दौलतगड | भोपाळगड –
महाडहून वीर रेल्वे स्टेशनकडे जाताना महाडपासून आठदहा किमीवर हायवेजवळच दासगाव आहे तिथे एक छोटासा किल्ला आहे. मोजक्याच जणांना तो माहिती आहे. या दासगावच्या किल्ल्याला दौलतगड आणि भोपाळगड अशी अजून दोन नावं आहेत. १७५६ला झालेल्या मराठे-इंग्रज संधीत सावित्री नदीच्या खाडीवरची बाणकोट, दासगाव इत्यादी अनेक ठिकाणं इंग्रजांच्या ताब्यात गेली. इंग्रजांनी या किल्ल्याचे नामकरण दासगाव फोर्ट असे करून त्यावर दोन बंगले बांधले. १७७५च्या सुमारास मराठ्यांनी हा भाग परत घेण्यासाठी प्रयत्न केले. सावित्री नदीच्या खाडीवर व महाड बंदराच्या लक्ष ठेवण्यासाठी हे ठिकाण महत्त्वाचे होते. किल्ल्यावरून खाडी, नद्यांचा संगम, नदीतली बेटं, रेल्वे ट्रॅक दिसतो.
दासगावच्या किल्ल्याची छोटीशी टेकडी संपूर्णपणे झाडीने भरलेली आहे. अवशेष तुरळक आणि झाडीत लपलेले असल्यामुळे शोधावे लागतात. पाण्यानं भरलेलं टाकं ज्याचा फोटो टाकला आहे ते या किल्ल्यावरील मुख्य अवशेष. बाकी मग चौथऱ्यांचे, बुरुजांचे, तटाचे वगैरे अवशेष, पाण्याची छोटी टाकी.
– प्रणव कुलकर्णी.