वेरुळ लेणी २, वेरुळ –
वेरुळ येथील लेणी समूहात एकूण ३४ लेणी आहेत. पैकी दक्षिणेकडील भागात बुद्धधर्मीय १२ लेणी असून उत्तरेकडील भागात ५ जैन धर्मीय लेणी आहेत. मध्ये राहिलेली १७ लेणी हिंदूधर्मीय आहेत. वेरूळची लेणी साधारणत: इसवी सनाच्या सहाव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरण्यात आली असून प्राचीन भारतातली बौद्ध, हिंदू आणि जैन धर्मांमधली परस्परसहिष्णुता प्रकर्षाने दाखवतात. कालानुक्रमे बौद्धधर्मीय लेणी समूहाची आपण मागील भागात माहिती घेतली आहे. वेरुळ लेणी २ या भागात हिंदू लेणी समूहाची माहिती घेऊयात.
हिंदू लेणी (वेरुळ लेणी : ०२)
वेरूळचा लौकिक, स्थापत्यकलेच्या व शिल्पकलेच्या प्रांतात प्रस्थापित करण्याचा मान येथील हिंदू धर्मीय लेण्यांकडे जातो. आठव्या शतकाच्या उत्तरार्धात कोरलेले १६ क्रमांकाचे ‘कैलास लेणे’ शैलगृहे कोरण्याच्या कलेतील परमोच्च बिंदू आहे.
लेणी क्रमांक १३ ते २९ ही हिंदू धर्मीयांची लेणी असून यांची निर्मिती सर्वसाधारणपणे सहाव्या ते आठव्या शतकांतील आहे. यात शैव शिल्पांची आणि शिवाच्या जीवनातील प्रसंगांच्या शिल्पपटांची संख्या अधिक असून वैष्णव शिल्पे तुलनात्मक दृष्ट्या कमी आहेत. शैली व आखणी या दृष्टींनी लेणे क्रमांक २९ ‘सीता की नहाणी’ नावाचे लेणे घारापुरीच्या लेण्यांशी आश्चर्यकारक साम्य दर्शविते. लेणी क्रमांक १८, २१, २९ लेण्यांमधील लकुलीश-शिवाच्या प्रतिमांची शिल्पे
वेरूळवरील लकुलीश-पाशुपत पंथाचा प्रभाव स्पष्ट करतात. आठव्या, दहाव्या व बाराव्या शतकांतील भित्तिचित्रांचे अवशेष हे कैलास लेणे, जैन गुंफा आणि डोंगरमाथ्यावरील गणेश लेण्यांत आढळतात.लेण्यांत आढळतात.
या पूर्वीच्या माहितीची लिंक बौद्ध लेणी ०१
Rohan Gadekar