दिपमाळा, वाटेगाव, ता वाळवा –
दिपमाळी म्हणजे मंदिराच्या, गावाच्या वैभवाचे साक्षीदार . दिपमाळे च्या बाबतीत सांगायच तर वेगवेगळ्या प्रकारचे, आकाराचे ,उंचीचे दिपमाळा आनेक ठिकाणी मंदिरच्या परिसरात पहायला मिळतात.
देवळासमोर दिपमाळ उभारण्याची प्रथा रुढ आहे याची दिपमाळी साक्ष देत असतात. दिपमाळेवर गणपती ,शरभ ,मोर व इत्यादी शुभचिन्हे कोरलेली आढळतात. एकाच ठिकाणी आनेक प्रकारच्या दिपमाळी आपल्याला पाहायला मिळतात
वाटेगाव मधील भोगावती नदीच्या काठी दोन दिपमाळी आपल्याला नजरेत पडतात. एक दिपमाळे वर शिलालेख लिहलेला दिसतो. पण काळाच्या ओघात तो अस्पष्ट झाला आसल्याने वाचन करणे आवघड झाले आहे. अशा शिलालेखाच्या आधारे मंदिर संर्दभात किवा आनेक घराण्यांचा उल्लेख किवा संदर्भ सापडू शकतो. जेणेकरून गावाचा, घरण्याचा, मंदिराचा इतिहास समजायला सोपे जाते.बराचवेळा दिपमाळी ह्या नवसपुर्तीतूनही केल्या जातात .
वाटेगावातील या दिपमाळेच्या शिलालेखाच्या खाली दोन मानवी मूर्ती कोरल्या आहेत. कदाचीत ते स्मृतीशिल्प असाव.असा आपण अंदाज बांधु शकतो.शिलालेखाचे वाचन झाल असत तर सदर दिपमाळ कोणाच्या स्मिर्त्यथ बांधली गेली आहे याचा उलगडा झाला असता. (सदर या शिलालेखा विषयी किवा दिपमाळे विषयी माहिती असेल तर कॉमेंट मध्ये लिहावे.)
दिपमाळेवर शिलालेख वरुन दिपमाळ कोणी व केव्हा बांधली याच संर्दभ लागण्यास मदत होते. अशा दिपमाळी मराठेशाहीतील वाटेगावच्या इतिहासाचे साक्षीदार आहेत.दिपमाळेवर शिलालेख वरुन दिपमाळ कोणी व केव्हा बांधली याच संर्दभ लागण्यास मदत होते. अशा दिपमाळी मराठेशाहीतील वाटेगावच्या इतिहासाचे साक्षीदार आहेत.
”दिपमाळ उभी मंदिर प्रांगणी , उंच भिडे जणु गगनी.”
संतोष मु चंदने, चिंचवड, पुणे.