महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,10,599

अपरिचित असा किल्ले मांजरसुंबा

Views: 2349
3 Min Read

अपरिचित असा किल्ले मांजरसुंबा –

निजामशाहीची राजधानी म्हणून ‘अहमदनगर’ हे प्रसिद्ध शहर. याच इतिहास प्रसिद्ध शहराजवळ निजामशाहीच्या काळात अहमदनगर-वांबोरी रस्त्यावर असणाऱ्या एका छोट्या डोंगरावर एक छोटेखानी ‘मांजरसुंबा’ नावाचा किल्ला उभारला गेला. निजामशाहीत या गडावरून औरंगाबादकडुन येणाऱ्या शत्रुवर नजर ठेवण्यासाठी सलाबत खान नावाच्या सरदाराने टेहळणीचे ठिकाण म्हणून बांधलेला हा गड.

अहमदनगर – औरंगाबाद राज्य महामार्गावर नगरपासुन अवघ्या 15 km अंतरावर आहे मांजरसुम्भा नावाचे गाव.

वांबोरी फाट्यावरून काही थोड्या अंतरावर आपण विचारात गेलो असता 3 km च्या आसपास हे गाव आहे . गावात जातानाच लहानग्या टेकड्यांची मालिका सुरु होते त्याला आगरगावच्या टेकड्या असे म्हणतात . याच टेकड्यांमध्ये आहे हा गड ( मांजरसूंभा गड ) या गावातुन एक कच्चा रस्ता लागतो तो आपल्याला थेट पोहचवतो गडमाथ्यावर. पण आपण गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या विलक्षण बांधणीच्या एकांड्या

बुरुजाजवळ गाडी उभी करून गाडीवाट सोडुन बाजुला दिसणाऱ्या कमानीच्या दरवाज्यावाटे दगड-धोंड्याची एक पायवाट जाते.त्या पायवाटेने अगदी काही कालावधीत आपण गडाच्या मुख्य द्वारापाशी येऊन पोहोचतो.

गडाचा मुख्य दरवाजा सुस्थितीत असल्याचे पाहुन समाधान वाटले व निजामशाही स्थापत्य शास्त्राचा हा कलाविष्कार नजरेत भरेल असेच आहे.

आत मध्ये प्रवेश केल्यास उत्तरेकडे दिसते तीन मजली इमारतींच्या काही भग्न भिंतींचे अवशेष थोडं अजुन वर गेल्यावर समोर येतो तो भव्य चौथरा , एक प्रशस्त बांधीव तलाव . काही गोष्टी पाहुन त्या काळच्या लोकांची गड बांधतानाचे कला कौशल्य जणु आपल्या समोर येऊन उभे राहते .

पाण्याच्या टाकीसारखा दिसणाऱ्या औरस-चौरस अर्ध-मजली बांधकामाच्या छतावर चढून पाहिल्यास वर्तुळाकृती दोन झरोके दिसतात यातून आत डोकावताना मग ही पाण्याची टाकी नसुन एक तळमजल्यातील आरस्पानी महाल असल्याचे भासते. या गडाचा इतिहास

मांजरसूंभे ( मांजर-ए-सुभा ) निजामशाहीत या गावातील गडावरून औरंगाबादकडुन येणाऱ्या शत्रुवर नजर ठेवण्यासाठी सलाबत खान नावाच्या सरदाराने टेहळणीचे ठिकाण म्हणून बांधलेला हा गड. गडाच्या पायथ्याशी मनुष्य वस्ती आहे पण ऐतिहासिक वारसा लाभलेल्या गावात जन्मलेल्या कुणाचेच इतिहास प्रेम जागे होणार नाही.हे सुचले कारण गडाच्या काही भागांची झालेली दुरवस्था . याच डोंगराच्या अंगाखांद्यावर बसून शहाजीराजांनी मराठेशाहीची बीजे रोवली

मांजरसुंभा किल्ल्यातील हत्तीमोट –

अहमदनगर शहरापासून उत्तरेला २० कि.मी. अंतरावर गर्भगिरी डोंगर रांगांमध्ये मांजरसुंबा किल्ला आहे. चौदाव्या शतकात निजामशाहच्या राजवटीत हा किल्ला बांधलेला गेला. या किल्ल्यातील सर्वांत उत्तम गोष्टींपैकी एक म्हणजे दोन मजली इमारत मोटाचा वापर संपूर्ण किल्ल्यात पाणी वाहण्यासाठी केला जात असे. कोणत्याही किल्ल्यात हा एक अतिशय दुर्मिळ शोध आहे. पाणी हत्तींनी ओढले होते आणि म्हणूनच ‘हत्तीमोट’ असेही म्हणतात.

निजामशाही स्थापत्याचे उत्तम उदाहरण असलेला हा किल्ला आजही भटक्यांना अपरिचित आहे…!!!

Leave a Comment