महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,38,600

दैत्यगुरु शुक्राचार्य मंदिर, बेट कोपरगाव

By Discover Maharashtra Views: 2925 1 Min Read

दैत्यगुरु शुक्राचार्य मंदिर, बेट कोपरगाव –

प्राचीन काळापासून दंडकारण्य म्हणून प्रसिद्ध असलेल्या अहमदनगर जिल्ह्य़ातील कोपरगांव तालुक्यात दैत्यगुरू शुक्राचार्याचे एकमेव मंदिर आहे. अहमदनगर जिल्ह्य़ातील कोपरगांव तालुक्याच्या पंचक्रोशीत अनेक पौराणिक कथा व त्यांची स्मारके यांची रेलचेल आहे.दैत्यगुरु शुक्राचार्य मंदिर.

श्रीरामचंद्र याच परिसरातून वनवासाला गेले असे मानले जाते. दक्षिण गंगा गोदावरी याच परिसरातून वाहते. प्राचीन काळी अनेक ऋषीमुनी, तपस्वी, महापुरुष, साधुसंतांनी गोदावरीच्या तटी यज्ञ- याग- तपश्चर्या- ध्यानधारणा केलेली आहे.

गोदावरी नदीच्या दक्षिण तीरावर अगदी हाकेच्या अंतरावर कोपरगांव (बेट) हे भृगू ऋषींचे पुत्र व दैत्यांचे गुरू शुक्राचार्य यांचे कर्मस्थान आहे. शुक्राचार्य मंदिरा समोर श्री विष्‍णू व गणपती यांची मंदिरे आहेत. श्री विष्‍णुचे मंदिर हे काळया गुळगुळीत दगडातून  बांधलेले असून दोन्‍ही मंदि‍राच्‍या  मध्‍यात “संजीवनी पार” म्‍हणजे येथे कचास “संजीवनी” विद्या प्राप्‍त झाली व कच आणि देवयानी यांनी एकमेकांस शापित केले ते स्थान आहे. संजीवनी मंत्र देते वेळी श्री शंकर भगवान (त्र्यंबकेश्‍वर) गुप्‍त रुपाने तेथे आल्‍यामुळे त्‍यांचेही श्री त्रिंबकेश्‍वर मंदिर आहे. श्री शंकर भगवान येथे गुप्‍त रुपाने आल्‍यामुळे सदर मंदिरासमोर नंदीची स्‍थापना झालेली नाही. मंदिरा समोर नंदी नसलेले हे भगवान शंकराचे दुर्मिळ मंदिर आहे.

1 Comment