महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,10,453

दिपमाळा जेजुरीच्या, जेजुरी

Views: 1372
2 Min Read

दिपमाळा जेजुरीच्या, जेजुरी –

मल्हारमार्तंड, जेजुरीचा खंडोबा महाराष्ट्राच कुलदैवत. त्याच प्रमाणे कर्नाटक, तेलंगणा व आंध्रप्रदेश मधील ही लोकांच श्रध्दास्थान. मंदिराच्या पुर्ण परिसरात क-हे पठार ते खालच टेकडीवरच मंदिर व त्यावर येणारे तिनही  मार्गावर आनेक कमानी, अोव-या, दिपमाळ प‍ाहायला.दिपमाळा जेजुरीच्या. मिळतात. ह्या दिपमाळी म्हणजे जेजुरीगडाच्या वैभवाचे साक्षीदार .

नोंदीनुसार गडाला १४ ते १८ कमानी , ६३ पेक्षा जास्त अोव-या व जवळ जवळ लहान मोठे ३०० पेक्षा जास्त दिपमाळी आहेत व २२ पेक्षा जास्त शिलालेख आहेत.

शिलालेखाच्या आधारे मंदिर संर्दभात आनेक घराण्यांचा उल्लेख सापडतो यात सरदार होळकरांचा महत्वाचा वाटा आहे. यात आपाजी सोमवंशी , रघुजी कदम श्री गोंदेकर , मल्हारजी होळकर आकोलकर , त्रंबकराव शिवदेव ई. उल्लेख सापडतो. तसेच मंदिरासाठी सरदार विंचूरकर व दाभाडे यांचा ही योगदान आहे.

दिपमाळे च्या बाबतीत सांगायच तर वेगवेगळ्या प्रकारचे, आकाराचे ,उंचीचे दिपमाळ पाहायला मिळतात. या दिपमाळेवर गणपती ,शरभ व  शुभचिन्हे  आढळतात. आनेक दिपमाळी ह्या नवसपुर्तीतून झाल्या आहेत. देवळासमोर दिपमाळ उभारण्याची प्रथा रुढ होती. जेजुरीवरील शेकडो दिपमाळा याची साक्ष देतात.

एकाच ठिकाणी आनेक प्रकारच्या दिपमाळी येथे पाहायला मिळतात. ऐका दिपमाळेवर शिलालेख वाचायला मिळतो या वरून दिपमाळ कोणी व केव्हा बांधली याच संर्दभ लागत.‍ काही दिपमाळींच नव्याने काम चालू आहेतर काहींची डागडुजी चालू आहे. जेजुरीगडा वरील अभ्यासपुर्ण या दिपमाळी मराठेशाहीतील इतिहासाचे साक्षीदार आहेत.

”दिपमाळ उभी मंदिर प्रांगणी , उंच भिडे जणु गगनी.”

संतोष मु चंदने, चिंचवड, पुणे.

Leave a Comment