दिपमाळ –
महाराष्ट्रातील मंदिर स्थापत्याचा एक अविभाज्य घटक, दिपमाळ म्हणजे मंदिराच्या आवारात किंवा देवासमोर दिवे लावणी साठी उभा केलेला आणि जमिनीपासून आकाशाकडे निमुळता होत गेलेला स्तंभ. सर्वसाधारण पणे दिपमाळ ही वर्तुळाकार, षटकोनी तर काही ठिकाणी अष्टकोनी असतात, यावर दिवे लावण्यासाठी पायऱ्या, दगडी कोनाडे अथवा दगडी हात बनवलेले असतात.. कमीत कमी १० फूट इतक्या उंचीच्या दिप माळ महाराष्ट्रात बघायला मिळतात, काही ठिकणी मात्र याहून कमी उंचीच्या दिपमाळ सुद्धा उभ्या आहेत.
शिलाहार-यादव काळातील मंदिरस्थापत्यात दिपमाळआढळत नाहीत, यामुळं त्या नंतर आलेल्या इस्लामिक राजवट आणि इस्लामिक स्थापत्याच्या मिनार या शिल्पप्रकारातून पुढे हिंदू स्थापत्यात दीपस्तंभ, दिपवृक्ष आणि दिपमाळहा प्रकार पुढे आला असावा असाही एक विचारप्रवाह आहे. उंच खांबावर कापूर किंवा दिवे लावण्याची पद्धत महाराष्ट्रासह दक्षिण भारतात दिसून येते, अश्या खांब रचनेला दीपस्तंभ म्हणतात.
उत्सव प्रकरणी या दिपमाळा पणत्यांच्या उजेडात लखाखून उठतात, पुणे जिल्ह्यातील चास गावातील प्राचीन सोमेश्वर मंदिरा समोरील अडीचशे पनतींच्या जागेची भव्य दिपमाळ, ही सर्वात मोठी मानली जाते. नवस म्हणून मंदिर आवारात दिपमाळ उभारण्याची प्रथा मराठेशाहित पुढं आली, याचाच परिणाम म्हणजे जेजुरीच्या खंडोबाच्या मंदिर परिसरात साडेतीनशे च्या वर दिपमाळा आज उभ्या आहेत. चार हत्तींनी तोललेली फोटोतील दिपमाळही किल्ले वल्लभगड वरच्या श्री मरगुबाई देवी च्या मंदिरा समोरील आहे. याचाच परिणाम म्हणजे जेजुरीच्या खंडोबाच्या मंदिर परिसरात साडेतीनशे च्या वर दिपमाळा आज उभ्या आहेत. चार हत्तींनी तोललेली फोटोतील दिपमाळही किल्ले वल्लभगड वरच्या श्री मरगुबाई देवी च्या मंदिरा समोरील आहे.
– महेश तानाजी देसाई
– महेश तानाजी देसाई