यांच वैर सर्वश्रुत आहे पण सदर नवाब हा छत्रपती संभाजी महाराज यांचे सुपुत्र व मराठा साम्राज्याचे विस्तारक छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवून होता.
परंतु नवाबाचा दिवाण अबुदल्लाखान हा सुरतहुन औरंगाबादकडे जात असताना सेनाखासखेल सवाई राजश्री बाबूराव दाभाडे यांनी नाबाबाचे दिवाण व त्यांची कन्येस शत्रू म्हणून अटक केली ही घटना नबाबस समजताच त्याने छत्रपती शाहू महाराजांनी कडे दिवाणच्या कन्येला अटक केले म्हणून कांगावा केला यामुळे छत्रपती शाहू महाराजांनी सेनापती उमाबाईसाहेब दाभाडे यास पत्र लिहून नवाब व आपल्या मैत्रीचा उजाळा दिला. मराठ्यांनी शत्रूच्या कुटुंब कबिल्यास अटकव करू नये आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिकवण नुसार सोडून देण्यासाठी सागितले.
यावेळेस सेनापती उमाबाई या तळेगाव दाभाडे येथे होत्या सदर बाब लक्षात येताच “स्त्री हे मराठ्यांच्या देवाघरातील दैवत आहे मग तो कोणत्याही जाती धर्माचा व पंथाचा अथवा शत्रूच्या घरातील असो “.
हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धोरणानुसार दिवाण व त्याची कन्या यांची सुटका सेनापती उमाबाईसाहेब यांनी केली.
राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्त्री विषयक धोरण पुढे छत्रपती थोरले शाहू महाराजांनी सुरु ठेवले व सेनापती उमाबाईसाहेब या तत्कालीन कालखंडात गुजरात परिसरात नव्हत्या म्हणून सदर अबदुल्लाखानाच्या कन्याशी आपल्या वडिलांच्या सोबत अटक करण्यात आल्या हे वरील पत्रातून स्पष्टपणे नमूद केले आहे.
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य पुणे तर्फे मराठ्यांच्या इतिहासातील पहिला महिला सेनापती एक स्त्री कडे अर्थात उमाबाईसाहेब दाभाडे कडे देणारे छत्रपती थोरले शाहू महाराज व महिला सेनापती उमाबाईसाहेब दाभाडे यास विन्रम अभिवादन.
संतोष झिपरे