गजानन दिगंबर माडगूळकर उर्फ ग दि मा –
‘गीतरामायण’ या अजरामर काव्यामुळे मराठी माणसाच्या घराघरात पोहोचलेले आधुनिक वाल्मिकी ग दि माडगूळकर. पुणे-मुंबई रस्त्यावर वाकडेवाडी येथे त्यांचे निवासस्थान – पंचवटी आहे !ग दि मा.
सांगली जिल्ह्यातील ‘शेटफळ’ या गावी ग दि मांचा जन्म झाला. वयाच्या १६-१७ व्या वर्षी त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. सुरवातीला Extra Artist ची कामं केल्यावर ‘भक्त दमाजी’ व ‘पहिला पाळणा’ (१९४२) या चित्रपटासाठी त्यांनी गीतलेखन केलं. यानंतर आलेल्या ‘लोकशाहीर रामजोशी’ चित्रपटात त्यांनी कथा-पटकथा-संवाद-गीते अशा भुमिका बजावल्या.
‘गोरी गोरी पान’, ‘एका तळ्यात होती’, ‘नाचरे मोरा’ सारख्या बालगीतांपासून ‘एक धागा सुखाचा’, ‘जग हे बंदीशाळा’, ‘या चिमण्यांनो परत फिरा रे’, ‘बुगडी माझी सांडली गं’, ‘इंद्रायणी काठी’ अशे सुमारे २००० गीते त्यांच्या लेखणीतून उतरली. याशिवाय मराठी साहित्यात कथा, कादंबरी, नाटक, याही क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला.
गदिमांना ‘आधुनिक वाल्मिकी’ ही पदवी ज्यामुळे प्राप्त झाली ते ‘गीतरामायण’. १९५३ साली आकाशवाणी वर प्रसारीत झालं अन् अल्पकाळात लोकांच्या पसंतीस उतरलं. आजही ते ऐकायला ताजं वाटतं. गदिमांना पद्मश्री (१९६१) सह अनेक पुरस्कार मिळाले.गदिमांना ‘आधुनिक वाल्मिकी’ ही पदवी ज्यामुळे प्राप्त झाली ते ‘गीतरामायण’. १९५३ साली आकाशवाणी वर प्रसारीत झालं अन् अल्पकाळात लोकांच्या पसंतीस उतरलं. आजही ते ऐकायला ताजं वाटतं. गदिमांना पद्मश्री (१९६१) सह अनेक पुरस्कार मिळाले.
पुण्यातील ‘पंचवटी’ बंगल्यात गदिमांनी १४ डिसेंबर १९७७ ला अखेरचा श्वास घेतला.
पत्ता : ‘पंचवटी’, वाकडेवाडी, ११ शिवाजीनागर, पुणे.
© वारसा प्रसारक मंडळी.