किल्ले सोंडाई –
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सोंडेवाडी गावात असलेला हा किल्ले सोंडाई. खोपोली पासून पनवेल कडे जाताना वाटेत चौक नावाचे गाव लागते शेजारीच असलेल्या मोरबे धरणापासून सोंडेवाडी कडे रस्ता जातो. चौक ते सोनेवाडी हे अंतर साधारण दहा किलोमीटर इतके आहे. सोंडाई-मातेचे स्थान असलेला हा किल्ले सोंडाई.
पूर्वीच्या काळी घाटमाथ्यावरून कोकणात व्यापार चालत असे त्या व्यापाराच्या सुरक्षेसाठी अनेककिल्ले उभारले गेले होते त्यापैकीच हा किल्लेसोंडाई होय. गडावर खोदीव पाण्याच्या टाकी आहेत त्यातील एक खांब टाके आहे. दोन टाक्यातील पाणी हे पिण्यायोग्य आहे. वर गडाचा माथा एकदम लहान आहे व माथ्यावर सोंडाई देवीची मूर्ती आहे. गडाच्या माथ्यावर जाण्यासाठी स्थानिक गावकऱ्यांनी लोखंडी शिड्या उभारल्या आहेत. गडावर जाण्यासाठी साधारण एक तास एवढा वेळ लागतो. गडाच्या माथ्यावरून इर्षाळगड, कर्नाळा, माथेरान डोंगररांग, मोरबे धरण हा परिसर दिसतो.
टीम- पुढची मोहीम