दुर्गयात्रा महाराष्ट्राची
महाराष्ट्र हा दुर्गांचा प्रदेश आहे . महाराष्ट्र गडकिल्ल्यांनी समृद्ध प्रदेश आहे .महाराष्ट्रामध्ये सातवाहन ,चालुक्य , सेन्द्रेक, वाकाटक ,गोंड,मराठे ,बहमनी ,इंग्रज ,पोर्तुगीज ,डच ,फ्रेंच आदींनी किल्ले बांधले .नेमका कोणता किल्ला कोणी बांधला हे काही अपवाद सोडल्यास सांगता येणेही कठीण आहे .या किल्ल्यांचा लष्करी दृष्टीने अतिशय उत्तम उपयोग छत्रपती शिवाजी महाराजांनी केला .या किल्ल्याच्या सहायाने त्यांनी स्वतंत्य राज्याची स्थापना केली .किल्ले हे स्वतंत्र प्रेरकेची प्रतीके ठरली .आजही हे किल्ले आपल्याला ललामभूत आहेत .महाराष्ट्रामध्ये जलदुर्ग ,स्थलदुर्ग ,किनारदुर्ग ,गिरिदुर्ग ,वनदुर्ग प्रकारचे किल्ले असून गढ यांची संख्या लक्षणीय आहे .भूभागाच्या वीशित्थे प्रमाणे किल्ल्यांची बांधणी त्या त्या भागात झालेली दिसते. या किल्ल्यांचे हितगुज एकानासाठी त्याच्या यशोगाथा एकण्यासाठी या किल्ल्यांची “” दुर्गगाथा ” आपल्याला निशित प्रेरणादायी ठरेल .किल्ल्यांचे नेमके स्थान ,उंची ,प्रकार ,तसेच त्यासाठी लागणारी साधने ,वेळ .श्रम ,यांची योग्य सांगड घातल्यास आपली दुर्गयात्रा निच्सित आनददायी ठरेल.
भुईकोट किल्ला (स्थलदुर्ग)
यांमध्ये चाकणचा किल्ला किंवा शनिवारवाडा यांसारखे किल्ले येतात. भुईकोट किल्ल्याचा छोटा प्रकार म्हणजे गढी. सरदारांच्या, सावकारांच्या, इनामदारांच्या आणि देशमुख-पाटलांच्या अशा गढ्या महाराष्ट्राच्या अनेक गावांत आहेत. गढ्यांना किल्ल्यांप्रमाणेच, पण कमी प्रमाणात संरक्षण असे. गढीपेक्षा लहान म्हणजे वाडा. हे तर असंख्य आहेत.
काही भुईकोट किल्ले
अचलपूरचा किल्ला
अमरावतीचा किल्ला
अहमदनगरचा किल्ला
अकोल्याचा किल्ला
इंदुरीचा किल्ला
चाकणचा किल्ला
जवाहरचा किल्ला
शनिवारवाडा
सोलापूरचा किल्ला
जलदुर्ग
समुद्राचे पाणी चहूबाजूंनी असणारे हे किल्ले. या किल्ल्यांवर बहुधा होडीने जावे लागते. काही किल्ल्यांना समुद्राच्या ओहोटीच्या वेळी उथळ पाण्यातून किंवा किंवा पाण्यातून वर आलेल्या पायरस्त्यावरून पायी पायी जाता येते. तर काही किल्ल्यांना तीन बाजूंनी पाणे आणि चौथ्या बाजूने किल्ल्यावर जाण्यासाठी सरळ वाट असे. अलिबाग, सिंधुदुर्ग, मुरुड जंजिरा ही जलदुर्गांची उदाहरणे. समुद्रावरून येणाऱ्या आक्रमणाची पूर्वसूचना मिळून प्रतिकार करण्यासाठी या किल्ल्यांचा उपयोग होत असे.
काही जलदुर्ग
अलिबाग
गोपाळगड
तारापूर
माहीम
मुरुड जंजिरा
वसई
विजयदुर्ग
सिंधुदुर्ग
सुवर्णदुर्ग