महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,24,986

छत्रपती संभाजी महाराजांच्या क्रुर हत्येनंतर मुघलांनी तयार केलेला कालश्लेष (Chronogram)

By Discover Maharashtra Views: 1747 3 Min Read

छत्रपती संभाजी महाराजांच्या क्रुर हत्येनंतर मुघलांनी तयार केलेला कालश्लेष (Chronogram) –

छत्रपती संभाजी महाराजांची क्रुरपणाने हत्या केल्यानंतर मुघलांनी एक कालश्लेष तयार केला. तो औरंगजेबाचा अधिकृत दरबारी इतिहास असलेल्या आणि साकी मुस्तैदखानाने लिहीलेल्या मआसिर-ई आलमगिरी या ग्रंथात नोंदलेला आहे. तो पुढीलप्रमाणे आहे-

” काफरबच्चा जहन्नमी रफ्त”

याचा अर्थ “नरक नशिबी काफीराचा मुलगा गेला” असा होतो.

या कालश्लेषाची उकल केली असता छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूचे साल (१६८९) येते.

महत्त्वाच्या घटनांच्या तारखा कालश्लेषाच्या स्वरूपात नोंदवल्याची अनेक उदाहरणे इतिहासात आढळतात. अबजद पद्धतीचा वापर करून अक्षरमुल्यांच्या साह्याने हे कालश्लेष तयार केले जातात. या अक्षरमूल्यांची बेरीज केली असता, त्या घटनेची साल मिळते.

अरबी-फार्सी मधील प्रत्येक अक्षराला मुल्ये दिलेली आहेत. ती पुढील प्रमाणे आहेत.

अ (अलिफ) ا – १

ब ب – २

ज ج / च چ – ३

द د – ४

ह ه – ५

व و -६

झ- ز – ७

ह ح – ८

त (तोय) ط – ९

य ی – १०

क (काफ)  ک – २०

ल ل – ३०

म م – ४०

न ن – ५०

स (सीन)س -६०

अ (ऐन) ع – ७०

फ ف – ८०

स् (साद्) ص – ९०

क्(क्वाफ) ق – १००

र ر – २००

श ش – ३००

त ت – ४००

स् (से) ث – ५००

ख خ – ६००

ज (ज़ाल) ذ – ७००

ज(जाद्) – ८००

ज (जोय)- ९००

घ् غ- १०००

आता ही अक्षरमूल्ये वापरून छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येच्या कालश्लेषातून त्यांच्या हत्येचे साल कसे निघते ते पाहू:-

“काफरबच्चा जहन्नमी रफ्त” ( کافر بچه ج‍ﮩ‍نمي رفت ) यातील अक्षरे पुढील प्रमाणे आहेत-

काफ (ک)

अलीफ (ا)

फे (ف)

रे (ر)

बे (ب)

चे (چ)

हे (ه)

हे (ه)

जीम(ج)

हे (ه)

नून (ن)

नून (ن)

मीम (م)

ये (ي)

रे (ر)

फे (ف)

ते (ت)

आता या अक्षरांना अबजद पद्धतीने त्यांची मूल्ये देऊ

२०(ک) + १(ا) + ८० (ف‌‌) + २०० (ر) + २ (ب )+ ३ (چ)+ ५ (ه)+ ५ (ه) + ३ (ج‌) + ५ (ه) + ५०(ن) + ४० (م) + १० (ي) + २०० (ر) + ८० (ف) + ४०० (ت)

याची बेरीज १०९९ (हिजरी सनामध्ये येते) परंतु मआसिर ए आलमगिरी मध्ये येथे एक तळटीप दिली आहे ती पुढील प्रमाणे आहे

अदद मिसरा यक हजार व नवद व नू (१०९९) अस्त मगर आनकी हमजा रा नीज़ ब-हिसाब आवरदा शुद

म्हणजे

या काव्यपंक्तीची अबजद पद्धतीप्रमाणे किंमत १०९९ एवढी येते, परंतु हमजा (बच्चाह मध्ये दोनदा आलेला ह) धरले नाहीत तर योग्य किंमत येते.

दोन वेळा आलेल्या ह ची १० (५+५) ही किंमत १०९९ मधून वजा केली तर १०८९ हिजरी हे साल येते. यामध्ये ६०० मिळवले की १६८९ इसवी हे छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचे साल येते.

सत्येन सुभाष वेलणकर
पुणे

Leave a Comment