किल्ले पारोळा मोहिम
खांदेशच्या वैभवाची पुनःरुज्जीवनास सुरुवात
राजे शिवबा प्रतिष्ठाण आयोजित पारोळाची ही मोहिम खांदेश परिसरातील पहिली यशस्वी मोहिम ठरली फक्त यात मित्रपरिवारांची कमतरता भासली जे काही गंभीर समस्यांमुळे सामील होऊ शकले नाही. असो सकाळी अमर सरांच्या कारमध्ये,कुंडलवाल सर व त्यांच्या सहकार्यांसोबत औरंगाबादहुन कुच केले व ९:३० दरम्यान पारोळ्याच्या बस स्टाॅडला पोहोचुन तिथे नाश्ता केला. भडगावहुन विनोद पाटील व त्यांचे सहकारी अवजारांसोबत व पारोळाचे माजी नगरसेवकांचे चिरंजीव उल्हास भाऊ पाटील हे आले.
तिथुन आम्ही बालेकिल्याच्या आत जाणार्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो तिथे मला जळगाव मधील पुरातन वस्तु व शस्त्रांचे तज्ञ अश्या जाणकार व्यक्तिमत्वांना भेटण्याचे भाग्य लाभले ते म्हणजे मा.पंकज दुसाने सर,एवढे मोठे व्यक्ति आपल्या मोहिमेत सामील झाले प्रसन्नता वाटली. बालेकिल्याच्या आत गेल्यावर मोहिमेस सुरुवात झाली बुरुजावरील लहान झाडी व झुडपींना काढण्यात येत होते तर इतर सर्वजण बुरुजाखालील व बालेकिल्याच्या प्रवेशद्वाराजवळील कचरा,दारुच्या बाटल्या ,पत्ते व लहान झाडींना काढुन एका ठिकाणी त्याचे ढिग रचले. त्यानंतर किल्यातील सर्वात मोठ्या उध्वस्त इमारत मधील कचरा काढण्यात आला स्वतः मी त्या इमारत मधील एका वास्तुच्या वरच्या मजल्यावर जाऊन तेथील झुडपं व पालापाचोळा काढुन संपूर्ण इमारत स्वच्छ केली.
किल्ले पारोळा मोहिम
मोहिम चालु असताना विशेष कौतुक मला महादेव मंदिराच्या सुरक्षा रक्षकाचे वाटले ज्यांचे हात जळाल्यामुळे हात अक्राळ-विक्राळ झाले असताना देखील त्यांनी त्या हातांनी खुप कचरा जमा करुन खारीचा वाटा उचल्ला!!!!! धडधाकट व मोहिमेत सामील न झालेल्या “शिवभक्तांनी” या काकांकडुन अवश्य बोध घ्यावा. दुपारच्या एक वाजेपर्यंत मावळ्यांनी खुप काम केले व घामांच्या धारांमध्ये काम करत असताना मावळ्यांनी छोटेसे मधमाशाचे पोळ आणले त्यातील मध जेव्हा मी खाल्ले तेव्हा पहिलांदा एवढे गोड मध खाल्याचे अनुभवले एका प्रकारे हे कष्टाचेच गोड फळ होते. अश्या प्रकारे कडक व रखरखत्या उन्हात मोहिम संपन्न झाली त्यानंतर हात पाय धुऊन महादेव मंदिरात जमुन पाणी पिऊन निवांत बसत एकमेकांचे परिचय व मोहिमेचा अनुभव जाणुन घेतले व विविध विषयांवर चर्चासन्न झाले यात पंकज सरांचे मार्गदर्शन लाभले.
यानंतर मी,अमर सर व उल्हास भाऊंनी मिळुन मुख्य प्रवेशद्वारावर जाऊन भगवा झेंडा फडकवला यानंतर प्रवेशद्वाराजवळुन जात असताना एका लहान मुलाला हातात तंबाखु चोलत असताना बघितले त्याला विचारले असता त्याने अभिमानाने सांगितले ” हा मी तंबाखु खातो” म्हणुन त्याचे उलट उत्तर ऐकुन आश्चर्य वाटले व किवही आली की व्यस्नी लोकांचे जिवन पुढे किती पिढादायक असणार. सर्वजण पारोळ्यातील “भरीत सेंटरला” आलो असता तिथे खांदेशी स्पेशल भरीत-भाकरी व शेवभाजीचा आस्वाद घेतला. जेवणानंतर आम्ही माजी नगरसेवकांच्या घरी गेलो तिथे ठंड लिंबु-पाणी पिऊन सर्व थकवा दुर झाला व सर्वांचा निरोप घेत औरंगाबाद कडे प्रस्थान करण्यात आले प्रवासात अमर सरांसोबत अनेक विषयांवर मनसोक्त गप्पा मारल्या व सरांकडुन खुप काही शिकायला मिळाले या मोहिमेत सरांचा सिंहाचा वाटा असुन त्यांच्याकडुन खुप सहकार्य लाभले यासाठी त्यांचे आभार मानावे तेवढे कमी. देवगिरी किल्याडवळुन जात असताना अब्दुल मियांना भेटुन त्यांचे सर्वोत्कृष्ट देवगिरी प्रतिकृती बघण्यात आली.