श्रीमंत महाराज दत्ताजीराव शिंदे अन् दुर्रानी साम्राज्य
एकीकडे श्रीमंत महाराज दत्ताजीराव शिंदे हे पराक्रम गाजवत असताना. तिकडे उत्तरेकडे एक नवीन साम्राज्य जन्माला आले. त्याचा नाव दुर्रानी साम्राज्य.आणि त्या साम्राज्याचा पहिला शासक अहमदशाह अब्दाली हा होता. तो आपल्या दुर्रानी साम्राज्याचा विस्तार करू पाहत होता. पण उत्तरे कडील इराणी तुर्किस्तान या प्रांतातील साम्राज्य कडून त्याला कडवा प्रतिकार होता. त्यामुळे त्याला तिकडे जास्त काही शक्य नाही झाले. पण दक्षिणेकडे परिस्थिती वेगळी होती. कोणे एके काळी काबुल-कंधार पासून ते पश्चिम बंगाल पर्यंत अफाट समुद्रासारखे पसरलेले मुगल साम्राज्य हे होते. या साम्राज्याचा शेवटचा पराक्रमी शासक म्हणजे आलमगीर बादशहा औरंगजेब.तो जिवंत असेपर्यंत उत्तरेकडून जास्त प्रतिकार नाही झाला. पण 1707 मध्ये औरंगजेबचा मृत्यू झाला. आणि या अफाट मोगल साम्राज्य मध्ये औरंगजेबच्या मुलांमध्ये राज्य आणि गादी वरून भांडण सुरू झाले. त्यामुळे अस्थिरता निर्माण झाली. पुढे काही काळात हे मुघल साम्राज्य पाठीचा कंबरमोडी पूर्णपणे खिळ-खिळत झाले होते.
अशाच मध्ये.अहमदशाह अब्दाली यांनी पहिला हल्ला 11मार्च 1748 रोजी केला पण यामध्ये त्याला जास्त यश नाही मिळालं. सरहिंद जवळ मनुपुर गाव पाशी मोगल सैन्य आणि अब्दालीचे सैन्य यांच्यामध्ये युद्ध झालं. त्यामध्ये अब्दालीचा पराभव झाला. आणि तो परत काबुल-कंधार कडे वळला. पण अहमदशाह अब्दाली येथेच नाही थांबला त्याने परत 1749 मध्ये दुसरा हल्ला केला यावेळी पण तो पंजाब प्रांतापर्यंत सीमित राहिला. परत त्याने 1751 मध्ये तिसर्यांदा हल्ला केला. यावेळेस तो पंजाबप्रांत पार करून सिंधू नदी जवळ आला. सारखे सारखे उत्तरेकडे होणारे हल्ले. मुघल साम्राज्यचा आधी सारखा नराहिला दबदबा किंवा वचक. यामुळे मोडकळीस आलेले मुघलसाम्राज्य यांना हल्ले थोपवणे शक्य होत नव्हते. त्यांना या वेळेस एक मोठ्याआणि बलाढ्य साम्राज्याच्या फौजेची गरज होती. आणि त्यावेळेस ती ताकद फक्त आणि फक्त मराठ्यांकडे होती. दिल्लीचा बादशहा चा वजीर यांनी सरळ मराठ्यांकडे वकील धाडला आणि करारनामा करून घेतला.या तहाचे नाव अहमदिया समझौता असे होते.हा तह 23 एप्रिल 1752 रोजी कोनोज येथे झाला.
या करारनामा किंवा तह यांच्या काही उल्लेख आपण खाली पाहू.
1.कलम पहिला :शिख,पठाण,राजपू,जाट असे देशातील सरदार किंवा राजे हे बंड पुकारून आपले आपले संस्थानिक किंवा छोटे छोटे राज्य निर्माण करू लागले. अशा देशातील बंडखोरांना त्यांच्या मुसक्या आवळून. त्यांचे पुकारलेले बंड मोडून त्यांना परत मोगल साम्राज्य मांडलिकत्व स्वीकारले लावायचे.
2 कलम दुसरा:मुगल साम्राज्य वर वारंवार होणारे परदेशी हल्ले ( उत्तरेकडून अबदाली आणि पश्चिम बंगाल मधून ब्रिटिश अशा परदेशी हल्लेखोरांचा पासून) यापासून रक्षण करणे.या आरक्षणा मोबदल्यात दिल्लीच्या बादशहाने मराठ्यांना 50 लाख रुपये खर्चासाठी द्यावेत.
3कलम तिसरा:पंजाब, सिंध,या प्रदेशातून चौथाई वसुलीचे हक्क बादशाहाने मराठ्यांना दिले ( म्हणजे मराठा सैन्याची सीमा सतलज नदी आणि सिंधू नदीपर्यंत भिडल्या म्हणजे पुढे जाऊन अब्दाली बरोबर यांचे युद्ध होणे अटळ)
4 कलम चौथा: अजमीर व आग्रा या प्रांतांची सुभेदारी पण देण्यात यावी.
5 कलम पाचवा:मराठा साम्राज्याचे प्रतिनिधी पेशवा काही कारणास्तव स्वत: येण्यास असमर्थ असेल तेव्हा त्याच्या बदल्यात झोप कोण नेमलेला आणि पेशवाई योग्य तो सही शिक्क्याचा परवाना जो मराठा सरदारा आणेल तो बादशाहाच्या तैनातीत राहून इतर मनसबदारांप्रमाणे बिनतक नोकरी बजवावी.
अशी काही महत्त्वाचे कलम होते.हा तह मोगल बादशहाचा वजीर सफ़दरजंग आणि मराठे यांच्या मध्ये झाला.पण अहमदशाह अब्दाली याला खबर होती मराठी आणि मोगल बादशहा मध्ये तह घडून येत आहे. या अधिक आणि राजकारण डाव टाकतात आपला वकील दिल्लीच्या बादशहा कडे पाठवून. राजनैतिक दबाव टाकून. सिंधू नदी कडी सर्व सुभ्याचेप्रांत आपल्याकडे करून घेतले. आणि हा तह झाल्यामुळे अब्दाली परत काबुल-कंधार कडे निघून गेलं. (अशामध्ये अब्दालीचे परत जाणे आणि तो परत न येणे असे काही खोटे गैरसमज दिल्लीच्या बादशहाच्या झाले) अब्दाली परत गेल्यामुळे दिल्लीच्या बादशाहाला अहमदिया समझौता हा तह जास्त काही महत्त्वाचा नाही वाटला. आणि त्याला जास्त लक्ष नाही दिले. हे सर्व वार्ता दिल्ली बादशहाचा वजीर सफ़दरजंग समजली. तो भयंकर संतापला आणि त्याच्यामध्ये आणि बादशहा मध्ये काहीप्रमाणात खटके उडाले. त्याने सरळ दरबारात बादशहाने अहमदशाह अब्दाली बरोबर केलेला करार मान्य नाही असे खडसावून सांगितले. ह्याच वेळेस मराठा फौजा दिल्लीच्या आसपास प्रदेशांमध्ये होते. त्यांना ही वार्ता कळल्यावर दिल्लीच्या खजिना मधून काही रक्कम घेऊन परतीच्या मार्गावर लागले. या सर्व गोष्टींमुळे दिल्लीचा बादशहा आणि वजीर यांच्यामध्ये मोठी दरी पडत चालली होती.
1754 साली परत अहमद शह अब्दली दिल्लीवर चाल करुन येऊ लागला. त्याने आपला वकील दिल्लीच्या दरबारात पाठवला. आणि मागील तेवढी खंडणी द्या असा तगादा लावला. वजीर सफ़दरजंग त्यांनी कशीबशी वकिलाला समजावून वेळ मारून नेली. त्यावेळी मराठा फौज हे दक्षिणेकडे 1752 मध्ये झालेल्या करारानुसार चौथाई वसूल करण्यासाठी निघाले. अहमदशाह अब्दाली काही वर्षानंतर 1756 दिल्लीवर चाल करून आला. 14 जानेवारी ला त्यांनी दिल्ली लुटली. ही सर्व लूट त्याने त्याने पुढे लाहोर मार्गे काबुल ला पाठवली. हे सर्व बातम्या पुण्यामधील पेशव्यांच्या दरबारात पोहोचल्या. पण त्यावेळेस पेशवे यांनी रघुनाथराव पेशवे मल्हारराव होळकर आणि दत्ताजी शिंदे यांना 15000 हजाराचा फौजफाटा देऊन दिल्लीला संरक्षण करण्यासाठी पाठवले.
तिकडे दिल्लीमध्ये परिस्थिती फार गंभीर होती अहमदशाह अब्दाली हा दिल्ली लुटून पुढे मथुरा आग्रा कडे वळाला. दिल्लीकडे यायच्या आधी त्यांनी पंजाब प्रांतांमध्ये शीख लोकांचा मोठ्या प्रमाणात कत्तली केल्या. आणि त्याच कत्तली परत तो मथुरा आग्रा मध्ये बेशुमार कत्तल करणार होता. कितीतरी मंदिरे पाडली असंख्य हिंदू लोकांची कत्तल केली. गाई आणि हिंदू लोकांची मुंडके छाटून गावाच्या वेशीवर टांगली. हे सर्व दृश्य इतके भयानक होते. शब्दात मांडणे कठीण आहे. हे सर्व हत्याकांड एवढी प्रचंड प्रमाणात झाली की नर्मदा नदीचे पाणी काही दिवस लाल रंगात वाहू लागले. म्हणजे आपण कल्पना करू शकतो किती मोठ्या प्रमाणात हत्याकांड झाले. आज पण हा विचार केला तर अंगावर काटा येतो. त्या काळातील लोकांनी काय यातना आणि अत्याचार सहन केल्या असतील हे कल्पनाच आहे पलीकडे आहे.
त्याच वर्षी रघुनाथराव पेशवे मल्हार राव होळकर महाराज दत्ताजीराव शिंदे हे सर्व मराठा फौजा घेऊन दिल्लीकडे कूच केली. अहमदशाह अब्दाली याला खबर मिळाली दक्षिणे मधून मराठाफौजा खूप मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्याने काढता पाय घेत. काबुल कडे वाटचाल चालू केली.
संदर्भ:
1.मराठी रियासतमध्य विभाग 1:गो.स. सरदेसाई
2.राजवाडे खंड 3.
3.पानिपत बखर.
4.भाऊसाहेबची बखर.
5. Net आणि विकिपीडिया
काही चूक झाली असेल तर कृपया माझ्या चुक मला दाखवून द्यावे आणि योग्य ते मार्गदर्शन करावे.
मोहित पांचाळ