महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,24,174

कन्टेन्ट

By Discover Maharashtra Views: 1333 7 Min Read

कन्टेन्ट –

सह्याद्री मध्ये फिरताना आजवर बरेच लोक भेटले कोणी डोंगर चढायची  आवड आहे म्हणून येतात , कोणी मित्र जातो म्हणून येतात , कोणी डोंगरात गेल्यावर छान वाटणारे , इतिहास आठवून त्यात रमणारे , फक्त मजा मस्ती करणारे , निसर्गासाठी जाणारे असे एक ना अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. अलीकडच्या म्हणजे अगदी मागच्या ४ वर्षांपासून सह्याद्री मध्ये येणाऱ्या लोकांच्या प्रकारात अजून एक प्रकार आला आहे तो म्हणजे यूट्यूब साठी विडिओ बनवणारे कन्टेन्ट. मुळात बाकी सर्व प्रकार हे ऑफलाईन असल्याने ते केवळ तिथे गेल्यावरच पाहायला मिळतात पण यूटुबर्स हा प्रकार आपल्याला आपल्या मोबाइलला वर दिसतो आणि तुम्ही त्यांच खूप आरामात अनुकरण ही करू शकता.

ज्याला कोणाला ह्या प्रकारात यावंसं वाटत तो आरामात आपल्या कडे असणारा मोबाइलचा कॅमेरा सुरु करून हे करू शकतो आणि ज्याच्याकडे जास्त पैसे आहेत ते मोठा कॅमेरा किंवा अजून काही ज्याने समोरच दृश्य अधिक चांगल्या प्रकारे दाखवू शकतात. यूट्यूब चॅनेल ची सुरवात करताना तुम्हाला हे लोक त्यांचा अजेन्डा आपण हे सर्व महाराजांवर असलेल प्रेम , आदर ह्याची जाणीव करून देतात , सह्याद्री बद्दल असणारी तळमळ तुम्हाला दाखवून भावनिक सभासद जोडणी केली जाते आणि विडिओ चा प्रवास सुरु होतो.  कालांतराने विडिओ चांगले चालतात आणि घराघरात ते विडिओ बघितले जातात आणि काही तरुणांच्या अगदी आवडीचं असं ते चॅनेल बनल जात.

प्रत्येक गोष्टीच अनुकरण हे केले जात आणि त्यात काही गैर नाही पण ह्या सगळ्यामध्ये चुकीच्या काही गोष्टी सर्वात अगोदर अनुकरण केल्या जातात. विडिओ रंजक बनवण्याच्या नादात एखाद्या कड्यावरून चालताना विडिओ बनवण्यात येतो त्याने एक थरारक असा अनुभव आपल्याला विडिओ बघताना येतो. समोर बघणारा व्यक्ती ह्याचे ही अनुकरण करू शकतो हे पूर्णपणे विसरून विडिओ बनवले जातात आणि त्याचा होणार परिणाम एखाद्या घरी ‘ हे असं असत भयानक मग नका जाऊ त्या डोंगरात ‘ अश्या प्रकारे ही होतो आणि एखाद्याच्या मनात हे ही येऊ शकत कि ‘ हा करू शकतो मग मी का नाही करू शकत ‘ असा ही होऊ शकतो.

दोन्ही बाजू एका यूटुबर साठी कोणत्या ही प्रकारे त्याच्या विडिओला फरक पडत नाहीत ना त्या व्यक्तीला काही फरक पडतो. फरक पडतो तो फक्त सह्याद्रीला कारण अपघात झाल्यावर बदनाम होणारा हा सह्याद्रीच असतो विडिओ बनवणारा नाही. डोंगरात गेल्यावर जीव जाऊ शकतो , ह्या सह्याद्री मध्ये जीव जाऊ शकतो हेच समोर येत. तुम्ही ह्यावर जाब कोणाला विचारू शकत नाही कारण हा भारत संविधानाने बांधला गेलेला देश आहे आणि इथे प्रत्येकाला त्याला हवं ते करण्याचं स्वातंत्र्य आहे.

काही उदाहरण तुमच्या समोर ठेवतो अलीकडच्या काळात कलावंतीण नावाचं एक भूत सर्वांच्या डोक्यावर बसल आहे. डोक्याला एक छोटा कॅमेरा ज्याला गोप्रो म्हणतात त्यात ३० फुटाची दरी  ३०० फुटाची वाटते असा कॅमेरा वापरून विडिओ बनवले जातात आणि काही फुटांचा असणारा कलावंतिणीचा महाल दुनिया का सबसे खतरनाक केला म्हणून संबोधलं जातो आणि त्याच ठिकाणी जत्रा भरते कोणी पडून मृत्यू पावतो तर कोणी जखमी होतो . दुनिया का सबसे खतरनाक केला असा विडिओ बनवणारा , काही फुटांचा थरार दाखवणारा व्यक्ती मात्र हजारो , लाखो लोकांपर्यंत पोहचून  प्रसिद्ध झालेला असतो.

चुकतंय कोणाचा हे  कळत नाही पण बदनाम मात्र सह्याद्री होतोय एवढं नक्की.  अलंग- मदन- कुलंग सह्याद्रीच अतिकठीण असं दुर्गत्रिकुट पण तिथे असणारा शिलालेख कोणाच्या विडिओ मध्ये जास्त वेळ दिसत नाही पण तिथे असणाऱ्या पायऱ्या मात्र थराराच्या नावाखाली घराघरात पोहचवल्या  जातात.

तान्हाजी मालुसरे ह्यांच्यावर चित्रपट बनला तेव्हा त्यावर प्रश्न उपस्थित करणारे बरेच लोक होते. पण सह्याद्री अश्या प्रकारे समोर आणणार्यांना मात्र एकही प्रश्न विचारला जात नाही, असो…. !

प्रसिद्धीसाठी आता लोक काय करतील ह्याचा नेम नाही . परवा एकाने साल्हेर वर पार्टी करतानाचा काही विडिओ  सोशल मीडिया द्वारे दाखवल. त्यांनतर एक विडिओ आला त्यात ते छोटे छोटे विडिओ जे सोशल मीडिया द्वारे समोर आणले होते ते सर्व विडिओ वापरून एक विडिओ केला होता ज्यात संदेश देण्याचा प्रयत्न होता असं काही करू नका. ह्याला आपण पब्लिसिटी स्टंट म्हणू ज्यात काही तरी गोंधळ घालून आपल्याकडे लक्ष वेधून घायच आणि मग मूळ मुद्द्यावर यायचा जेणेकरून मोठ्या प्रमाणात विडिओ  बघीतल जाईल. आता ही सर्व शाळा कश्यासाठी तर आपल्या विडिओला जास्तीत जास्त व्हिऊज  मिळावे म्हणून. आता  ह्यात बऱ्याच शंका उपस्तिथ होतात पार्टी खरोखर केली आणि मग अंगाशी आल्यावर संदेश देण्याचा विडिओ अमोर आणला गेला कि खरोखर संदेश होता ?

सोशल मीडिया द्वारे जेव्हा सर्वांना समजल आणि लोकांनी विचारणा केल्यावर पोलिसात धाव घेण्याअगोदर सर्वांना जे काही करतोय ते एका संदेशासाठी करतोय असं का नाही सांगण्यात आलं ? प्रश्न बरेच आहे मात्र एक विचार कायम मनात येतो तो म्हणजे हे सर्व कश्यासाठी ? ह्या सर्वांची उत्तर हे सर्व करणारे ते  लोकच जाणतात आणि लोकांना लाख खोटं बोलतील पण स्वतःशी खोट नाही बोलू शकणार.

सर्व गोष्टी कन्टेन्ट बघितल्यावर एक गोष्ट मात्र  समजते ते म्हणजे प्रसिद्धीसाठी हे लोक काही ही करू शकतात. महाराष्ट्रात  करणारे आपण बघतो आता त्यांचा वापर करून प्रसिद्ध होणारे ही बघा आणि त्यांना प्रसिद्ध करणारे लोक ही आपलेच…

आज मला १२ वर्ष झाली सह्याद्री मध्ये फिरता फिरता पण मला थरार , रहस्य , भयानक अस काही जाणवल नाही पण विडिओ साठी ह्या शब्दांचा वापर करणारे यूटुबर मात्र पाहिले. बघा सह्याद्री ची एक दुसरी बाजू आहे ज्यात रोमांचकारी इतिहास आहे , थरारक युद्ध आहेत  आणि रहस्यमयी बांधकाम शैली आहे . ३० फुटाची दरी ३०० फूट भासवणाऱ्या कॅमेरा मधून जर एखादा महादरवाजा योग्य पद्धतीने मावला तर बघा. लाखोंच्या लेन्स मधून तुमचा चेहरा बाजूला सारून विविध फुल , पक्षी , मोठा डोंगर , धुकं , ढग दाखवता आले तर बघा .

ह्या लेखासोबत एक विडिओ जोडत आहे तो नक्की बघा. मी सुद्धा एक यूट्यूब वर चॅनेल सुरु केल आहे त्यासाठी विडिओ बनवताना हा समोरचा प्रकार शूट झाला आहे त्यात कोणताही खोटेपणा नाही स्क्रीन वर दिसणारा व्यक्ती पूर्णपणे त्याच्या मर्जीने त्याला जे वाटतय ते करतोय आणि बोलतोय. कन्टेन्ट, विडिओ नीट बघा आणि समजून घ्या आणि आपण आपले विडिओ कन्टेन्ट कश्याप्रकारे सादर केले गेले पाहिजेत ह्यावर नक्की विचार करावा.

Amol Jamdare

Leave a Comment