महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,24,746

वेरुळ लेणी, वेरुळ

By Discover Maharashtra Views: 1396 2 Min Read

वेरुळ लेणी, वेरुळ –

वेरूळचे जुने नाव ‘एलापूर’. या गावाचा व तेथील लेण्यांचा उल्लेख राष्ट्रकूट राजांच्या ताम्रपटांतून प्रथम आढळतो. हा उल्लेख इसवी सनाच्या आठव्या शतकाच्या मध्याचा आहे, मात्र येथील बुद्धधर्मीय लेणी याही अगोदरची आहे. इसवी सनाच्या सहाव्या शतकाच्या मध्यापासून येथील लेणी खोदण्यास प्रारंभ झाला असावा असे अनुमान काढले जाते. वेरुळ येथे एकूण ३४ लेणी आहेत. पैकी दक्षिणेकडील भागात बुद्धधर्मीय १२ लेणी असून उत्तरेकडील भागात ५ जैन धर्मीय लेणी आहेत. मध्ये राहिलेली १७ लेणी हिंदूधर्मीय आहेत. ही सर्व लेणी वेरूळच्या डोंगराच्या उतरणीवर, दोन किमी लांब अशा डोंगराच्या कोरेत कोरलेली आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांचे भोसले घराण्याचे मूळ गाव वेरूळ आहे. वेरूळची लेणी साधारणत: इसवी सनाच्या सहाव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरण्यात आली असून प्राचीन भारतातली बौद्ध, हिंदू आणि जैन धर्मांमधली परस्परसहिष्णुता प्रकर्षाने दाखवतात.

बौद्ध लेणी (वेरुळ लेणी : ०१)

वेरूळची बौद्ध लेणी येथील सगळ्यात जुनी लेणी आहेत. या लेणी समूहात विहार, प्रार्थनागृहे, बुद्ध भिक्षूंची निवासस्थाने, स्वयंपाकघर, अशी रचना दिसते. ध्यानस्थ बुद्ध, बोधिसत्व, अवलोकितेश्वर, मंजुश्री, तारा, भृकुटी, स्त्री बोधिसत्व यांची शिल्पे येथे प्रामुख्याने आढळतात. यांपैकी प्रसिद्ध लेणे म्हणजे १० क्रमांकाचे विश्वकर्मा लेणे. यात अनेकमजली प्रवेशद्वारातून आत गेल्यावर आपण स्तूपापाशी पोचतो. या स्तूपाच्या वरच्या भागातील दगड जणू लाकडी वाटावा असाच कोरलेला आहे. या स्तूपात बुद्धाची धर्मचक्रप्रवर्तनमुद्रेतील भव्य मूर्ती आहे.या स्तूपात बुद्धाची धर्मचक्रप्रवर्तनमुद्रेतील भव्य मूर्ती आहे.

Leave a Comment