महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,26,474

संभाजीराजांचे मरणोत्तर योगदान

By Discover Maharashtra Views: 3751 2 Min Read

संभाजीराजांचे मरणोत्तर योगदान

कोणत्याही हुतात्म्यांचे कार्य हे मरणाने संपत नाही, तर ते मरणांनातर सुरु होते अस म्हणतात.(संभाजीराजांचे मरणोत्तर योगदान) आपल्या बलिदानाने तो आपल्या लाखो देशबांधवांना स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी चेतना देत असतो.
पुढील अनेक पिढ्यांसाठी तो ऊर्जा अन प्रेरणास्थान बनलेला असतो. जगण्यासाठी तो चिरंतन प्रेरणा देत असतो, स्वाभिमान अन कणखरतेचे एक उदाहरण पेश करत असतो.

संभाजी महाराजांचे कार्य त्यांच्या मृत्यूने संपले नाही.
मराठा साम्राज्य संपवण्याच्या हेतूने औरंग्याने त्यांना ठार मारले,
पण त्याचा हेतू अन स्वराज्य संपवण्याचा विचार निव्वळ मूर्खपणा ठरला.
संभाजीराजांचे कार्य कितीतरी वेगाने महाराष्ट्रात अन सैन्यात वाढले.

आग्र्यास आपण शिवाजीला मारले नाही ही आपली मोठी चूक झाली अस औरंगजेब म्हणतो.
पण ही चूक सुधारण्यासाठी त्याने संभाजी राजांना हालहाल करून ठार करण्याचा निर्णय घेतला.
अन हीच औरंगजेबाची सगळ्यात मोठी चूक ठरली.
संभाजी महाराजांना ठार न मारता नुसते कैदेत ठेवले असते तर कदाचित त्याला स्वराज्य जिंकताही आले असते.
पण ज्या निर्दयपणे अन अमानुषपणे त्याने या स्वराज्याच्या धन्याला ठार केले, त्यांचे डोळे काढले, कातडी सोलली, जीभ कापली गेली त्याची खबर ऐकून सर्व रयत, सैन्य अन मावळे जणू मधमाश्यांचे मोहोळ डिवचले जावे तसे मराठे डिवचले गेले, त्यांचा स्वाभिमान दुखावला गेला. अन त्या मधमाश्यांच्या पोळ्याप्रमाणे सुडाने, त्वेषाने अन एकाच उर्मीने मोगली फौजांवर मराठे तुटून पडले.

या मावळमातीत छत्रपती अन रयत यांच्यात अतूट असे हिंदवी स्वराज्याच्या निष्ठेचे नाते आहे हा प्रत्ययच जणू मराठयांनी त्या कपटी म्हाताऱ्याला आणून दिला.
तो प्रत्यय इतका भयानक होता, की ज्या भूमीला आपल्या अधिपत्याखाली घेण्यासाठी तो बुढ्ढा दक्षिणेत आपली संपूर्ण ताकद घेऊन उतरला, त्याच मातीतल्या लेकांनी त्याच्याबरोबर २६/२७ वर्ष झुंज देऊन याच मातीत त्याला गाडला.
याच मातीत मेला तो औरंगजेब.

पण मरेपर्यंत तो एकदम दुबळा झाला होता.
ना स्वाभिमान होता ना सामर्थ्य.

त्याने कधीच संभाजी राजांच्या छिन्नविच्छिन्न झालेल्या शरीरापुढे मान झुकवून मुजरा करून आपली हार मानली होती.
त्याच सगळं काही याच मराठ्यांनी बुडवले होते.
त्याला मरेपर्यंत या दख्खन मधील एक खण सुद्धा जिंकता आला नाही.
मुघलांच्यासाठी ही शोकांतिका असली तरी ती “मराठ्यांची अमर विजयगाथा” आहे.
अन या विजयगाथेचे पहिले व श्रेष्ठ मानकरी होते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज.

माहिती साभार – सोनू बालगुडे पाटील

Leave a Comment