महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,11,281

मुस्लीम राजवटीत स्त्रीचे चारित्र्यहनन आणि धर्मांतरण एक कट

Views: 1877
4 Min Read

मुस्लीम राजवटीत स्त्रीचे चारित्र्यहनन आणि धर्मांतरण एक कट –

मुसलमानी राजवटीत सामान्य जनतेचे हाल , जिझिया कर , जबरदस्ती धर्मांतरण , स्त्रियांवरील अत्याचार , सार्वजनिकरीत्या हत्याकांड यांचे अनेक दाखले इतिहासात आढळून येतात. श्रीशिवदिग्विजय बखरीत एका स्त्रीचे चारित्र्यहनन करून तिला बाटविण्याचा एक प्रसंग पुढीलप्रमाणे नमूद आहे. परंतु न्यायाधीशाच्या प्रसंगावधान आणि चतुराईमुळे सदर स्त्रीस न्याय मिळाला.(मुस्लीम राजवटीत स्त्रीचे चारित्र्यहनन)

एका गावातील ब्राम्हणाची लावण्यवती सून त्याच गावातील एका मुस्लीम व्यक्तीस आवडली. त्या स्त्रीशी संभोगार्थ सदर मुस्लीम व्यक्ती त्या स्त्रीच्या मागे लागली. सदर स्त्रीस त्याने आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवली परंतु सदर स्त्री त्या मुस्लीम व्यक्तीस वश झाली नाही त्यामुळे काही काळ वाट पाहून सदर मुस्लीम व्यक्तीने त्या स्त्रीस बाटविण्याचा व तिच्या चरित्राला कलंक लावण्याचा एक कट तयार केला.

एके दिवशी या मुस्लीम व्यक्तीने काही शिजवलेले मांस व काही कच्चे मांस घेऊन त्याची गाठोडी बांधली. सदर ब्राम्हण स्त्री रोज स्नानास , पाणी भरण्यास , कपडे धुण्यास व इतर नित्याच्या कामास गंगानदी किनारी जात असे. सदर स्त्री आपल्या नित्यकामात व्यस्त असताना या मुस्लीम व्यक्तीने तिच्या नकळत मांस असलेले गाठोडे तिच्या सामानाच्या टोपलीत लपवून ठेवले. सदर स्त्री तिची नित्य कामे आटोपून आपली सामानाची टोपली घेऊन घरी मार्गस्थ झाली.

सदर स्त्री घरी पोहचताच तिच्या मागावर असलेला मुस्लीम व्यक्तीदेखील तिच्या मागोमाग घरी आला. काही कामानिमित्त सदर स्त्रीचा पती त्यादिवशी बाहेरगावी गेला होता. घरात त्या स्त्रीचे सासरे होते त्यांनी त्या मुस्लीम व्यक्तीस तिथे येण्याचे कारण विचारले. सदर मुस्लीम व्यक्तीने सदर स्त्री हि माझ्याशी दोन वर्ष संबंध ठेवून असल्याचे सांगितले. आज तिने माझे अन्न व मांस भक्षण केले व उरलेले टोपलीतून घेऊन घरी आली. सदर घटनेचा सहनिशा करण्यासाठी सदर स्त्रीच्या सामानाच्या टोपलीची पाहणी करण्याची मागणी त्याने त्या स्त्रीच्या सासऱ्याकडे केली त्यानुसार त्या स्त्रीच्या सामानाच्या टोपलीत काही शिजवलेले मांस व काही कच्चे मांस यांचे गाठोडे आढळून आले.

सदर मुस्लीम व्यक्ती सदर स्त्रीच्या बदल्यात २ रुपये देण्यास तयार झाला तसेच ह्या स्त्रीस माझ्या स्वाधीन करा अशी मागणी करू लागला. परंतु सदर ब्राम्हण स्त्रीने शपथेवर हे खोटे असल्याचे सांगितले व सदर मुस्लीम व्यक्ती आपणास त्रास देत असल्याचे कथन केले. सदर बनाव हा मुस्लीम व्यक्तीचा आहे. त्यामुळे सदर स्त्रीवर विश्वास ठेवून तिच्या सासऱ्याने सरकार दरबारी न्यायासाठी मागणी केली. त्या मुस्लीम व्यक्तीने आप्तस्वकीयांच्या मदतीने आधीच आपले म्हणणे सरकार दरबारी अधिकाऱ्यांसमोर कथन केले. न्यायदान करणाऱ्या हकीमाने ब्राम्हणाचे म्हणणे ऐकून घेतले. सदर मुस्लीम व्यक्ती सदर स्त्रीच्या बदल्यात ४ रुपये देण्यास तयार झाली . सर्वत मुस्लीम राजवट त्यामुळे सदर मुस्लीम व्यक्तीच्या विरोधात न्याय दिल्यास त्यांच्याकडून उपद्रव होण्याची भीती.

सदर न्यायाधीशाने अशा बिकट प्रसंगी स्त्रीस समक्ष बोलावून तिला उल्टीचे औषध दिले. जेणेकरून तिने भक्षण केलेले सर्व भोजन बाहेर पडावे. सदर औषध इतके जालीम होते कि त्या स्त्रीची पोटातील आतडी तुटेपर्यंत तिला उलट्या झाल्या. परंतु उल्टीमध्ये कोणतेही मांस आढळून आले नाही. सदर ब्राम्हण स्त्री निर्दोष ठरली व मुस्लीम व्यक्ती दोषी. त्यामुळे सदर स्त्रीची चोळीबांगडीने ओटी भरून तिच्या सासऱ्यासोबत सन्मानाने घरी पाठवण्यात आले. सदर मुस्लीम व्यक्तीचे घर लुटून त्यास गावाबाहेर काढण्यात आले.

लेखन आणि संकलन :- नागेश मनोहर सावंत देसाई

संदर्भ :- श्रीशिवदिग्विजय बखर

Leave a Comment