चिमण्या गणपती मंदिर, पुणे –
सुजाता मस्तानी कडून महाराणा प्रताप बागेकडे जाताना पहिलाच चौक लागतो तो म्हणजे चिमण्या गणपती चौक. पूर्वीच्या काळी इथे गणपती पुढील तांदूळ टिपण्यासाठी खूप साऱ्या चिमण्या येत असत म्हणून या गणपतीचे नाव चिमण्या गणपती पडले अशी आख्यायिका आहे. चौकात समोरच गणपतीचे छोटेसे मंदिर आहे.
७ मार्च १९१९ रोजी श्री.ग.वि.पटवर्धन यांनी श्री.द्रविड यांच्याकडून हे मंदिर आणि आसपासचा परिसर विकत घेतला. गणपतीची मूर्ती सुमारे ३ फुट उंचीची असून शेंदुर लेपन केलेली आहे. मूर्तीची सोंड उजवीकडे वळलेली असून कान खांद्यावर स्थिरावलेले आहेत. मूर्तीच्या कपाळावर ओंकार कोरलेला असून अंगचाच मुकुट आहे. मूर्तीच्या मागे सुंदर प्रभावळ आहे. चिमण्यागणपती मंडळ गणेशोत्सवामध्ये केल्या जाणाऱ्या लाइटिंग सजावटीसाठी प्रसिद्ध आहे.
संदर्भ:
पुणे शहरातील मंदिर – डॉ. शां.ग. महाजन
पत्ता :
https://goo.gl/maps/icDU5nyXpMj5nZeVA