महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,22,689

दबडगे गणपती मंदिर, सोमवार पेठ

By Discover Maharashtra Views: 3649 1 Min Read

दबडगे गणपती मंदिर, सोमवार पेठ –

सोमवार पेठेतील के.ई.एम. हॉस्पिटलच्या शेजारी एक अपरिचित आणि सुंदर गणपती मंदिर आहे.  हॉस्पिटल शेजारी असलेल्या कृष्णा मेडिकल आणि सर्जिकल या दुकानाच्या बाजूला असलेल्या शांती निकेतन ,३१९, सोमवार पेठ या इमारतीच्या आत हे मंदिर लपलेले आहे. या मंदिराच्या मालकांच्या नावामुळे हे मंदिर दबडगे गणपती मंदिर या नावाने ओळखले जाते.

मंदिर दगडी बांधणीचे असून मंदिराचा कळस विटांनी बांधलेला आहे. या मंदिराबाबत फारशी माहिती उपलब्ध नाही. तरी मंदिर बांधकामच्या पद्धतीवरून हे मंदिर अंदाजे १८ व्या शतकात बांधले गेले असावे.  ४/५ पायऱ्या चढून मंदिरात जाता येते. समोर ३ सुबक नक्षीदार कमानी आहेत. गाभाऱ्याच्या बाहेरच्या भिंतीवर दोन्ही बाजूला नक्षीदार कोनाडे आहेत. गाभाऱ्याला जाळीदार लाकडी दरवाजा असून खाली कीर्तिमुख कोरलेले आहे. मुख्य  गाभाऱ्यात उंचावर गणपतीची दगडी मूर्ती आहे. या मूर्तीच्या वरच्या उजव्या हातात अंकुश तर वरच्या डाव्या हातात परशु आहे. तर खालचा उजवा हात अभय मुद्रेत आणि डाव्या हातात लाडू धरलेला आहे. मूर्तीच्या खालच्या दोन्ही हाताखाली छोटेसे उंदीर कोरलेले आहेत. मूर्तीला अंगचाच मुकुट आहे. मूर्तीच्या मागे साधीशी दगडी प्रभावळ आहे.

मंदिरावर चारी बाजूला चार छोटी शिखरे असून मध्यभागी मुख्य शिखर आहे. शिखरावर विविध देवतांच्या मूर्ती कोरलेल्या असून त्यातली मयुरेश्वर गणपतीची मूर्ती लगेच ओळखता येते. मंदिराला लाकडी कळस आहे.

पत्ता : https://maps.app.goo.gl/YeYX2jGrKEDZP4WQ6

आठवणी इतिहासाच्या

Leave a Comment