किल्ले टेंभुर्णी –
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील टेंभुर्णी गावात भुईकोट किल्ला आहे. टेंभुर्णी गाव हे पुणे- सोलापूर महामार्गावर पुण्यापासून १६० कि.मी अंतरावर आहे. महामार्गावरूनच भुईकोटाची तटबंदी दिसते. टेंभुर्णीला मराठवाड्याचे प्रवेशद्वार असे म्हणतात. सद्यस्थितीत भुईकोटाचे भव्य प्रवेशद्वार आणि बाजूचे दोन बुरूज भक्कम स्थितीत आहेत. किल्ले टेंभुर्णी आतमध्ये वीरगळ, मंदिरे, नागशिल्पे आहेत. भुईकोटात महादेवाचे एक मंदिर आहे त्याचे वैशिष्ट्य म्हणजे दुहेरी शिवलिंग. किल्ल्यात आत सदाशिवराव माणकेश्वर यांचा वाडा आहे. याची नोंद बाॕम्बे प्रेसिडेन्सीच्या गॕजेटमध्ये आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने जेव्हा दक्षिणेकडे लक्ष केंद्रित केले तेव्हा औरंगजेबाचा मुलगा शहाजादा आज्जम मराठ्यांचा पाठलाग करत टेंभुर्णी येथे इ.स. २ आॕक्टोबर १६८२ ला येवून पोचला अशी नोंद आहे. पुढे उत्तर पेशवाई काळात टेंभुर्णीतील कीर्तनकार सदाशिवराव माणकेश्वरांमुळे टेंभुर्णी प्रसिद्धीस आली. सवाई माधवरावांच्या मृत्यूनंतर माणकेश्वरांनी दुसरा बाजीरावांची बाजू घेतली व ते पेशवा बनले आणि त्यांचे विश्वासू बनले.
इ.स.१८०० च्या काळात दुसऱ्या बाजीरावातर्फे माणकेश्वरांनी निजामाबरोबर शिष्टाई केली. निजामाने त्यांना टेंभुर्णी गाव इनाम दिले. त्यांनी तिथे तीन मजली वाडा बांधला. पुढे होळकरांनी पुण्यावर आक्रमण केले तेव्हा दुसरे बाजीराव वसईला इंग्रजांच्या आश्रयाला गेले. पुढे बाजीरावांना गादीवर बसवायला माणकेश्वरांनी मोलाची मदत केली होती. पुढे इ.स. ८ आॕक्टोबर १८१७ ला सदाशिवराव माणकेश्वरांचा मृत्यू झाला.
टीम – पुढची मोहीम
Tembhurni kille tar mahadik paragane puratatv vibhagakade dacuments miltat amchi