किल्ले माढा –
सोलापूर जिल्ह्यातील माढा या तालुक्याच्या गावी निंबाळकर घराण्याचा एक भुईकोट म्हणजे गढी आहे. माढा हे गाव पुणे – सोलापूर महामार्गावरील टेंभुर्णीपासून ४० कि.मी अंतरावर आहे. माढापासून कुर्डुवाडी, बार्शीजवळ आहे. किल्ले माढा भुईकोटाचे भव्य दगडी प्रवेशद्वार, बुरूज, तटबंदी सध्या शिल्लक आहे. आत गढीमध्ये आधी शाळा भरत असे पण आता ती भरत नाही त्यामुळे सर्वत्र झाडोरा तयार झालेला आहे. तटबंदीवर जाण्यासाठी पायऱ्या आहेत.
भुईकोटाचे बांधकाम रावरंभा निंबाळकर यांनी इ.स.१७१० मध्ये केले होते. रावरंभा निंबाळकर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पणतू होते म्हणजे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या कन्या सखुबाई महादजी निंबाळकर यांचे नातू होते अश्याप्रकारे ते महाराजांचे पणतू होते. रावरंभा निंबाळकरांकडे करमाळा, माढा, नळदुर्ग परिसराची जहागीर होती. जेव्हा धनाजी जाधवांनी अहमदनगरजवळ औरंगजेबावर हल्ला केला होता तेव्हा त्यांच्यासोबत रावरंभा हे होते. काही काळ पुण्याची जहागीरही रावरंभांकडे होती. रावरंभा हे काहीकाळ मुघल दरबारी होते.
टीम – पुढची मोहीम