महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,25,495

मराठ्यांची धास्ती आणि औरंगजेबचा खंदक

By Discover Maharashtra Views: 1647 2 Min Read

मराठ्यांची धास्ती आणि औरंगजेबचा खंदक….

इंग्रज हिंदुस्थानात व्यापारासाठी आले पुढे ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली पण कंपनीची अरेरावी खटकु लागल्याने इंग्लड मधील व्यापार्यांनी ‘न्यू इंग्लिश कंपनी’ सुरु केली याच बरोबर जुन्या ईस्ट इंडिया कंपनी बंद करण्यात यावी यासाठी ३ वर्षाची मुदत देखील देण्यात आली…(मराठ्यांची धास्ती आणि औरंगजेबचा खंदक)

आता या नव्या कंपनीला हिंदुस्थानात मोगल बादशाह कडून पूर्वीच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या सर्व सवलती मिळाव्यात म्हणुन इंग्लडच्या राजाने वकील म्हणुन ‘सर विलियम नॉरिसला’ बादशाह औरंगजेबाकडे हिंदुस्थानात पाठवले पुढे दोन्ही कंपन्या एकत्र झाल्याने नॉरिसची वकिली वाया गेली पण भेटी दरम्यान त्याने दैनंदिनी टिपुन ठेवली २५ जानेवारी १७०१ रोजी नॉरिस सुरतेहुन औरंगबादकडे निघाला २२ फेब्रुवारी १७०१ रोजी शहागड (औरंगबाद) गावी आला या ठीकाणी सुरतेच्या एका सुप्रसिद्ध व्यापाऱ्याची वखार होती तिथे मराठ्यांनी धुमाकुळ घातला होता…

“मोठमोठे मोगल अधिकारी प्रवास करण्यास घाबरत इतका त्यांना मराठ्यांचा धाक वाटत” असे त्याने नमुद केले आहे…

मराठ्यांचे सातारा, पन्हाळगड इत्यादी किल्ले जिंकण्यासाठी औरंगजेबाने ब्रम्हपुरीहुन मिरज मार्गे पन्हाळगडाकडे प्रस्थान केले होते औरंगजेबच्या प्रवासाची ही माहिती जमा करुन त्याच्या मागाहुन नॉरिस २७ मार्च १७०१ रोजी मिरजेस पोहोचला.. बादशाह औरंगजेब नुकताच इथे राहुन गेला होता त्याच्या छावणीची जागा नॉरिसने पाहिली छावणी भोवतीचा संरक्षण ‘खंदक’ पाहुन नॉरिसला हसु आले तो म्हणतो.., “हा कसला खंदक… सहा-सात वर्षाचे मुलसुद्धा हा खंदक सहज ओलंडु शकेल…”

संदर्भ : Norris Embassy to Aurangjeb- Haridaas.

लेखक अपरिचित

Leave a Comment