महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,24,154

धुमाळ देशमुख वाडा, पसुरे

By Discover Maharashtra Views: 1700 2 Min Read

धुमाळ देशमुख वाडा, पसुरे, ता.भोर जि. पुणे –

या धुमाळ देशमुख घराण्यास “आढळराव” हा किताब आहे. हे वेळवंड खोऱ्याचे देशमुख घराणे सध्याच्या भोर शहरापासून अवघ्या ११ किमी अंतरावर असणारे भोर-भोलावडे-बारे मार्गावरील पसुरे गावाच्या मध्यभागी धुमाळ देशमुखांचा पूर्वाभिमुखी वाडा पहावयास मिळतो.गावाच्या दिशेने प्रवेश केल्यावर एका बाजूला सरसेनापती येसाजी कंक जलाशयाचा मनमोहन नजरा आपल्याला बघायला मिळेल वाटेत ग्रामदेवता मागे ठेऊन उतराने पुढे आल्यावर उजव्या हातास धुमाळ वाडा नजरेस पडतो.गावात एकूण तीन वाडे आहेत देशमुखांनाचे त्यातली दोन वाडे भग्नावस्थेत जलाशयात आहेत म्हणतात.हा तिसरा वाडा, वाड्यासमोर उभे राहिल्यावर चौकोनी विटा आणि घडीव दगड यांनी बांधलेला हा वाडा आजही मोठ्या दिमाखात उभा आहे.

वाड्याचे जोते घडीव दगडाचे असून कोठेही दगडात कसलीही इजा पोहचलेली नाही.दरवाजाची जुनी सुस्थितीत असलेली आठ फूट उंचीची चौकट आणि तिला पूर्वी प्रमाणे नवीन बसवलेला दरवाजा त्याच्या मूळ रूपाची कल्पना करून देतो.दरवाज्याला लागूनच डाव्या बाजूस लाकडी जिना आहे.दरवाजातून आत प्रवेश केल्यावर आपण वाड्याच्या मुख्य चौकात ( दिवाणखान्यात ) येतो.

दिवाणखान्यात आल्यानंतर काचेच्या हंड्यानी सजलेला भाग आपल्या नजरेस पडेल.वाड्यातील लाकूडकाम हे जुन्या व नव्या आधुनिक सुतारकामाने आपणास थक्क करते.दिवाणखान्याला लागूनच शेजारी देवघर आहे.सागवानी जुना कलात्मक घडणीचा देव्हारा आपले सारे चित्त वेधून घेतो. देव्हाऱ्यात असणारी पांडुरंगाची मूर्ती आणि रखुमाई ची खूपच आकर्षित आहे.अशी मूर्ती फार कमी ठिकाणी आपल्याला पहावयास मिळेल.विष्णू ची मूर्ती फार देखणी विलक्षण आहे.

दिवाणखान्यातच आपल्याला शस्त्र पहावयास मिळतात.दोन तलवारी , एक कट्यार , एक भाला हे सर्व शस्त्र पाहून अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही.त्यातील एका तलवारीच्या मुठीवर सोन्याचं काम केल्याचं दिसून येते.काही जुनी शिवराई , फारसी नाणी देखील आहेत.त्यात सोबत पत्र समाप्तीची मुद्रा (शिक्का) आहे. त्यावरील मजकूर ” मोर्तब सूद ” असा आहे.अनेक पत्रे आणि महजर मध्ये या घराण्याचा उल्लेख आपल्याला पहावयास मिळतो.

देशमुखांचा हा वाडा इतिहासाची साक्ष देत अजूनही भक्कमपणे उभा आहे!

माहिती साभार – Sanket Phadke

Leave a Comment