महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,09,255

महाकाय दुर्गादेवी मुर्ती, बाबुपेठ, चंद्रपूर | Durga Devi Murti, Babupeth

Views: 1370
2 Min Read

महाकाय दुर्गादेवी मुर्ती, बाबुपेठ | Durga Devi Murti, Babupeth –

महाकाली मंदिरापासून अवघ्या २ किमी अंतरावर अजून एक अभूतपूर्व गोष्ट आहे. ती म्हणजे भिवापूर वार्ड येथे ४०० वर्ष पुरातन देवीची २६ फुट लांब आणि १८ फुट रुंद अशी एकपाषाणी विशाल दहा तोंड असलेली दुर्गादेवीची मूर्ती. या मूर्तीचे सगळ्यात महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य असे कि देवी दशभुजाधारी असून प्रत्येक हातात शस्त्र आहे. दहा तोंड असलेली या प्रकारातील दुर्गादेवीची मूर्ती क्वचितच कुठे बघावयास मिळते. या मूर्तीला दहा तोंड असल्यामुळे अनेक लोक या महाकाय दुर्गादेवी मुर्तीस लंकापती रावण समजून विजयादशमीला दगड मारुन आपला प्रतिकारक व्यक्त करत असत. त्यामुळे मुर्ती थोड्या प्रमाणात विद्रूप झाली. कालांतराने या मूर्तीची ओळख होऊन हा गैरसमज दुर झाला आणि हि परंपरा बंद झाली.

गोंड राजवटीतील अनेक किल्ले मंदिरे, इत्यादीपासून प्रेरणा घेऊन १६व्या शतकातच्या दरम्यान बाबुपेठ येथे राहणाऱ्या रायप्पा वैश्य यानी भव्य शिव मंदिराची उभारणी करण्यासाठी अनेक मूर्तीची निर्मिती केली या मूर्तीखेरीज मत्स्यावत, कूर्मावतार, शिवलिंग, नंदी, हनुमान, गणेश, कालभैरव, हत्ती, शेषनाग, गरुड इत्यादी मूर्ती देखील तयार केल्या. मात्र हे शिवालयाचे कार्य प्रगतीपथावर असतांनाच रायप्पा वैश्य याचा मृत्यू झाला आणि हे देवालयाचे काम कायमचे अधुरे राहिले म्हणूनच या मंदिराला “अपुर्ण देवालय” असे म्हणतात. उन वारा पाउस यांच्याशी दोन हात करत ४०० वर्ष उलटूनही ही विशाल दुर्गामूर्ती आपलं अस्तित्व टिकवून आहे. नागपूर पुरातत्त्व विभागाने या मूर्तीचे वैशिष्ट्य लक्ष्यात घेता या मूर्तीची प्रतिकृती तयार करून मध्यवर्ती संग्रहालयात ठेवली आहे.

माहिती – विशाल देवकर

Leave a Comment