महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,09,311

दूर्गवीर प्रतिष्ठान

Views: 4248
3 Min Read

दूर्गवीर प्रतिष्ठान…

दुर्गवीर म्हटलं कि श्रमदान असा एकाच विचार सर्वांच्या मनात येतो. पण हे श्रमदान म्हणजे काय? कोण करतात हे श्रमदान? जे श्रमदान करतात त्यांना मोबदला काय मिळतो? श्रमदानाशिवाय इतर काही कामे करतात कि नाही हे दुर्गवीर / दुर्गवीरांगणा? कधी करतात हे श्रमदान? यासाठी लागणा-या आर्थिक बाबींचा ताळमेळ कसा बसविला जातो? हे आणि असे अनेक प्रश्न उभे राहतात याची उत्तर हवी असतील दुर्गवीर प्रतिष्ठान म्हणजे काय हे समजून घ्या!!!दुर्गवीर प्रतिष्ठान म्हणजे हि म्हटली तर संस्था म्हटलं तर कुटुंब !  इथे येणारा प्रत्येकजण शिवरायांवरील प्रेमाखातर येत असतो. त्याच्या मनात कुठेतरी विचार असतो शिवरायांनी निर्माण केलेल्या वाढविलेल्या या स्वराज्याचे योग्य संगोपन आपण करायचे.

दुर्गवीर हा परिवार सध्या खूप मोठा झालाय मा. श्री संतोष हसुरकर यांनी काही मोजक्या मावळ्यांना घेऊन उभारलेल्या ह्या संस्थेच वटवृक्ष झाले आहे. गरज आहे ती रोज हा वृक्ष जोपासायची. दुर्गवीर सर्व वीर/ वीरांगना ह्या काम, घर सांभाळून ह्या शिवकार्यात हातभार लावतात. प्रत्येक दुर्गवीर आतुरतेने शनिवार ची वाट पाहत असतो. कधी शनिवार येतो आम्ही मोहिमेला जातो.

श्रमदान म्हणजे काय? तर कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता जे श्रम केले जाते ते श्रमदान! दुर्गवीर चे वीर/ वीरांगना हे श्रमदान करतात. यासाठी येणार खर्च हा कोणी दुसरा देत नाही तर दुर्गवीर चे वीर/वीरांगना स्वताच्या खिशातून करतात! हा एखादे दानशूर व्यक्ती असतील आणि त्यांची श्रमदान करायची मानसिक इच्छा असेल पण शरीर किंवा परीस्थिती साथ देत नसेल तर अश्या व्यक्ती काही आर्थिक मदत संस्थेस करतात. यातूनच श्रमदानासाठी लागणा-या वस्तू विकत घेतल्या जातात. आज मितीपर्यंत संस्थेत कुदळ, फावडे, चेन पुली, घमेली अशी अनेक अवजारे याच प्रकारच्या दानातून घेतल्या आहेत.
पण एवढे सर्व किल्ले सांभाळायचे तर नक्कीच या वस्तू पुरेश्या नाहीत. म्हणूनच गरज आहे तुमच्या सहकार्याची तुम्ही सुद्धा आम्हाला मदत करू शकता वस्तू किंवा निधीस्वरूपात. आज गडाच्या प्रत्येक वाटेवर फलक लावायची गरज आहे त्या लोखंडी बोर्ड साठी लागणारा खर्च, पावसाळ्यात टाक्यांचा उपसा करण्यासाठी मोटार पंप, टाक्यातील मोठया शिळा (दगड) हलविण्यासाठी चेन पुली, इत्यादि… आज दुर्गवीर प्रतिष्ठान श्रमदानासोबत गडाच्या घे-यातील आदिवासींना मदत करण्याचेही कार्य करते. गडाच्या घे-यातील मुलांना इतर संस्थाच्या माध्यमातून शालेय वस्तू पुरविणे, विविध शाळांना लेझीम, शालेपयोगी वस्तू पुरविणे यासारखी कार्य दुर्गवीर प्रतिष्ठान ने आत्तापर्यंत पूर्णत्वास नेली आहेत. यासारखी अनेक कार्ये यापुढे पूर्ण करण्याचा दुर्गवीर चा मानस आहेतुम्हाला प्रत्येक श्रमदान मोहिमेस उपस्थित राहता येत नसेल इतर माध्यमातून आम्हाला सहकार्य करू शकता.

सहकार्यासाठी संपर्क 

संतोष हसुरकर :- ९८३३४५८१५१

अजित राणे :- ९८२०९४०६३६

नितीन पाटोळे :- ८६५५८२३७४८

———

दुर्गवीर प्रतिष्ठान बँक खात्याची सपुंर्ण माहिती

Account Name :- Durgveer Pratishthan

Bank Name :- Bank of BarodaAccount No :- 04060100032343

IFSC Code :- BARB0CHANDA * (Fifth character is zero)

Account  :- Saving

Branch Name :- Chandavarkar Road, Matunga, Mumbai.

 
खांदेरीचा रणसंग्राम

Leave a Comment