देशमुख गढी, डोंगरकिन्ही –
बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्ही गावात देशमुखांची गढी आहे. पाटोदा हे तालुक्याचे गाव बीडपासून ५० कि.मी अंतरावर आणि डोंगरकिन्ही पाटोद्यापासून १७ कि.मी अंतरावर आहे.
गढी आता अखेरची घटका मोजत आहे. गढीची तटबंदी आणि काही बुरूज शिल्लक आहेत. आतील सर्व आणि बाकी बुरूज, तटबंदी पूर्णपणे ढासळले आहे. एकूण ४-५ एकरावर असलेली ही गढी त्याकाळी किती वैभवशाली असेल ह्याची साक्ष देते. पूर्वी वतनदार, जहागिरदार, पाटील लोकांच्या गढ्या असत त्यापैकीच ही असावी. ह्यांचे वंशज पुणे, मुंबईत असतात त्यामुळे देखभाल होत नाही. गावकर्यांनाकडे इतिहास उपलब्ध नाही. तरी जाणकारांनी माहिती द्यावी ही विनंती.ह्यांचे वंशज पुणे, मुंबईत असतात त्यामुळे देखभाल होत नाही. गावकर्यांनाकडे इतिहास उपलब्ध नाही. तरी जाणकारांनी माहिती द्यावी ही विनंती.
टीम – पुढची मोहीम
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल
हि गढी देशमुख कानडे यांच्या मालकीची असून ह्या गढीचे सर्व वंशज पुण्यात स्थायिक झालेले आहेत.. पुण्यातील आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठान चे संस्थापक आणि अध्यक्ष असलेले श्रीधर व्यंकटेश कानडे – देशमुख उर्फ बाबुराव कानडे यांचे बालपणी काही काळ वास्तव्य ह्या गढीत झालेले आहे..