महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,00,102

सावधान छत्रपती शिवाजी महाराज नाहीसे होत आहेत..

Views: 2888
4 Min Read

सावधान छत्रपती शिवाजी महाराज नाहीसे होत आहेत..

शिर्षक वाचून थोडस चमकल्यागत होईल खरंच छत्रपती शिवाजी महाराज आपल्यातून नाहीसे होत चाललेत की आपणच हळूहळू त्यांना नाहीसं करत चाललोय.?

पाश्चात्य जीवनशैलीच आंधऴ्या प्रमाणे अनुकरण करता करता येणारी पिढी आपल्या जीवन मुल्यांपासून कधी भरकटली तेच समजलं नाही चकचकीत वाटणाऱ्याला सोन समजत चाललो आणि जे दैदीप्यमान,तेजपुंज आहे तेच विसरत चाललो….

छत्रपती शिवाजी महाराज लहानांपासून ते वृद्धांपर्यंत आपल्या आदर्श जगण्याने सर्वांसाठी दीपस्तंभ’ बनलेले अवलिया म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज….

जगावं कसं मूल्य जपावीत कशी हे शिकवणारे आद्यशिक्षक’ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज….

स्वाभिमान आणि शौर्याचा ‘मुर्तिमंत पुतऴा’ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज….

रांझ्याच्या पाटलाचे हात तोडून आणि कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला आई संबोधून सोडून देऊन अखंड स्त्री जातीला बहीण आणि मातेसमान मानण्याचा आदर्श घालून देणारा चारित्र्यवान राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज….

आभाळ कोसळलं तरी डगमगून न जाता धैर्याने उभं रहायला शिकवणारे ‘ऊर्जास्रोत’ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज…

रयतेच्या गवताच्या काडीलाही हात लावाल तर याद राखा अस आपल्या सैन्याला निक्षून सांगणारे आणि प्रजेवर जीव ओवाळून टाकणारे राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज….

पण दुर्दैवाने ते आपल्यातून हरवत चाललेत..

जगण्याचा प्रत्येक पैलुत हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास आणि आवड निर्माण केली तर पुढच्या पिढ्यांना आत्मसात होईल पण नाही आम्हाला फक्त आंधळेपणाने पाश्चात्य जीवन,शिक्षण स्विकारायचंय ज्यात माणूस म्हणून जगण्यासाठी लागणारी तत्व कुठंच नाहीत आहेत आहे ती फक्त स्वार्थ चंगऴवादाची रेलचेल….

सावधान छत्रपती शिवाजी महाराज नाहीसे होत आहेत..

बऱ्याचदा आपण कोणाचे अनुकरण करतोय हेच आपल्याला समजत नाही आणि म्हणूनच आपली पिढी सशक्त बनत नाहीये…..

छोट्या छोट्या कारणावरुन आत्महत्येमुळं कितीतरी कोवळी मुले मरतायत व्यसनाधीनतेच वय हऴूहळू १४-१५ वर्षापर्यंत येतय….

बलात्कार आणि अत्याचार करणार्‍यात अल्पवयीन गुन्हेगार वाढतायत का होतय हे सगळं? केला कधी मुळाशी जाऊन विचार?

करा कधीतरी विचार मग समजेल हे सगळ घडतंय ते छत्रपती शिवाजी महाराज आमच्यातून नाहीसे होत असल्यामुळे कारण छत्रपती शिवाजी महाराज ही व्यक्ती नसून ती एक जीवनपद्धती आहे ज्यातून संस्कार आणि जीवनमूल्य जपण्याची शिकवण मिळते….

पण य़ा मिथ्या पाश्चातिकरणामुळे आपण या जीवनपद्धतीलाच तिलांजली दिलीय शरम वाटायला हवी…

जाॅनी जाॅनी एस पप्पा म्हणणाऱ्या ३-४ वर्षाच्या लेकराच आपल्याला खुप कौतुक वाटत पण ज्या वयात व्यक्तीमत्वाची जडणघडण होण्यासाठी शिवरायांसारखी व्यक्तिमत्व त्यांच्या मनात रुजवली पाहिजेत

त्या काळात हा काल्पनिक जाॅनी, काल्पनिक पप्पा आणि काल्पनिक शुगर आपण त्यांच्या मनात घोळत ठेवतो ज्या वयात मन आणि मनगट बऴकट होण्यासाठी शिवरायांचे किल्ले आणि शिवरायांच चरित्र त्यांच्या हातात पडायला पाहीजे….

त्याकाळात व्हीडीओ गेम्स ,कार्टुन आणि मोबाईल त्यांच्या हातात देत आहोत
आणि आपणच हळू हळू छत्रपती शिवाजी महाराज नाहीसे करीत अाहोत…..

पण हे थांबल पाहीजे य़ेणारा काळ हा संघर्षाचा असणार आहे स्पर्धेचा असणार आहे सायन्स इतकं पुढं जाईल की अन्नधान्य आणि सुखसोईंची रेलचेल असेल…..

पण सायन्स कितीही पुढ गेले तरी मानवी मुल्य ही पिकवता येणार नाहीत किंवा त्यासाठी कोणतीही मशीन बनवता येणार नाही त्यासाठी आपल्याला इतिहास आणि शिवरायच य़ेणाऱ्या पिढ्यांमध्ये रुजवावे लागेल कारण जे लोक इतिहास विसरतात ते कधीच इतिहास घडवू शकत नाहीत…

सरते शेवटी एकच आवाहन माॅडर्न बना, नवे तंत्र, नवी जीवनपद्धती अवगत करा,जगाच्या स्पर्धेत टीकण्यासाठी संघर्षही करा….

पण हे सर्व करत असतांना छत्रपती शिवाजी महाराजांसारखा जो तेजस्वी वारसाआपल्याला लाभलाय तो विसरु नका आणि पुढच्या पिढ्यांनाही विसरु देऊ नका…

मनामनातील, नसानसातील छत्रपती शिवाजी महाराज नाहीसे होऊ देऊ नका….

छत्रपती शिवाजी महाराज की जय…

लेखक अनामिक

Leave a Comment