महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,09,747

दिवेआगर : थोडी हटके सफर

Views: 1643
2 Min Read

दिवेआगर : थोडी हटके सफर –

दिवेआगर म्हटलं की चटकन आपल्या डोळ्यासमोर येतो तो अथांग समुद्र, स्वच्छ सुंदर टुमदार गाव, आणि सुवर्ण गणेशाचे मंदिर, नारळी पोफळीच्या बागा असलेली जूनी कौलारू घरे, जवळ असलेला जंजिरा किल्ला अनेक वेळा मी इथे भेट दिली पण या वेळी अगदी ठरवून काही नवीन बघायचे म्हणून आम्ही दोन दिवस त्यासाठीच राखून ठेवले.

1)निजामशाहीचा शिलालेख -आपण जेव्हा गावात प्रवेश करतो तिथे उजव्या हाताच्या गल्लीमध्ये चौकात तिसऱ्या निजामाचा एक शिलालेख आढळतो‌ जो रस्त्यावर आहे आणि यात गावाच्या हद्दीचा स्पष्ट उल्लेख आहे, म्हणून हा शिलालेख महत्वाचा आणि जतन करावा असा आहे.

2)रूप नारायण मंदिर – साधारण हजार एक वर्षापूर्वीची अत्यंत सुंदर अशी रुप नारायणाची मूर्ती या मंदीरात आहे, शिलाहार राजे रूप नारायणाचे परमभक्त असल्याने त्यांनी जुने मंदिर बांधल्याचे उल्लेख आहेत. याठिकाणी दोन मंदिरे आहेत पहिले रूप नारायणाचे ज्यावर बाजूला दशावतार कोरलेले आहेत आणि एकंदरीत शंख, चक्राच्या पद्धती नुसार हे केशव रूप आहे. याच्या बाजूला सुंदर नारायणाचे मंदीर आहे. आधी ही मूर्ती काही ठिकाणी भंगली होती जी आता परत बर्याच प्रयत्नांनी पहिल्या सारखी केलेली आढळते. पण जरूर भेट द्यावी असे हे मंदिर. अजून एक म्हणजे याठिकाणी जी माहिती लावली आहे त्याप्रमाणे शिलाहार राजा मुम्मुणिराज यांच्या ताम्रपटात गावाचा उल्लेख दिपकगर, आणि मराठीतील प्राचीन इ.स. १०६० च्या ताम्रपटात दिव असा उल्लेख आढळतो.

3) आपण बर्याच वेळा श्रीवर्धन, हरीहरेश्वर, मुरूड जंजीरा अशा ठिकाणी दिवेआगर वरून भेट देत असतो पण इथून अगदी दिवेआगर पासून १०-१५ किलोमीटर अंतरावर दोन निवांत किनारे आहेत. ते म्हणजे आरवी आणि शेखाडी, आणि या ठिकाणी जायचा जो रस्ता आहे तो तर एकदम भन्नाट thrilling देणारा. उजव्या बाजूला सुंदर समुद्र किनारा आणि एका बाजूला कोळी बांधवांच्या लहानशा वाड्या अशा मधून जाणारा छानसा रस्ता.. हा रस्ता आणि हे किनारे तसे खूप प्रसिद्ध नाहीत पण नक्की explore करण्यासाठी इथे वाव आहे, आरवी हा किनारा मोठा आहे शेखाडीचा किनारा थोडे खडक असणारा आणि खोल आहे.. आरवी वरून आपण श्रीवर्धनलाही सहज जाऊ शकतो फक्त गुगलताईंना तसं सांगावं लागतं… हेही ठिकाण नक्की भेट द्यावी असे आहे..

सागर दंडवते, पुणे

Leave a Comment