चिलानम –
चिलानम हे असिपुत्रीका प्रकारात मोडणारे लहान शस्त्र आहे. चिलानम हे विजयनगर येथील दक्षिणी हिंदुपध्दतीचे शस्त्र आहे. अखंड पोलादा पासून बनवलेले शस्त्र हे पात्याच्या वरच्या भागात दिन्ही बाजूला दोन पाना प्रमाणे व मध्ये कळी सारखा आकार असून मुठ ही इंग्रजी X च्या आकाराची वैशिष्ठपुर्ण आहे. अतिशय पुरातन शस्त्र असून दक्षिणेकडील मंदिरांवर चित्रांवर शिल्पांवर हे शस्त्र पाहायला मिळते. विशेषकरून तामिळनाडू मधील हनुमानाच्या कमरेला बिचवा व चिलानम हे शस्त्र दिसते.
मराठ्यांच्या दक्षिणेकडील लढाईत मराठे हे आडहत्याराने लढत. ( आड हत्यार म्हणजे हातात मिळेल ते शस्त्र )
चिलानम चे पात हे s आकाराचे असून दुधारी असते. याची मुठ सुध्दा अखंड पोलादात बनलेली असते. महाराष्ट्रात पण काही लोक चिलानम बाळगीत असत. हातघाईच्या लढाईत हे शस्त्र वापरतात. याच्या पात्याच्या s आकारामुळे लहान पात्यात मोठी जखम होते.
The chilanum has a double edged , recurved blade .generally with two or more grooves. the hilt is beautifuly designed with a wide forked pommel topped by a button and the quillons are of similar shape.
संतोष चंदने, चिंचवड, पुणे.