महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,72,345

गडकिल्यांवरील सण-उत्सव…

By Discover Maharashtra Views: 3745 3 Min Read

गडकिल्यांवरील सण-उत्सव…

नेहमीच हा प्रश्न पडतो की शिवकाळात किंवा त्याच्या आधीही ज्या लढाया मशालींच्या प्रकाशात अंधारात झाल्या व काही दिवसाही मग आपले पारंपरिक सण कसे साजरे होत असतील गडकिल्यांनवर.. .गड कसे दिमाखात सजविले जात असतील..म्हटलं याचीही अनुभूती आपण घ्यावी…गडाला सर्व चहुबाजूंनी तटबुरजांवर मशाली पेटवणे, गड फुलं- माळांनी सजविणे, काय उत्साह असेल तो.आपल्या घराप्रमाणेच गडाला सजविले जात असेल ना.रात्रीच्या अंधारात तर गड किती उजळून निघेत असेल.काय ती वर्दळ असेल.या आताच्या काळात सर्व फक्त अंदाज लावू शकतो.आज हे सर्व सद्यस्थितीत आपण घरी करतो.गड शांत आणि निवांत आहेत आता.जे गडांनी पाहायचं होतं ते पाहिलं..आता इतिहास जमा झाहलेत ते सर्व क्षण व सण आणि बरंच काही..

सद्यस्थितीत मला नेहमी वाटायचं की हे गड कधी सजतील का?कधी आपण या मशालींच्या लक्ख प्रकाशात ते अनुभवू शकतो का?अस करताना एक ध्येय आम्ही दुर्गवीराणी ठरवलं की आपण त्या क्षणांना उभं करायचं,आणि ते जगायचं.मग कसं. ठरलं आपले सण,उत्सव हे गडानाचं सजवून,रात्री मशाली पेटवून,स्थानिकांना सांगून व सोबत घेऊन,रांगोळ्या काढून हे साजर करायचं. त्या वेळी तोंडावर दसरा आला होता २००८. सरसगडावर दसऱ्याच्या तोरण बांधायचे ठरले. आधी तोरण गडाला व मग माझ्या घरला या संकल्पेनाचा उदय तिथे झाला.काही निवडक दुर्गवीरांना घेऊन दसरा साजरा झाला…

हे सर्व चालू होतं संवर्धन मोहिमा करत करत…हळूहळू बरयाच गडकोटांवर दसरा,गुढीपाडवा, महाराष्ट्र दिन हे अश्याच प्रकारे साजरे केले गेले व केले जातात.एक किंवा दोन दिवस आधीच गडावर पोहचायचे.रात्री मशाली पेटवून गड प्रकाशमय करायचा.मशालफेरी काढायची.रात्रभर झेंडूच्या फुलांच्या माळा तयार करायच्या.सकाळी थोडे श्रमदान मग रांगोळ्या काढायच्या..स्थानिकांना घेऊन शिवप्रतिमेच व गडपूजन मग भोजन..अस सर्व आटोपून मग परतीचा प्रवास…

आजगायत किल्ले मानगड,अवचितगड,सुरगड, घोसाळगड, बिरवाडी,सामानगड,कलानिधीगड,वल्लभगड,रामशेज,रामगड, यशवंतगड,भिवगड ,राजहंस गड(बेळगाव)अश्या कित्येक किल्यांवर साजरे करण्यात आलेत.जे अनुभवायचं आहे ते प्रत्येक्षात गडांवर महाराष्ट्रातील कित्येक गडप्रेमीनीं या कार्यक्रमात सहभागी होऊन ते अनुभवलेत.आज आम्हांला नेहमी वाटत की हे उत्सव जसे पूर्वी साजरे केले ते आजही जमेल त्या पध्दतीने साजरे व्हावेत.पुन्हा गड सजावेत.

आपणांस सर्वांनाच ठाऊक आहे गडकिल्यांचं महत्त्व..हे उत्सव जे काही गडकिल्ले आज महाराष्ट्रात व सीमाभागात आपलं अस्तित्व टिकवून आहेत मग ते 300 असू द्या किंवा त्यापेक्षा जास्त एक दिवस असा यावा अस आम्हां दुर्गवीरांना वाटत की हे सर्व सण या गडकोटांनावर दिमाखात साजरे व्हावेत.मग ते संस्थेनीच केलं पाहिजे असं नाही..स्थानिक गावकऱ्यांनि,युवकांनी,शासनाने सर्वांनीच हे करावं..आम्ही दुर्गवीर गेली १३ वर्ष झाली हे उत्सव उत्स्फूर्तपणे कुठेही खंड न पडता जमेल त्या गडावर त्या क्षणांची अनुभूती घेण्यासाठी जात असतो.मग त्यासाठी आपल्या खिशाची पदरमोड करून का होईना ते करत असतो.आज खऱ्या अर्थाने गड जपणं, व हे उसत्व साजरे करणं याला चांगले दिवस आलेत अस म्हणायला हरकत नाही.आपण आपले सर्व संस्कृतीप्रधान असलेले हे सण गडावर साजरे करून ते टिकवले पाहिजेत हेच मनात ठेवून हे केलं पाहिजे असं मला वाटतंय.आपली संस्कृती हाच आपला अभिमान..

धन्यवाद
दुर्गवीर प्रतिष्ठान

Leave a Comment