?!! छत्रपतींचा तिसरा डोळा !!?
कदाचीत आपन बहुरूपी हा शब्द व त्यांच कार्य विसरला असाल. कारण आपना सर्वांना सवयच आहे, ऊपकार विसरायची….. तो ही अगदि प्रामानीक पणे विसरतो. त्यातीलच हा एक शब्द “बहुरूपी” विसरलोत आपन, अहो याच बहुरूपींच्या मुळे आपन जगतोय. यापन जे आज सुखात नांत आहोत, ना त्याला कारनीभुत हेच बहुरूपी आहेत. तुम्ही विसरलात त्याना.
छञपती शिवरायांनी जे हिंदवी स्वरांज्य ऊभ केल, ना त्या स्वरांज्याचा एक प्रमुख स्थंभ आहे गुप्तहेर खाते. व मला अतिषय आनंद होतो, स्वरांज्याच्या गुप्तहेर खात्याच्या प्रमुखांचे नाव सांगताना. तो रनमर्द, महा पराक्रमी, नितीमंत, मुर्तीमंत, प्रामानिम, जशी तेज तळपती तलवार, सुर्यासारखा तेजस्वी, चंद्रासारखा शीतल, शिवरायांचा प्रामाणिक मावळा, हिंदवी स्वरांज्याचा शिलेदार नाव तयाचे बहिर्जी नाईक.
अहो भगवत गीतेत लीहल आहे… की कोनीही मणुष्य सर्व गुणसंप्पन नसतो. ते माझ्या शिवरायांनी… माझ्या शिवबाराज्यांनी साक्षात काहीस खोट करून दाखवलय. बहीर्जी नाईक यांच्या बाबतीत. बहुरूपी बहीर्जी नाईक……… अहो जो साधा एक बहुरूपी होता, सोंगाड़्या होता, जो गावो गावी भटकत होता. व लोकांना सोंगे करून दाखवने, वेगवेगळी रूप घेण….. व त्या मांध्यमातुन लोक जे देतील तेच घेण व त्यावरच आपला उदरनिर्वाह करणे. हाच रोजगार धंदा होता. अश्याच एका विलक्षण बुद्धी चातुर्य असनार्या बहुरूप्याला शिवरायांनी माएन जवळ केल. व हिंदवी स्वरांज्याच्या खुप्तहेर खात्याचे प्रमुख बहनले. तोच बहुरूपी व तेच बहुरूपी आले एकञ लागले शिवरायांच्या खांद्याला खांदा भीड़ऊन हिंदवी स्वरांज्याचे स्वप्न साकारायला. अहो तेव्हा तेच बहुरूपी होते म्हणुन शञुच्या छावनीत साध पान ही हालल तर ती खबर शिवरायांच्या पर्यत पोचत होती.
शञुच्याच्या सर्व चालीची खबर, बातमी ही शिवरायांच्या पर्यत हेच बहरूपी पोचवत होते. त्यात मग वासुदेव, पींगळाजोशी अशी बहुरूपे घेनारी मंड़ळी स्वताच तन मन अगदि धन ही अर्पन करून स्वरांज्याची सेवा करत होते.अहो बहुरूनी बहिर्जी नाईक हे महीना महीना काहीही न खाता झाड़ाच्या ढोलीत दबा धरून बसत असत. शञुच्या सर्व हालचालीवर करड़ी नजर देत. जोक नाही महीना भर एका जागेवर बसने, ते ही न खाता, पीता विचार करणे ही अवघड़ आहे.
छत्रपतींचा तिसरा डोळा
अहो जेव्हा शिवराय छञपती जाहले, किल्ले रायगड़ावर रांज्याअभीषेक सोहळा पार पड़त असताना, सर्व मावळे, शिलेदार, शेनापती, सरशेनापती हे गड़ावर आपल्या शिवबाराज्यांला छञपती होत असताना पाहत होते. आपली ओळख, आपले कार्य, आपली स्वामीनिष्ठा स्पष्ठ पणे दिसत असताना मुक्त पणे पाहत होते. पण त्यामधे एक व्यक्ती अशी होती जी आपली ओळख लपऊन, आपले कार्य करत होते. जेव्हा रांज्याअभीषेक सोहळा सपंन्न झाला, तेव्हा शिवराय सर्व रयतेला दान धर्म करत होते. तेव्हा एक बहाद्दर, रणमर्द____ बहुरूपी बहीर्जी नाईक हा सर्व सामांन्य रयतेच्या रांगेत आपल्या राज्याच्या हातुन दान स्वीकारत होते. अरे का……. का, कश्यासाठी एवड़ा त्याग, कसली ही असली स्वामीनिष्ठा. कसली ही असली गुप्तता_____ अरे पन का…..काय गरज होती हा सर्व उपद्याप करण्याची, अरे का…….. जेव्हा आपल्या कार्याची, आपल्या स्वामीनिष्ठेची व्हा व्हा होत असताना…… मान, मराबत मीळवत तोर्यात फीरण्यापेक्षा….. फाटकी वस्ञ अंगावर परीधान करून आपल्या शिवबाराज्यांच्या रक्षणासाठी, आपल्या छञपतींच्या रक्षणासाठी तोच बहुरूपी बहीर्जी नाईक झटत होता.
छत्रपतींचा तिसरा डोळा
का तर हिंदवी स्वरांज्याच्या पहिल्या छञपतींवर दगा फटका होऊ नए, अथवा कोनी करू नए म्हणुन हा बहुरुपी बहीर्जी नाईक व त्यांचे गुप्तहेर खाते आपल्या स्वामीनिष्ठेशी एकनिष्ठ होऊन काम करत होते. जेव्हा सर्व सामांन्य रयतेच्या रांगेतुन बहुरूपी बहीर्जी नाईक शिवरायांच्या समोर आले तेव्हा शिवरायांच्या ड़ोळ्यातुन अलगद अश्रु ओगळले, त्यातील एक थेब बहीर्जींच्या पसरलेल्या झोळीत पड़ला……. तो थेंब विचारत होता अरे बहीर्जी का…. कशासाठी एवढा मोठा त्याग करतोयस. अरे बहुरूपी बहीर्जी काय केल आहे मी तुझ्यासाठी. तुला सदैव रानोमाळ ऊपाशी पोटि भटकवत राहीलो. अरे बहीर्जी कश्यासाठी एवढ करतोयस तु माझ्यासाठी. तेव्हा बहुरूपी बहीर्जीची नजर छञपती शिवरायांना बोलते…..
राज म्या एक बहरूपी, सोंगाड़्या मी लोकाना हसवायचो करमणुक करायचो व माझ पोट भरायचो. राज….. तुम्ही या बहुरूप्याला माएन जवळ केल अन हे सार हिंदवी स्वरांज्य माझ्या पदरात टाकलत…… सर्वात मोठी जबाबदारी, सर्वात महत्वाच कार्य तुम्ही माझ्या पदरात टाकलत. या पेक्षा मोठ माझ्यासाठी काय असु शकत….. धंन्य झाल हे जिवन, सार्थक जाल हे जिवन जे शिवरायांच्या, माझ्या शिवबाराज्यांच्या शेवेत अर्पन केल. असी बहीर्जींची नजर बोलुन…. ते बहीर्जी सर्व सामांन्य रयतेत सामाऊन गेले…._______
छत्रपतींचा तिसरा डोळा
त्या काळी दारात बारा बैती व बहुरूपी पैकी कोनीही आल तरी त्याला शेर दोन सेर, पायली,आरशेड़ी, दोन पायल्या धांन्य घालत होते. गुळाच्या ढेपाच्या ढेपा त्याना देत होते. भुकाल्याला असेल तर त्याला भाजी भाकरी खायला देत असत. व जाताना अखदि आग्रहाने दोन भाकरी भाजी कींवा चटनी बांधुन देत_____ का तर त्याचे बायका पोर ऊपाशी असतील. ते वाट पाहत असतील, हे घेऊन जा व त्याना जेवायला दे. पहाटे पींगळा यायचा, वासुदेव यायचा तेव्हा आमची आजी आम्हाला ऊठवायची ऊठा बाळानो वासुदेव आलाय, पींगळाजोशी आलाय…… त्यांच्या पाया पड़ाय ऊठा, व ही घ्या ज्वारी त्याना द्या. आम्हीही मोठ्या आनंदाने सर्व भावंड़े ऊठायचो, व त्यांच्या पाया पड़ुन त्याना झोळीत धांन्य देऊन घरात जायचो.
आता समाज बदलला आहे. लोकांच्या घरी टेव्ही, फ्रीज, मोटार गाड़्या आल्या. आता बहुरूपी दारात आला तर त्याला भीकारी समुजुन दारातुन हाकलुन देता. लाज कशी वाटत नाही, विसरलात का ईतिहास, विसरलात हिंदु संस्कृती. अहो त्या बहुरूप्याला पाणि विचारायच सोड़ाच ओ पण ड़ुंकुन ही तुम्ही पाहत नाही. बहुरूपी दारात आला तर आई आपल्या मुलाला सांगते बाळा त्याला बोल की आई घरात नाही, ती बाहेर गेली. बाप पोराला बोलतो की बोल त्याला बाबा रानात गेलेत. घरी कोन नाही मी एकटाच आहे. जर लहान मुल घरी नसतील तर दरवाजा बंद करून घेतो. हिच का ओ तुमची नैतीकता, हिच का मानुसकी. त्या बहुरूप्याचा पोरगा आता मोठा झाला आहे. आता तो बहुरूपी एत नाही, दारो दारी मागायला.
छत्रपतींचा तिसरा डोळा
आता त्याचा पोर एतो…. त्याचा बाप त्याला सांगत असतो, की पोरा गावचा पाटिल लय देव मानुस. तो मला दर वेळी गुळाची ढेप देत होता. कधी गव्हाच पोत, कधी जोंधळ्याच पोत. गावातल नाना ते ही लय भारी मानुस, तात्या, भाव, आप्पा, ही सारी माणस लय भारी. आर पोरा त्या त्या भानुतात्याची आई हीराबाई ती तर मला घरात बसवुन अगदि आग्रहाने जेवायला द्यायची. आर पोरा मी दिवाळीत तुम्हाला लाड़ु, कानावले, शंकरपाळी, कापनी आनत होतो ड़ब च्या ड़ब भरून ते ड़ब मला गणेशवाड़ीतल्या जाधवीन मावशी, भानुतात्यांची आई हीराबाई, बापुनानी, या द्यायच्या रे… पण आता त्या बहुरूप्याचा मुलगा त्याच गावात जातो तर त्याला जे त्याच्या वड़ीलांनी सांगीतल ते नाही पहायला मीळत. पहालया मीळत तर काय मोठ मोठी घरे, गाड़्या व मी गेलो तर लोक मला भिकारी बोलुन हाकलुन देतात. पाणि विचारन तर सोड़ाच. जर कोनी काय दिले तर पसाभर ज्वारी, राञीची शिळी भाकरी, चटनी कोन देत नाही, तर चटनीचा बुकना, बुकटा देतात…..
ही आहे आजच्या समाज्याची परस्थीती. हा आहे आजचा समाज. खुप वाईट वाटते मला हे सार पाहुन. आपन आपली संस्कृती विसरत चाललो आहोत. आपली समाज बांधीलकी विसरत चाललो आहोत. आपल्याला लाजा का वाटत नाही अस वागताना. अरे का… वागता अस तुम्ही. का अस देश बुड़व्यांच्या सारखे वागु लागलात. काय पाप केल त्यानी, गरीब आहेत हे पाप केल, की हिंदवी स्वरांज निर्माण करायसाठी त्यांचे वंशज, पुर्वज शिवरायांच्या बर अहो राञ झटले. हे पाप केल का त्यानी, म्हणुन तुम्ही अस वागताय त्यांईच्या सोबत. जनाची नाहितर मनाची लाज वाटुद्या…. व हे वागण सोड़ा, समाजाची बांधीलकी जोपासा.
मी जर काही कमी जास्त बोललो असेल तर उदार अत्तकरनाने माप करावे.