महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,32,959

चोर विहीर, मंगरुळ पिर, जि.वाशिम

By Discover Maharashtra Views: 2426 1 Min Read

चोर विहीर, मंगरुळ पिर, जि.वाशिम –

यादव काळानंतर महाराष्ट्रात (बेरार) बारवांच्या ऐवजी एक नवीन प्रकारच्या  शैलीचे पायविहीरी ,कुपेगार इ. स्थापत्य लोकप्रिय झाले.ही चोर विहीर ४००वर्षे जुनी आहे किंवा शाहजहाँच्या काळात बांधली गेली असे स्थानिक लोक सांगतात. पण येथे शहजादा मुराद (अकबर पुत्र) चा संदर्भ असावा कारण या परिसरापासुन बाळापूर जवळच आहे आणि स्थानिकाच्या सांगण्यानुसार ‘मुराद’चा एकमेव असलेला फार्सी शिलालेख ही येथे कोरलेला आहे.

मधल्या काळात चोर विसावा घेत असतील म्हणून चोर विहीर पण तसं नव्हे विहीरीत लपण्यासाठी चोरवाटा आहेत. चोरविहीर चे वैशिष्ट्ये म्हणजे जमिनीच्या समांतर असलेली वरवर अर्धे वर्तुळाकार दिसणारी विहिर आतल्या बाजूला चौरस आकाराचे बांधकाम आहे. एका बाजुस मोटेचा धक्का /दगडी प्रणाल बांधला आहे.

विहिरीला दगडी प्रवेशद्वार असून खाली तळमजल्यावर जाण्यासाठी छोट्या आखूड पायर्यां आहेत. पायरीलगत प्रशस्त सज्जा (बाल्कनी ) मजल्यावर आहे. पावसाच्या पाण्याकरीताही विहीरीत आगम  मार्ग काढलेले आहेत. विहीरीच्या आतील भिंतीला चुन्याच्या कमानी आहेत. कुंडात ऊतरण्यासाठी किंवा तळापर्यंत तोडशिला आहेत आणि वरच्या बाजूस दोन दगडी सोंड /कठडे मोटेकरीता बसवले आहेत.

जलव्यवस्थापनाची या वैशिष्ट्यपूर्ण परंपरा जनकल्याण करीता मोठ्या परिश्रमाने, बुध्दीमतेने,कुशल तंत्रज्ञानाने परीपूर्ण आजही ऊन, पाऊस, वारा सहन करत शतकोत्तर अखंड अबाधित आहेत.जतन व्हावीत हीच मनोमन प्रार्थना….

फोटोग्राफ – Sachin kulkarni.

Varsha Mishra

Leave a Comment