महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,27,434

एकमुखी दत्तमंदीर श्री क्षेत्र नारायणपूर

By Discover Maharashtra Views: 3864 2 Min Read

एकमुखी दत्तमंदीर

आपण पुण्याच्या दक्षिणेला असलेल्या दिवेघाटातून सासवडला जाऊन तेथून पुढे नारायणपूर ला जाऊ शकतो किंवा सातारा रोडने गेल्यास कापूरओहोळ वरून डावीकडे वळून नारायणपूरकडे पोहोचू शकतो. हे स्थान ऐतिहासिक पुरंदर किल्याच्या पायथ्याशी आहे. नारायणपूर हे श्री. चांगदेव महाराजांचे गाव आहे. यागावात जूना औंदूंबर वृक्ष आहे. पूरातन शिवमंदीर हेमाडपंथी आहे. श्री. नारायण महाराज यांनी येथेच तपश्चर्या केल्याचे सांगतात.

पुण्यापासून साधारण ३०-३५ किमी अंतरावर असलेले हे दत्तमंदीर सर्वांग सुंदर एकमुखी, षडभूज दत्तमूर्तीमुळे प्रसिद्धीस आलेले आहे. त्यासमोरच संगमरवरी पादुका आहेत. दत्तभक्त येथे प्रामुख्याने गुरुवार पौर्णिमा वारी करतात. दत्तजयंती येथे फार मोठ्या प्रमाणात साजरी होते. त्यावेळी येणाऱ्या भक्तगणांची संख्या लाखात असते. येथे येणारे भावीक मुख्यत्वे करून श्री सदगुरु नारायण महाराज उर्फ आण्णा यांचे प्रवचन ऐकण्यास येतात. माणसांमधील माणूस जागा करणे हे मुख्यत्वे करून नारायण महाराजांचे ध्येय आहे असे ते सांगतात.

सदर मंदिरात जुनी गुरुचरित्र पारायणाची जागा आहे. पूरातन दत्त पादूका आहेत. सदर परिसरात रहाण्यासाठी भक्त निवास व प्रसादाची व्यवस्था आहे. प्रशस्त सभामंडप आहे. निसर्गरम्य किल्याच्या पायथ्याशी असणारे हे स्थान श्रीगुरुंच्या वास्तव्यांनी अतिशय पवित्र झालेले आहे. “जय जय गुरुदेवदत्ता, अत्री अनुसये सुता” असा मंत्र येथे जपला जातो.

येथे श्री दत्त जन्म सोहळा उत्साहात साजरा होतो. दत्तजन्म पाळणा हलवून करतात. रात्री शोभेचे दारूकाम, दत्तजन्माचे किर्तन असते. दुसऱ्या दिवशी उत्सवमूर्ती व पादुका ग्रामप्रदक्षिणेस जातात. ही मिरवणूक सवाद्य गावातील चंद्रभागा कुंडापर्यंत जाते. तेथे मूर्ती व गुरुपादुकांना स्नान घालतात. या मिरवणूकीत हत्ती, घोडे, उंट असा सर्व लवाजमा असतो. दत्तभक्तांचा हा सोहळा पहाण्यासाठी महापूर लोटतो.

माहिती साभार – माझी भटकंती / Maazi Bhatkanti

Leave a Comment