महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,48,497

श्रीमंत सरदार दत्ताजीराव शिंदे एक सोनेरी पर्व | भाग ४

By Discover Maharashtra Views: 4499 24 Min Read

श्रीमंत सरदार दत्ताजीराव शिंदे एक सोनेरी पर्व

१७५६ साला मध्ये अहमदशाह अब्दाली दिल्लीकडे कूच करत आहे अशा बातम्या पेशवे दरबारात येऊ लागल्या. अब्दालीचा कायमचा बंदोबस्त करावा उत्तर प्रदेशामध्ये मराठ्यांचे वर्चस्व प्रभुत्व व्हावे. या हेतूने बाळाजी बाजीराव पेशवा उर्फ नानासाहेब पेशवे यांनी आपल्या मराठा सैन्यातील मातब्बर सरदारांना उत्तरेकडे कूच करायला आदेश दिले. या साधारण मध्ये सर्वात वयाने आणि अनुभवाने मोठे असणारे श्रीमंत सरदार मल्हारराव होळकर त्यांच्यासोबत रघुनाथराव पेशवा उर्फ दादासाहेब पेशवे त्याच्या नेतृत्वामध्ये श्रीमंत सरदार दत्ताजीराव शिंदे, त्रंबकराव, तुकोजी होळकर, बाबाजी शिंदे, जनकोजी शिंदे असे धडाडीचे मातब्बर सरदार यांना फौज फाटा देऊन. दिल्लीकडे दिशने वाटचाल चालू केली.

फेब्रुवारी १७५७ मध्ये महिन्यामध्ये सुमारे १५हजार मराठा फौजा इंदोर मध्ये दाखल होतात.या वेळी मराठा सरदार यांच्यापुढे एक बिकट अवस्था होती. ती म्हणजे मराठा सैन्याला लागणारे साधनसामग्री आणि राशन पुरवठा. आणि द्रव्य (पैसे). कारण अलीकडच्या काळामध्ये दक्षिण मध्ये निजाम स्वारी झाली होती. व कोकण किनारपट्टी कडे विजयदुर्गचा रणसंग्राम अशा मोठ्या मोहिमा पार पडल्या होत्या. यामध्ये अमाप संपत्ती खर्च केले गेली होती. साहजिकच पेशवे दरबारात मोठा पेच निर्माण झाला होता. पुढील कामासाठी संपत्ती कुठून आणायची. त्यामुळे रघुनाथराव पेशवे आणि मल्हाराव होळकर यांना अपुरेशी साधनसंपत्ती देऊन उत्तरेच्या मोहिमेला पाठवले होते. व सांगितले होते मराठा सैन्याचा खर्च तेथील स्थानिक जमीनदार आणि प्रांतातील राजेरजवाडे कडून वसूल करून भागवावे. त्यामुळे हा बिकट प्रसंग रघुनाथराव पेशवे आणि मल्हारराव होळकर यांच्या पुढे आलं होता. आणि त्यामध्ये अब्दालीने दिल्लीची पुरती वाट लावून टाकली होती.अशा बातम्या येत होत्या. त्यामुळे रघुनाथराव पेशवे यांनी मल्हारराव होळकर यांच्याशी मसलती करू लागले.

पण या ठिकाणी काही लोक आणि इतिहासकार असे म्हणतात. मल्हारराव होळकर आणि रघुनाथराव पेशवे हे जाणून-बुजून दिल्लीच्या किल्ल्याकडे जायला उशीर केला होता. आता सत्य परिस्थिती काय आहे याबाबत पाहून घेऊ. पहिली गोष्ट या मोहिमेसाठी खूप मोठ्या प्रमाणात पैशाची गरज होती. पण पेशवाई कर्जामध्ये बुडाली होती. त्यामुळे यांना अपोरी साधनसंपत्ती देऊन दिल्लीकडे रवाना केले होते. यामुळे रघुनाथराव पेशवे आणि मल्हाराव होळकर यांना प्रथम मराठा सैन्य आणि मोहिमेसाठी लागणारा पैसा व तसेच राशन सामग्री याची व्यवस्था करणे हे पहिले काम होते आणि त्यांनी तसे केले पण.

मल्हाराव होळकर यांनी रघुनाथराव पेशवे यांना दिल्लीला जायच्या आधी राजपुताना मध्ये जाऊन मराठा सैन्यासाठी लागणारा पैसा आणि राशन सामग्री या सर्व गोष्टीची व्यवस्था करून दिल्लीच्या दिशेने कूच करू असा त्यांना सल्ला दिला होता.व तसे रघुनाथराव पेशवे यांनी राजपुताना प्रांता कडे वाटचाल चालू केली.

रघुनाथराव पेशवे आणि मल्हाराव होळकर यांनी दिल्ली पर्यंत जाण्यास जाणून-बुजून उशीर केले होते. वास्तविक पाहायला गेले हे कितपत खरं होतं. हे आपण तारखा वरून पाहूया. वर्ष १७५७ मध्ये फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये मराठा सैन्यात इंदूरमध्ये होते. आणि दिल्ली च्या किल्ल्यामध्ये आगमन यांचे ऑगस्ट महिन्यामध्ये झाले. म्हणजे साधारण आठ महिने यांना लागले. हे असे कसे घडले असावे.
त्याच्या पाठी मागील काही आपण कारणे पाहूया.

1. सर्वप्रथम रघुनाथराव पेशवे त्यांच्या फौजांची संख्या 15000 होती. आणि जवळजवळ मल्हाराव होळकर आणि दत्ताजी शिंदे यांची पण फौजांची संख्या एवढी होती. म्हणजे मराठा सैन्याची संख्या 32 ते 33 हजारांमध्ये होते. तिकडे अब्दालीचे सैन्याची संख्या 70,000 हजार ते 1,00,000 लाख येवढी होती. इतक्या अल्प फौजफाट्याच्या बळावर अब्दालीचा सामना करणे यावेळी शक्य नव्हते.
2. स्वारीचा खर्च परस्पर बाहेर भागवायचा असल्याने फौज पोसण्यासाठी मार्गातील मराठा साम्राज्याचे मांडलिक संस्थानिकांकडून खंडण्या वसूल करतचं पुढे जायचे होते. आणि मराठा साम्राज्याचे मांडलिक असलेले संस्थानिक कधी कधी लष्करी बळाचा वापर केल्याशिवाय खंडण्या देत नसत. आणि हे सर्व मांडलिक जास्तकरून राजपुताना जाट या प्रांतामधील होते.
3.१७५२ च्या अहमदिया समझौता मध्ये बादशाही संरक्षण करणें त्या बदल्यांमध्ये पंजाब आणि सिंधू नदी त्या प्रांतातील चौथाई वसूल करणे. पण हा करार करताना अब्दालीच्या वकिलाणी परस्पर मध्यस्ती करून दिल्लीच्या बादशाह वर दबाव टाकतात. पंजाब प्रांताकडे सत्ता ताब्यात घेतली. आणि अब्दाली तिकडून परत काबुल-कंधार कडे वळला या वरून मराठा हा अंदाज बांधता येत नव्हता. दिल्लीचा दरबार मधून अब्दालीला किती पाठिंबा मिळतो याची पक्की बातमी माहित नव्हती.
4.चोथा .१७५२ च्या अहमदिया समझौता नुसार दिल्ली आणि दिल्याच्या बादशहा यांचे रक्षण करणें ते पण अंतर्गत शत्रू जसे रोहिल खंड चे पठाण, जाट राजपूत यांचा पासून आणि बाहेर देशातील अफगाण यांचा सारख्या पासून रक्षण करणें असा करार असला तरी पण रघुनाथराव पेशवे मल्हाराव होळकर आणि दत्ताजी शिंदे दिल्लीच्या बादशहाच्या जास्त विश्वास नव्हता. वेळ पडल्यावर बादशहा आपला जीव वाचवण्यासाठी मराठा सैनिकांची मान कापला मागेपुढे पाहणार नाही अशी खात्री होती आणि पहिले तर दिल्लीचा बादशाह हा विश्वासाचा लायकीचा नव्हता. त्यामुळे ही शंका येणे साहजिक होती.

5.पाचवा वास्तविक पाहिले गेले तर इंदूर ते दिल्ली चे अंतर 776 k.m एवढे आहे. पण मंडळींनो हा सर्व प्रकार
१७५७ काळामध्ये घडलेला होता. मुळात रघुनाथराव पेशवे मल्हाराव होळकर आणि दत्ताजीराव शिंदे यांच्या संयुक्त मराठा फौज 30 ते 35 हजार या संख्यामध्ये असणार. साधी गोष्ट आहे एवढ्या मोठ्या सैन्य जेव्हा एका नदीकिनारी येत तेव्हा मोठा अडथळा असतो की नदी कशी पार करायची. त्या काळामध्ये आजच्यासारखे मोठे पूल आणि तसें तंत्रज्ञान नव्हते.आणि उत्तरेकडील नद्या यांचा विस्तार फार मोठा असायचा. मराठा फौजा यांना वाटेमध्ये तीन मोठ्या नद्या लागल्या त्यामधील एक कालीसिंध नदी,बनास नदी,चंबल नदी अशा मोठया नद्या वाटे मध्ये लागले. एवढे मोठे मराठा सैन्य सहाजिकच आहे नदी पार करताना काही दिवस लागणारच.

या कारणामुळे मराठा फौजा दिल्लीमध्ये उशिरा पोहोचल्या. मे महिन्यामध्ये मराठा सैन्यांनी राजपुताना प्रांतातील सर्व राजेरजवाड्यांना खलिते पाठवून वेळेच्या आत खंडण्या पाठवावे. काही ठिकाणी राजा राजवाड्यांनी स्वताहून खंडण्या पाठवल्या तर काही ठिकाणी सैन्य बळाचा वापर करून खंडण्या वसूल करावे लागले. हे सर्व कार्यक्रम में एप्रिल महिन्यामध्ये चालू होते. जून-जुलैमध्ये पावसाळा आल्यामुळे तेथील मोठे नद्यांना पूर आला होता अशा परिस्थितीमध्ये मराठा सैन्य नदी पार करू शकत नव्हते. यांना जून-जुलै पर्यंत वाट पाहावी लागली. ऑगस्टमध्ये मराठा सैन्याने मथुरा आग्रा असे महत्वपूर्ण चे ठाणे ताब्यात घेऊन. दिल्लीकडे कुछ चालू ठेवले. हे सर्व बातम्या ऐकल्यावर पंजाब प्रांतामध्ये ठाण मांडून बसलेला अहमदशहा अब्दाली काबुल-कंधार कडे वाटचाल चालू केली. वाटेमध्ये लाहोर येथे आणि पेशावर जवळ असलेले अटक किल्ल्यापाशी आपल्या सैन्यातील काही भाग आणि लुटलेली साधनसंपत्ती ठेवून पुढे निघून गेला.

दिल्लीमध्ये अब्दालीचे तळवे चाटणारा नजीब उद्दौला उर्फ नजीबखान हा दिल्लीच्या किल्ल्यावर ठाण मांडून बसला. मराठ्यांना प्रतिकारासाठी सज्ज राहिले. सप्टेंबर महिन्यामध्ये मथुरा आग्रा अशी वाटचाल करत मराठा सरदार दिल्लीचे वेशीवर येऊन थांबले. विठ्ठल शिवदेव विंचूरकराने दिल्ली जिंकून घेतली आणि नजीबला कैद केले. या पराक्रमाबद्दल मोगल बादशहाने त्यास बक्षीसादाखल जहागीर देऊन त्याचा गौरव केला. इकडे नजीब कैद झाल्यावर त्यास मारून टाकावे वा कैदेत ठेवावे असे सर्वांचेच मत पडले. पेशव्याचीही तशाच आशयाची आज्ञा होती. परंतु या सर्वांच्या विरुद्ध जाऊन रघुनाथराव पेशवे यांनी नजीब खानला कैदेतून मुक्त करून त्याला त्याच्या प्रांतात पाठवून दिले ( त्याला काय सोडून दिले या वर खुप जणांचे वेगळे मत आहे आणि तो एक वादाचा विषय होऊन विषयांतर होईल.)

याठिकाणी काहीकाळ विश्रांती घेउन मराठा सैन्य लाहोर कडे प्रस्थान केले. लाहोरमध्ये अब्दालीचे थोडे सैन्य होते त्याच्यामध्ये अब्दालीचा मुलगा तैमूर खान आणि त्याचा वजीर जहाँनखान होता यांनी काही काळ मराठ्यांचा प्रतिकार केला. पण आपण जास्त काळ टिकणार नाही हे पाहून घेणे पाठीला पाय लावून कंधार कडे पळत सुटले. तिकडे मराठा सैन्यांनी त्यांचा पाठलाग पेशावर जवळ असेल अटक किल्ल्यापर्यंत केला. पुढील काही काळात मराठा साम्राज्याचा विस्तार (सद्यस्थितीत असेल अटक पाकिस्तान देशात पेशावर शहराजवळ अटक किल्ल्यापर्यंत गेला) उत्तरेकडील अटक किल्ल्यापर्यंत घोड्यांच्या टापा पडू लागले. या मोठ्या मोहिमेमध्ये बाजीरावांचे दुसरे पुत्र राघोबादादा पेशवे मल्हारराव होळकर आणि दत्ताजी शिंदे आणि साबाजी शिंदे यासारखे मातब्बर सरदार होते. यांनी किल्ले अटक मुलतान्ना पर्यंत धडक मारली मराठा साम्राज्याचा सीमा अफगान देशासोबत भिडले.

हे सर्व मोहीम 1756 ते 1758 मध्ये घडली असावी. कुडके लढाईमध्ये आणि मारवाडी प्रांतांमध्ये आपले शौर्य दाखवत आपली तलवार रणांगणात गाजवली. मोठ्या मोठ्या मोहिमांमुळे पुण्यातील नानासाहेब पेशवे आणि रघुनाथराव पेशवे यांनी अटक किल्ल्याची जबाबदारी व तसेच उत्तरेकडील जबाबदारी दत्ताजी शिंदे साबाजी शिंदे अशा मातब्बर सरदारांच्या खांद्यावर सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला.
राघोबादादा पेशवे यांनी किल्ले अटक त्याची जबाबदारी दत्ताजी शिंदे आणि साबाजी शिंदे यांना सुपूर्त करून पंजाब मध्ये माघारी फिरले. आणि पुढे जाऊन पुण्याकडे रवाना झाले.

पुढे काही दिवसात मल्हारराव होळकर हे राजपुताना मध्ये मोहिमेसाठी निघून गेले.आणि तिकडे दिल्लीमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली अस्थिरता मिटवण्यासाठी स्वतःहून दत्ताजीराव शिंदे अटक केल्यावर बाबाजी शिंदे यांना नेमणूक करून दिल्लीकडे रवाना झाले. दिल्लीमध्ये पोचल्यावर आणि राजकीय अस्थिरता मिटवून. दिल्लीच्या बादशहाला हाताशी धरून भारत देशाचा राजकारण बघू लागले. हे सर्व प्रकरण घडत असताना. रोहिलखंड चा नजीब उद्दौला (नजीब खान) (आपल्या सोई साठी नजीब खान असे उचार करू ) याला मराठ्यांचा प्रचंड राग होता.आणि मराठ्यांनी त्याला दिल्लीच्या दरबारातून मिरबक्षी या पदावर बरखास्त करून रोहिल खंडाला पाठवून दिले. या सर्व गोष्टींचा मनात राग धरून मराठ्यांवर सूड काढायचा निर्णय घेतला. इकडे दिल्लीमध्ये दत्ताजी शिंदे यांनी गंगा नदी पार करून पलीकडचा मुलुक मारावा अशी योजना आखली याप्रकारे त्यांनी नजीबखान हाताशी धरून गंगा नदीवर पूल बांधावा असे नियोजन केले. पण दत्ताजी शिंदे यांना नजीब खान याच्या मनात काय चालू आहे हे लवकर कळच नाही.नजीब खान दत्ताजीराव शिंदे यांना आश्वासन दिले गंगा नदीवर तुम्हाला पूल बांधून मराठा सैन्य पार करून देईन. पण या उलट नजीब खान च्या मनात वेगळा डाव रंगत होता. त्याने अवधचा नवाब शुजाउद्दौला ला दत्ताजी शिंदे यांच्याविरुद्ध भडकावण्या सुरुवात केली. नजीब खान यांनी या युद्धाला धार्मिक रंग देत.नवाब शुजाउद्दौला आपल्या बाजूने वळवून घेतले.

1759 एप्रिल मध्ये अहमदशहा अब्दाली चा वजीर जहाँ खान हा परत सैन्य जमा करून पेशावरच्या मार्गे अटक लाहोर सरहिंद या मार्गाने आक्रमण करत पुढे येऊ लागलं. तिकडे नजीबखान हा गंगा नदीला पूर आला आहे म्हणून नदीवर पूल बांधण्याचे काम टाळत होता. दत्ताजी शिंदे यांच्या मनात हळूहळू संशयीची जगा ही पक्की होत गेली. एका बाजूस नजीब खान दत्ताजी शिंदे यांना पत्र पाठवून त्यांची दिशाभूल करू लागला. त्याचबरोबर नजीब खान हा पाठीमागून अहमदशहा अब्दली याच्या बरोबर पत्र व्यवहार करू लागला. व तो त्याला दिल्लीवर आक्रमण करण्यासाठी हीच वेळ बरोबर आहे हे पटवून देऊ लागला. जहाँनखान हा पेशावरच्या पुढे येऊ लागलं म्हूणन दत्ताजी शिंदे यांनी साबाजी शिंदे यांना पेशावर अटक चा किल्ला परत ताब्यात घ्यावा या मोहिमेसाठी परत धाडले. आणि स्वतः दत्ताजीराव शिंदे नजीबखान वर चालू जाण्यासाठी तयारी करू लागले. तेव्ह नजीब खान रोहिलखंड मध्ये वास्तव्य करत होता.दत्ताजी शिंदे आपल्यावर चाल करून येत आहे हे पाहून हा नजीब खान गंगा नदी जवळ असणाऱ्य शुक्रताल किल्ल्यावर जाऊन आश्रय घेतला. त्याच्यापाठोपाठ दत्ताजी शिंदे होते. पण त्याच वेळेस मान्सून आल्यामुळे त्या भागामध्ये जोरदार पाऊस सुरू झाला. गंगा नदी आणि यमुना नदीला पूर आलं होता त्यामुळे दत्ताजी शिंदे यांच्या सैन्याची गती थोडी मंदावली.नजीब खान त्याला कळून चुकले मान्सून संपल्यावर युद्ध अटळ आहे. हे ओळखून नजीब खान यांनी मान्सून संपेपर्यंत सैन्याची जमवाजमव करू लागला. सैन्यासाठी व तोफखानासाठी लागणारा दारुगोळा आणि शस्त्रसाठा जमवाजमव करू लागला.

ऑगस्ट च्या महिन्यात त्याची तयारी पूर्ण झाली. गंगेच्या पलीकडे पूर्व दिशेला नजीब खान याचा संबळगड नावाचा किल्ला होता.काहीच कोसावर नजीबाबाद हे प्रमुख ठाणे जवळ होते.आणि काही अंतरावर नवीन बांधकाम करण्यात आले पत्थरगड हा पण किल्ला जवळ होता. यावरून रोहिलखंड चे पठाण आणि नजीब खान याला हा परिसर चांगला ओळखीचा होता.

इकडे दत्ताजी शिंदे यांना खात्री पटली हा नजीब खान विश्वासाच्या पात्रतेचा नाही. दत्ताजी शिंदे आणि त्यांच्या सैन्याने नजीब खान चा किल्लावर शुक्रतारा यावर हल्ला चढवला(10 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर या कालावधीमध्ये)
पण नजीब खान पूर्वतयारी करून बसला होता. त्यांनी कडवा प्रतिकार केला. दत्ताजी शिंदे आणि त्यांचे सैन्य त्यांनी माघार घेत दिल्लीकडे निघाले. त्यात कालावधीमध्ये दत्ताजी शिंदे यांनी गोविंदपंत बुंदेले यांना बोलावून दहा हजाराचे सैन्य देऊन नजीब खान का कडे लक्ष देण्यास सांगितले. आणि स्वतः दत्ताजीराव शिंदे हरिद्वार पाशी गंगा नदी पार करण्यासाठी पूल बांधू लागले. बघता बघता काही दिवसात पूल बांधून तयार झाला. मराठा सैन्यांनी हरिद्वार वरून गंगा पार करून थेट संबाळ गडावर हल्ला चढवला संबळगड पत्थरगड नजीबाबाद हे किल्ले आणि ठाणे आपल्या ताब्यात घेऊन मराठ्यांनी रोहिलखंड चे पठाण त्यांना पराभूत करून किल्ल्यावर भगवा ध्वज मोठ्या दिमाखात डोलु लागला.
तिकडे अहमद शाह अबदाली त्याने दिल्लीकडे कूच केली त्यांनी आपल्या त्याचे दोन तुकडे केले एक तुकडी जहाँ खान ला कंधार काबुल पेशावर या मार्गाने पाठवले. आणि स्वत अहमद शह अब्दली बोरन दर्गा या मार्गाने येऊ लागला. आणि आपला रोख मुलतानपूर कडे केला. हे सर्व घटना घडत असताना. मराठा सैन्याची सरदार तुकोजी होळकर हे अटक किल्ल्यामध्ये होते. बाबाजी शिंदे हे पेशावर मध्ये होते. त्रिंबकराव मुलतान मध्ये होते.

1759 ऑक्टोबर मध्ये अहमदशाह अब्दाली आणि त्याच्या सैन्याने सिंधू नदी पार करत. मुलतानपूर वर हल्ला चढवला. त्र्यंबकराव त्यांनी काही काळ प्रतिकार केला. पण संख्या बळाने अब्दालीचे सैन्य मोठे होते. त्यामानाने त्रंबकराव त्यांचे सैन्य कमी होते. त्यांचा जास्त काळ निभाव नाही लागला. आणि मराठा सैन्याचा पाडाव होऊ लागला हे ओळखून त्यांनी माघार घेत लाहोर कडे कूच केली. तिकडे जहानखान यांनी पण पेशावर करत केले अटक वर हल्ला चढवला तिकडे पण काही अशीच परिस्थिती होती. संख्या बाळाने जहानखान त्याचे सैन्य मोठे होते. किल्ले अटक घमासान युद्ध झाले. तुकोजी होळकर आणि साबाजी शिंदे कडवा प्रतिकार केला.पण इथे पण मराठा सैन्याला पराभवाचा सामना करावा लागला. तुकोजी होळकरा आणि साबाजी शिंदे त्यांच्या संयुक्त फौजा लाहोरच्या दिशेने निघाले. तुकोजी होळकर हे पटाला कडे निघाले काही का त्र्यंबकराव हे पण पटाला कडे निघाले.

नोव्हेंबर महिन्यामध्ये मुलतान कुठून येणार अहमदशहा अब्दाली यांनी लाहोर वर हल्ला चढवला. पण लाहोरमध्ये जाट,मराठा,सिख यांच्या संयुक्त फौजा यांनी अब्दालीचा कडवा प्रतिकार केला आणि यामध्ये त्यांना यश मिळू लागले. त्याच वेळी पेशावरच्या मार्गाने येणारा जहानखान यांनी वेळेवर पोहोचून मदत केली त्यामुळे जाट,मराठा,सिख यांच्या संयुक्त फौजा यांचे नेतृत्व करणारे साबाजी शिंदे यांना माघार घ्यावी लागली. याच नोव्हेंबर महिन्यामध्ये तुकोजी होळकर आणि त्र्यंबकराव त्यांच्या संयुक्त फौजा जलंदर च्या मार्गाने सरहिंद येथे पोहोचले. त्यांच्यापाठोपाठ साबाजी शिंदे पण होते हे सर्व सरदार सरहिंद मध्ये मिळून. एकत्रितपणे दत्ताजी शिंदेंकडे निघाले. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या काही दिवसात जहानखान ने सरहिंद वर कब्जा घेतला. आणि डिसेंबर मध्ये सरहिंद मध्ये पाऊल ठेवले. तिकडे दत्ताजी शिंदे दुआब रोहिलखंड या प्रांतांमध्ये नजीब खान रोखण्यात यशस्वी ठरले होते. पण दिल्लीच्या वेशीवर अब्दाली आल्यामुळे त्यांनी नजीब खानाची स्वारीने मागे टाकून. यमुना नदी पार करून पानिपत गावी येऊन थांबल. तिकडे अहमदशाह अब्दाली सरहिंद सोडून अंबाला या ठिकाणी येऊन पोचला. दोन्ही फौजांची टक्कर काही अंतरापासून तरावडी या गावात तुंबळ युद्ध झाले. या युद्धामध्ये दोन्ही सैन्यांचे थोड्या प्रमाणात नुकसान झाले. यानंतर काही दिवसात अहमद शह अब्दली यमुना नदी पार करून रोहिलखंड मध्ये असलेल्या नजीबखान कडे गेला. आणि इकडे दत्ताजी शिंदे आणि दिल्लीचा वजीर इमादोल मुल्क हे दोन्ही पण दिल्लीकडे निघाले. वाटेमध्ये दत्ताजी शिंदे यांनी इमादोल मुल्क याला दिल्लीला जाऊन सैन्याची जमवाजमव करून परत माघारी येण्यास सांगितले. तोपर्यंत दत्ताजी शिंदे अब्दालीच्या सैन्याला सोनपत या ठिकाणी थांबून ठेवण्याचे प्रयत्न करणार होते. ठरल्याप्रमाणे दिल्लीचा वजीर इमादोल मुल्क हा दिल्लीमध्ये पोचून सैन्याची जमवाजमव करू लागला. आणि दत्ताजी शिंदे स्वतः सोनपत या ठिकाणी थांबून युद्धाची तयारी करू लागले.
या सर्व गोष्टी घडत असताना डिसेंबर महिना उलटून गेला.

1760 जानेवारी महिना उगवला जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये यमुना नदीच्या पलीकडे अहमदशाह अब्दाली आणि नजीब खान त्यांच्या सैन्यातील तळ पडले होते. आणि इकडे बुराडी घाटाकडे दत्ताजी शिंदे यांचे सैन्याचे तळ पडले होते. अहमदशाह अब्दाली आणि नजीब खान काय दिवस शांत राहून पुढील योजना करू लागले. नदीच्या दुसऱ्या तीरावर बुराडी घाटामध्ये दत्ताजी शिंदे पण युद्धाची तयारी करू लागले. तिकडे नजीबखान हा अहमदशाह अब्दाली ला नदी पार करुन दत्ताजी शिंदे वर हल्ला करण्यास प्रवृत्त करू लागला. आणि त्याच्या सांगण्यावरून अहमदशहा अब्दालीने नजीबखाना आणि कुतुब शहा यांना दत्ताजी शिंदे सैन्यावर हल्ला करण्यास परवानगी दिली. 9 जानेवारी 1760 ह्या थंडीच्या दिवसांमध्ये नजीब खान आणि कुतुब्शहा यांच्या संयुक्त फौजांनी नदी पार करून बुराडी घाटावर मध्ये झाडाझुडुपांमध्ये लपून बसले आणि दत्ताजी शिंदे यांच्या सैन्यावर हल्ला करण्याची वेळ पाहू लागले. 10 जानेवारी 1760 पहाटेचे नजीब खान आणि कुतुबशहा यांनी दत्ताजी शिंदे च्या तळावर हल्ला केला.

थंडीचा काळ सकाळी पहिल्या पहारा (सकाळी 9 वाजता) दत्ताजी शिंदे यांच्या त्यांच्या तळावरील पहिल्या फळीतील सरदार जानराव वाबळे यांच्या सैन्यावर नजीब खान हल्ला चढवला. बघता बघता तुंबळ युद्ध सुरू झाले. हर हर महादेवाचे घोषणा आकाशात गर्जू लागली.
मराठा सैन्याने नजीब खानच्या सैन्याला सरासरा कापून काढू लागले. एक एक मराठा सैनिक आपल्या प्राणाची बाजी लावून लढत होता. बुराडी घाटामध्ये रक्ताचे पाट वाहू लागले. काही वेळातच नजीब खानला कळून चुकले. हे जर असेच चालू राहिले तर आपल्या जास्त काळ निभाव लागणे शक्य नाही. म्हणून त्यांनी पाठीमागून कुतुब्शहा सैन्याला सांगणे धाडले. आणि कुतुबशाहाची सैन्य जे की ताज्या दमाची सैनिक होते. ह्या सैनिकांमध्ये बहुतांश सैनिक बंदूकधारी होते त्याना त्या काळी किजिलबश किंवा जजले बंदूकधारी असे म्हणत.हे बंदूकधारी त्या काळातील आधुनिक बंधूका वापरत करत असत. आणि इकडे मराठ्यांचे परंपरेने चालत आलेले शास्त्र हेच होते तलवार बाज आणि घोडेस्वार. ज्याक्षणी कुतुबशहा चे ताज्या दमाचे सैनिक आणि नवीन बंदूकधारी सैनिकांनी मोर्चे सांभाळले. त्या क्षणापासून एकेक मराठी विर धारातीर्थी पडू लागला. त्यामुळे मराठा सैन्यात मध्ये थोडी पीछेहाट सुरू झाली. त्याक्षणी दत्ताजी शिंदे यांनी आपले सैन्य घेऊन रणांगना मध्ये कूच केले. दत्ताजी शिंदे हे चक्क तांडव करू लागले. दिसेल त्या गिलजी आणि पठाण यांना कापून काढू लागले. दत्ताजी शिंदे विजेच्या गतीने तलवार फिरवू लागले. कैक पठाणांचे मुडदे पडू लागले. कोणाचा हात कोणाचा पाय कोणाची धड तर कोणाच्या मुंडके. एक एक अवयव सासरा कापून हवेत रक्ताचे पिचकाऱ्या उडू लागले. दत्ताजी शिंदे यांची तलवार रक्ताने माखलेली पाहून त्यांच्या डोळ्यांमध्ये तेज पाहून मराठा सैन्य मध्ये परत नवीन स्फूर्ती निर्माण झाली. आणि ते परत युद्धामध्ये भारी पडू लागले. तिकडे युद्धभूमीच्या दुसऱ्या बाजूस जनकोजी शिंदे हे मराठा साम्राज्याचे प्रतीक भगवा ध्वज जरीपटका याच्या पाशी येऊन रणांगणात आपली तलवारची शौर्य गाजू लागले. त्या क्षणी जनकोजी शिंदे यांना उजव्या दंडाच्या बाजूस गोळी लागून गेली. आणि ते घोड्यावरून खाली पडले. रणांगणामध्ये अशी अफवा उठली जनकोजी शिंदे पडले. हे बातमी दत्ताजीराव शिंदे यांना मिळाली तुम्ही त्वरित आपला घोडा वृद्ध भूमीच्या दुसऱ्या बाजूस नेला. त्याक्षणी त्यांची नजर पठाणांच्या सैन्यामध्ये असलेला नजीब खानावर पडली. दत्ताजी शिंदे यांचे तळपायाची आग मस्तकात गेली. आणि त्यांनी आपला घोडा घेऊन दिशेने धावू लागले. वाटेमध्ये जो जो पठाण येईल तलाक सरासरा कापून बाजूला काढले. तो पराक्रम ते शौर्य दत्ताजीचा हा रुद्रावतार दिसून नजीब खानला आपला साक्षात मृत्यू घोड्यावर बसून येत आहेत हे दिसले. पण त्या क्षणी एकाजंबुरक तोफे मधून गोळा सुटला. आणि तोफेच्या गोळ्याने वार्याच्या वेगाने धावत असलेला दत्ताजी शिंदे त्यांच्या घोड्याचा वेध घेतला. मोठा आवाज झाला सगळीकडे धूळ उडाली. दत्ताजी शिंदे घोड्यावरून खाली पडले. दत्ताजी शिंदे जखमी झाले ही बातमी जेव्हा सैन्यामध्ये पसरली सगळीकडे गोंधळ उडाला. धुळीचे लोट काहीशा प्रमाणात सरल्यानंतर कुतुबशहा आणि नजीब खान हे दोघे उडालेल्या धुळीचे लोट आकडे एकटक पाहू लागले. आणि त्यांना खाली जखमी अवस्थेत पडलेले दत्ताजी शिंदे दिसले. त्या दोघांना काही कळत हिम्मत नाही झाली दत्ताजी शिंदे त्यांच्यापाशी जायची. जेव्हा नजीब खानने खात्री करून घेतली. दत्ताजी शिंदे पूर्णपणे जखमी अवस्थेत पडलेले आहेत आणि युद्ध करण्याच्या अवस्थेमध्ये नाहीत. तेव्हा कुतुबशहा आणि नजीब खान हे दोघे दत्ताजी शिंदे पाशी जवळ पोहोचले.
तेव्हा कुतुबशहा हा दत्ताजी शिंदे यांना या अवस्थेमध्ये पाहून जोरजोरात हसू लागतो. आणि पुढे बोलतो.

“क्युँ पाटील और लडोगे?”

पुढे साक्षात मृत्यू उभा आहे. हेसुद्धा माहीत असून पण तोच बाणेदार पणाने दत्ताजी शिंदे यांनी आपल्या शरीरातले सगळे प्राणी एकवटले एक मोठा श्वास घेतला पण उद्गारले ते वाक्य

“क्युँ नही? बचेंगे तो और भी लडेंगे.

हे उत्तर ऐकून कुतुबशहा तर राग अनावर झाला. आणि दत्ताजी शिंदे यांच्या छातीवर बसून खंजीर याने छातीत सतत वार करू लागल. तेवढ्या मध्ये नजीब खान याने तलवार घेऊन. दत्ता शिंदे यांचे धडा आणि शीर वेगळे केले. आणि ते शिर हातामध्ये घेऊन नाचत नाचत अब्दालीकडे गेल. आपला सरदार पडला हे पाहून मराठा सैनिक इकडे तिकडे पळू लागले. पठाणांनी त्यांचा पाठलाग करू लागले.

काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं. एक शूर नरवीर सरदार रणांगनामध्ये धारातीर्थी पडला. या यमुना नदीला विश्वास बसेना. आकाश गडगडू लागले जमीन फाटली. मराठा सैनिकांना विश्वास बसेना. अरे काय झालं हे. आपले सरदार धारातीर्थी पडले. कित्येक मराठा सैनिक तिथेच आक्रोश करू लागले. मराठा सैनिक जिकडे वाट दिसेल तिकडे पळू लागले. मराठा सैनिकांनी माघार घेतली. आणि युद्धविराम झाले.

दक्षिणेमध्ये निजामशाही ला शांत करणारे. गुजरात राजस्थानमध्ये मारवाड प्रांतांमध्ये तेथील राजे-रजवाड्यांच्या मुसक्या आवळून मराठा समाजाला पाच कोटी खंडणी गोळा करणारे. तरावडी रांगणामध्ये शौर्यची शर्त करत अब्दालीला आस्मान दाखविणाऱ्याला. ते श्रीमंत सरदार दत्ताजीराव शिंदे हे सोनेरी पर्वत शांत झाले.

संदर्भ.
1.निजाम-पेशवे संबंध.
2.राजवाडे खंड 3.
3.पानिपत बखर.
4.भाऊसाहेबची बखर..
5.मराठी रियासतमध्य विभाग 1:गो.स. सरदेसाई
6. Net आणि विकिपीडिया

फोटो
1.पेशवे प्रतिनिधी श्रीमंत रघुनाथराव पेशवे उर्फ राघोबादादा.
2 आणि 3 श्रीमंत सरदार महाराज मल्हाराव होळकर
स्थळ श्रीमंत होळकर सरकार वाडा पंढरपूर
4.श्रीमंत महाराज राणोजी शिंदे
स्थळ शिंदे सरकार वाडा पंढरपूर
5.श्रीमंत महाराज दत्ताजीराव शिंदे
स्थळ शिंदे सरकार वाडा पंढरपूर
6.श्रीमंत महाराज जनकोजीराव शिंदे
स्थळ शिंदे सरकार वाडा पंढरपूर
7.नजीब उद दौला उर्फ नजीब खान
8.मराठा साम्राज्याचा नकाशा
शिंदे सरकार वाडा पंढरपूर
9 आणि 10 मराठा सैन्यामध्ये असणारे हुजुरात किंवा घोडेस्वार सैनिक
11,12,13,14,15,आणि 16 अहमदशाह अब्दाली आणि अफगान सैन्यामधील बंदुकधारी सैनिक किजिलबाश आणि जेझेलधारि सैनिक. आणि त्या काळातील वापरणाऱ्या जेझेलबंदुका.आणि जंबुरक तोफा आणि उंटावर लादलेल्या
किल्ले अटक

फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा

काही चूक झाली असेल तर कृपया माझ्या चुक मला दाखवून द्यावे आणि योग्य ते मार्गदर्शन करावे

मोहित पांचाळ

खांदेरीचा रणसंग्राम

1 Comment