महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,22,792

दर्यासारंग दौलतखान

By Discover Maharashtra Views: 4141 1 Min Read

दर्यासारंग दौलतखान

“The General and Admiral of the fleet,which consist of 160 small vessels counted by my own servent is one ventgee sarungee,commonly called Durrea Sarungee.”
——– English Records On Shivaji
Vol 1-L

शिवछत्रपतींनी स्वराज्य स्थापनेत केलेल्या अनेक आमुलाग्र बदलांमधे एक सर्वात महत्वाची घटना म्हणजे आरमाराची केलेली स्थापना.या आरमारात महाराजांनी अनेक आमुलाग्र बदल केले.अनेक मोठे अधिकारी नेमले आणि स्वपराक्रमाने त्यांनी इतिहासात आपले नाव अजरामर केले,त्यापैकीच एक म्हणजे ‘दर्यासारंग दौलतखान’.

इ.स.1657 आणि 1661 मधे झालेल्या जंजीरा मोहीमेत त्यांनी पराक्रम गाजवला.जेव्हा मिर्झा राजे जयसिंग यांचे आक्रमण झाले होते तेव्हा,दौलतखान यांनी कोकण किनारपट्टीचे संरक्षण केले.त्यांच्या या कामगिरीवर खुश होऊन महाराजांनी त्यांना ‘दर्यासारंग’ ही पदवी दिली.
त्यांनी केलेल्या मोहीमा आणि नेतृत्व हे अद्भुत होते.फोंडयाच्या किल्ल्याला सुरुंग लाउन जिंकन्याचा पराक्रम केल्याने महाराजांनी दर्यासारंगांना फोंडयाची किल्लेदारी दिली.

सिद्धीच्या समुद्रावरील हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराजांनी कांसा बेटावर पद्मदुर्ग बांधन्याची जबाबदारी दौलतखानावर दिली होती आणि महाराजांचा विश्वास सार्थ ठरवत त्यांनी जंजिर्याच्या उरावर दूसरी राजापुरी उभारली.

इ.स. 1679 च्या अखेरीस खांदेरीवर झालेल्या मराठे-इंग्रज युद्धात त्यांनी मायनाक भंडारीसोबत अद्भुत पराक्रम गाजवला आणि 18 जानेवारी 1680 रोजी इंग्रजांना तहसाठी मजबूर करुन त्यांच्या समुद्रावरील हालचालींवर पायबंद घातला.

दर्यावर अमर्याद पराक्रम गाजवणाऱ्या या मराठ्याला मानाचा मुजरा..!!

माहिती साभार – आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची

Leave a Comment