महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,09,891

शास्ताखानाची फजिती

Views: 3828
4 Min Read

शास्ताखानाची फजिती –

शास्ताखानास स्वराज्यात घुसून दोन वर्षे होऊन गेली होती. डुकराप्रमाणे स्वराज्याची नासधूस त्याने चालविली होती. बंदोबस्त आवश्यकचं होता. राजेंचा लालमहाल त्याने कब्ज्यात घेतला होता. त्यामुळे शास्ताखानाचा बंदोबस्त म्हणजे काळाची गरज झाली होती. राजगडी विचारचक्रे सुरु झाली. त्यातच शास्ताखानावर प्रत्यक्ष हल्ला करण्याचा बेत राजेंनी सांगितला. त्याप्रमाणे एकाअद्भूत धाडसाची अत्यंत काळजीपूर्वक आणखी राजगडावर होऊ लागली.(शास्ताखानाची फजिती)

सर्वप्रथम दिवस ठरवला गेला. शोभान नाम संवत्सर शके १५८५ ची चैत्र शुद्ध अष्टमी ही तिथी हल्ल्यासाठी निवडली गेली. हल्ला प्रथम अर्थातच मध्यरात्रीनंतर व्हायचा होता. त्या दिवशी रविवार असून इंग्रजी तारीख होती. ५ एप्रिल १६६३ (रात्री १२ नंतर ६ एप्रिल) मुसलमान कालगणनेप्रमाणे हा रमजानचा महिना असून त्या दिवशी सहावा चंद्र होता. या शिवाय या दिवसाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हां दिवस बादशहाच्या राज्यरोहणाच्या वाढदिवसानिमित्त साजरा केल्या जाणाऱ्या दिवसांपैकी एक दिवस.

चैत्रशुद्ध अष्टमी उजाडली. सर्व योजना आखली गेली होती. हुजुरपागेतून महाराजांनी १००० निवडक धारकरी माणूस निवडले. वरकड लष्करातून २००० सडे सडे राऊत घेतले. राजगडाहून महाराज सिंहगडी आले. रात्रीचा पहिला प्रहर उलटला. सिंहगडाच्या दिशेनेच जसवंतसिंह हा मोगली सरदार दहा हजार घोडदळासह तळ ठोकून बसलेला होता. त्याच्या नकळत छापा घालायचा होता. म्हणून रात्री आडमार्गे जायचे ठरले

महाराज पुण्याच्या अलीकडे १ मैलावर आंबीलवोढ्या जवळ येऊन थडकले. बहुधा ते डोणज्याच्या खिंडीने उतरून आले असावेत. महाराज सैनिकांच्या एका तुकडीत मिसळून होते. या तुकडीचे नेतृत्व बाबाजी व चिमणाजी या बंधूंकडे होते. चिलखत, जिरेटोप, ढाल, तरवार, अशा पूर्ण तयारीत महाराज होते. ही तुकडी चालत चालत शास्ताखानने बसवलेल्या चौकीपहाऱ्याच्या दरम्यान आली. आणि चतुराईने आत दाखल झाली सुद्धा

असेही मोगली छावणी म्हणजे प्रचंड गबाळेपणा अशी त्यांची ख्याती होती. कॉस्म द गार्द्र अशा छावन्यांचे वर्णन करताना म्हटले आहे. की, The moorish armies are like big cities, as many people follow them and come to the camp at all hours without being questioned

ऐन मध्यरात्र.

…सारी छावणी सूस्त होती. या छावणीत मराठी मंडळीही चिक्कार होती. त्या मराठ्यांच्या खात्यावर ही मराठी मंडळी छावणीत शिरली. लाल महालात घुसताना महाराजांनी स्वतः बरोबर ४०० निवडक उत्तम सैनिक व कोयाजी बांदल, चांदजी जेधे, बाबाजी व चिमणाजी देशपांडे वगैरे धाडसी जवान घ्यायचे ठरविले होते. लाल महालातील परसांगणाच्या दारांत चिणलेले चिरे उचकटून हे लोकं आत उतरले. असेच ते आतल्या चौकात गेले. तेवढ्यात चाहूल लागून पहारेकरी सावध झाले. ओरडा आणि कापाकापी सुरू झाली. शाइस्तेखान घाईने, खाली काय गोंधळ आहे ते पाहावयास आला. आणी आला तो अतिशहाणा धनुष्यबाण घेऊन लढाईला आला.

आता इतक्या अंधारात याच्या बापानी तरी धनुष्य बाण युद्धात कधी वापरले होते काय ? तिथेच तो मरायचा. पण त्यात त्याचा पुत्र अबुल फते खान मध्ये धावला. त्यामुळे खान बचावला, पण पोरगा मेला. खान आपल्या महालाकडे जीव मुठीत धरून धांवत असता महाराज त्याच्या मागे धावले. महालातील स्त्रियांनी घाबरून पण चतुराईने दिवेच फुंकून टाकले. अंधारात महाराजांनी अंदाजाने खानावर खाडकन् घाव घातला. हा घाव खानाच्या उजव्या हातावर बसला अन् तीन बोटे तुटली. खान प्राणांतीक आरडला.महाराजांना वाटले, खान खलास झाला. ते परत फिरले.

या युद्धात महाराजांची सहा माणसे ठार झाली व चाळीस जखमी झाली. जखमी झालेल्यांमध्ये कोयाजी बांदल हे सुद्धा होते.
रात्रीच्या या हल्ल्यात खानाचा एक मुलगा, एक जावई, बारा बिव्या, चाळीस मोठे दरकदार, एक सेनापती असे एकूण पंचावन्न लोक महाराजांनी व त्यांच्या मराठ्यांनी मिळून कापून काढले होते.

सारा लाल महाल घाबरून कल्लोळत होता.
दगा ! बचाओ ! गनीम ! मराठ्यांनीहि असेच ओरडण्यास प्रारंभ केला ! एकच कल्लोळ ! महाराजांनी या हलकल्लोळाचा फायदा घेतला व सर्वजण त्या गर्दित मिसळून पसार झाले..

 

माहिती साभार – आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची

Leave a Comment