महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,06,154

धाबादेव लेणी | यादवकालीन खानदेश भाग १०

Views: 1441
3 Min Read

यादवकालीन खानदेश भाग १० | धाबादेव लेणी –

यादव मेलुगी याचा धाबादेव शिलालेख या शिलालेखाचा शोध द. रा. भट यांनी लावला. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील बोराडी गावाजवळ नऊ किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. तेथे एक भग्न देवालय आणि काही अवशेष आहेत. त्याच लेखाची शिळा पडलेली आहे.  ह्या लेखाचे संपादन आणि वाचन द. रा. भट आणि शं. गो. तुळपुळे यांनी केले आहे. संशोधक वर्ष २६ अंक एक ते चार पृष्ट ७८ ते ८० यात तसेच तुळपुळे यांचा मराठी कोरीव लेख यांनी केले आहे. लेखाची भाषा मराठी आहे. लेखात सिंघणदेवाचा पुत्र मेलुगिदेव याने कोंडव्व देवीचे मंदिर आणि वापी बांधल्याचा निर्देश आहे. हा सिंघणदेव देव म्हणजे यादव वंशातील सिंघण देव प्रथम होय. या लेखात तिथीचा  स्पष्ट उल्लेख नाही कारण अक्षरे वेगळी पडली आहे. तरीही तो “सहस्र-नवसिकावरि”  असे वाचल्यास त्याचा काळ इसवी सन ११६७  या लेखाची तारीख होईल.(खानदेशातील अभिलेख वैभव, ब्रम्हानंद देशपांडे)(यादवकालीन खानदेश १० | धाबादेव लेणी)

धाबादेव लेणी –

बोराडी जवळ सातपुड्याच्या पायथ्याशी दोन नाल्यांच्या संगमावर धाबादेव लेणी आहे. ही लेणी सातव्या शतकातील यादवकालीन असल्याचे सांगण्यात येते. येथील लेणी दगडावर नक्षीकाम करुन सर्व दगड एकमेकांवर रचल्याप्रमाणे ठेवले आहेत. विशेष म्हणजे हा दगड बाहेरुन आणलेला असावा कारण परीसरात अशा प्रकारचा दगड मिळत नाही. .सध्या तीन खोल्या(गाळे) शिल्लक आहेत. पुर्वी येथे १८ गाळे असावेत असे अवशेषांवरून वाटते. प्रत्येक खोली साधारण चार फुट लांब व रुंद असुन,ऊं चीसुद्धा चार फुट पर्यंत आहे. भिंतींवर नक्षीकाम असुन वेगवेगळ्या कोरीव मुर्त्या बसविलेल्या आहेत. छत चौकोणी आकाराचे असुन त्यावर वर्तुळात पानाफुलांची सुबक नक्षी काढलेली आहे. खांबाच्या वर यक्षांची मुर्ती काढलेली आहे. याठिकाणी पद्मासन अवस्थेतील गौतम बुद्ध, महावीर, महादेव, विष्णु, हनुमान, यक्ष, अशा वेगवेगळ्या सुबक कोरीव काम केलेल्या अनेक मुर्त्या आहेत. व अनेक मुर्त्या परिसरात विखुरलेल्या आहेत. अजिंठा-वेरुळ सारख्या हत्ती, माणसांच्या कोरीव नक्षीकाम केलेल्या मुर्त्यापण आहेत.

20/25 वर्षापुर्वी एक शिलालेख चांगल्या अवस्थेत होता. आज त्याचे तुकडे झाले आहेत. चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी येथे अतिशय घनदाट जंगल होते. येथे येण्यासाठी रस्ताही नव्हता.   काही जाणकारांच्या मते इथे तप- साधना होत असावी किंवा उत्तर-दक्षिणेकडुन येणारे धर्मसाधकांसाठी थांबण्याचे ठीकाण असावे.जवळच अतिशय निसर्गरम्य वातावरण असुन नाल्यांवर तीन-चार धबधबे आहेत. पाऊस पडल्यानंतर फेसाळणारे पांढराशुभ्र पाणी पाहुन मन आनंदित होते. यामुळे येथे पर्यटकांचा वावर वाढला आहे. सध्या ही लेणी मोडकळीस आली असुन छताच्या दगडांना तडे पडले आहेत. जर डागडुजी केली नाही तर छत पडुन लेणी अस्तित्व व इथला इतिहास नष्ट होईल. त्या काळात इथे जवळपास वस्ती असली पाहीजे शिरपूर तालुक्यातील अतिशय पुरातन, ऐतिहासिक ठेवा आहे व तो जतन झाला पाहीजे. नवादेवी, गुर्हाडपाणीचे तोरणमाळसारखे निसर्गसौंदर्य, धाबादेव लेणी, दुर्बड्याचे मुळ बिजासनी मंदीर, बिजासन अशा भागाला पर्यदनाच्या दृष्टिने महत्त्व येऊन या भागाचा विकास होऊ शकतो.

फोटो गणेश भामरे बोराडी*

कोंडव्व देवीचे मंदिर लेणीतील शिल्पांवरून ती नाथपंथी असावी असे दिसते पण काहींच्या मते ती जैन असावी.

Leave a Comment