दिपमाळ, आळंदी
दरवर्षी लाखो भावीक आळंदीत ज्ञानेश्वरांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येतात. या देउऴवाड्या समोरच एक उपेक्षित ऐतिहासीक दिपमाळ उभी आहे. महाद्वाराच्या बरोबर समोर व गरुड मंडपाच्या मागे ही दिपमाळ आळंदी उभी आहे. ह्या दिपमाळेच बांधकाम सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पत्नी लक्ष्मीबाईंनी माऊलीच्या प्रसादार्थ सन १७४३ साली बांधली.
ग्वालेरहुन बोलवलेल्या शिल्पकारांनी ही दिपमाळ बांधली. या दिपमाळे ला आतून जिना असून जिन्याच्या दरवाजावर शिलालेख कोरला आहे. ही दिपमाळ सहा फूट उंच चौथ-यावर उभी असून ४० ते ५० फुट उंच आहे. दगडात घडवलेली ह्या दिपमाळेवर हात जोडून उभा असलेल्या गरुडाचे सुंदर शिल्प आहे ,तसेच दोन शरभ शिल्प व हत्तीचे शिल्प आहेत. यात हवा खेळती राहण्यासाठी दोन दगडी झरोके आहेत. वर दिवे लावण्यासाठी जागा केली आहे.
पाच थरा नंतर निमुळती होत गेलेली असून वर पाकळ्यांची कमळे कोरली आहेत. एक जहाजाचे शिल्प कोरले असून ते सरखेलांच सागरी प्रभुत्वाची मोहर आहे असे म्हंटल जाते.
पेशवेकाळात या दिपमाळेवरील एका मोठ्या कास्याच भांड्यात तेलाचा मोठा डब्बा मावेल एवढ तेल बसत.ही पेटवली की आळंदीची दिशा समजण्या साठी याची मदत होत असे. हि पेटली की गोपीकाबाई शनिवार वाड्याहून आळंदीच्या दिशेने नमस्कार करुन माऊलींच दर्शन घेत. आळंदीची दिशा दाखवणारी ह्या दिपमाळीला स्थानीक लोक दिपस्तंभ म्हणतात.
सदर दिपमाळ गरुड मंडपाची उंची तीन मजले वाढल्याने सहजा सहजी दिसत नाही.चारही बाजुला बांधकाम झाल्यामुळे तीकडे कोण फिरकत ही नाही. या दिपमाळे कडे आळंदी संस्थान ने वेळेच लक्ष नाही दिले तर यावरील शिलालेख, शिल्प, हा ठेवा काळाच्या ओघात नष्ट होईल. पुरातत्व विभागाने ही वास्तू संरक्षीत करून तिचे जतन करण्यासाठी उपाय योजना केली आहे. तेथे नामदर्शक व दिशादर्शक फलक लावावा, जेणे करुन आळंदीला येणा-या भावीकांना ही सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पत्नीनी बांधलेली दिपमाळ पाहता येइल.
महाराष्ट्रातील आनेक मंदिरा समोर असणा-या दिपमाळे पेक्षा ही प्रशस्त व भव्य दिपमाळ फक्त आळंदीच पाहायला मिळते.
“दिपमाळ उभी प्रांगणी,
उंच भिडे जणू गगनी ”
संतोष चंदने,चिंचवड,पुणे.