महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,24,767

गडभ्रमंती करत असाल त्यासाठी काही टिप्स

By Discover Maharashtra Views: 1283 5 Min Read

गडभ्रमंती करत असाल त्यासाठी काही टिप्स –

गडभ्रमंती करत असाल त्यासाठी काही गडभ्रमंती टिप्स पुढीलप्रमाणे आहेत.

१) शक्य असल्यास काही दिवस आधी पासून दररोज किमान बॉडी स्ट्रेचिंग आणि पायांचे इतर व्यायाम ३० मिनिटे करा

२) चांगली ग्रीप असलेले ट्रेकिंगचे बूट घालून १० दिवस आधी पासून दररोज किमान १ तास चालण्याचा सराव करा

३) ट्रेकला जाण्याची दिवशी पायाची नखं कापा. कारण नखं आणि बूट घर्षणामुळे बोटे दुखायला लागतात.

४) ट्रेकिंगचे बूट पायाला घट्ट होणार नाही असे घ्या. शक्यतो १ नंबर जास्त. व 2-3 जोड मोजे व बुटाच्या lace चांगल्या प्रतीचे घ्यावेत

५) बूट असले तरी चप्पल / फ़्लोटर पिट्टूमध्ये (छोटी सॅक) घ्यायला विसरू नका. बुटांनी दगा  दिला तर ट्रेक चपलेवर करता येईल. मेडिकल गॉज टेप किंवा cello tape बरोबर बाळगा. बुटांचे उघडलेले तोंड  टेपने बंद करून वेळ निभावता येते.

६) वाटेत जेवण किंवा विश्रांती वेळी अनवाणी फिरू नका.

७) चढण चढताना एकमेकांशी बोलू नये त्याने धाप लागते. जास्त धाप लागल्यास काही सेकंद थांबून खोलवर श्वास घ्या.

८) ट्रेक करताना एकाच वेळेला घटा घट पाणी पिणे टाळा. थोड्या थोड्या वेळाने घसा ओला होईल इतपतच पाणी प्या. याने पोटात दुखत नाही आणि चालण्याचा वेग उत्तम राहतो.

९) चॉकलेट पेक्षा गोळ्या चघळल्यास चांगले. घसा कोरडा पडत नाही.

१०) प्रत्येकाची स्वतःची एक विशिष्ट गती असते ती कायम ठेवा. मित्र मैत्रीण पुढे गेलेत म्हणून पुढे धावत जाऊ नका तसेच मित्र मैत्रीण पाठी राहिलेत म्हणून पाठीमागे रेंगाळू नका. त्याने तुमची चालण्याची लय जाईल आणि चालणे त्रास दायक वाटत राहील.

११) आधी पासूनच असलेल्या मित्र मैत्रिणी बरोबर राहण्यापेक्षा महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्यांशी मैत्री करा. महाराष्ट्राच्या विविध संस्कृतीची ओळख करून घेण्याचा आनंद वेगळाच असेल.

१२) उतारावर पाऊले तिरपी टाका त्याने घुडघ्यांवर जोर येणार नाही. तसेच चढावावर दोन पाऊलातील अंतर कमी असावे. चढण उतरण करताना काठीचा आधार कधीही उत्तम

१३) आयोजकांनी दिलेल्या सूचना तंतोतंत पाळा.

१४) जसे बाहेर फिरायला जाताना आपण mobile चार्जिंग, बॅलन्स, powerbank बरोबर घेतो तसेच आपल्या सॅक मध्ये मध्यम आकाराच्या प्लास्टिक पीशव्या पण घ्याव्यात. त्याचा उपयोग गड भ्रमंती करतांना, आपण खाल्लेले बिस्कीट, चॉकलेट, फळांची आवरणे, त्यात ठेवता येतील त्याचबरोबर जाण्या येण्याच्या वाटेवर पडलेला प्लास्टिक चा कचरा उचलून भरता येईल.

१५) गडाच्या वाटेवर असणाऱ्या ताक, वडापाव, लिंबू सरबत इत्यादी विकणाऱ्या लोकांशी पैश्यांवरून हुज्जत घालू नये. थोडे पैसे जास्त दिले तरी आपलं काही नुकसान होत नाही पण त्यांचे 2 वेळचे अन्न मिळते आणि दुसरा स्वार्थी विचार केला तर काही अडचण निर्माण झाल्यास म्हणजे अपघात, आजार, पाऊस इ तर हेच लोक उपयोगी येतात.

१६) स्वतःच्या तब्येतेची स्वतः ला चांगली माहिती असते, allergy व इतर आजार इ, त्या प्रमाणे औषधें घेणे, तसेच ग्रुप leader व मित्राला त्या बाबत सांगणे, बॅग मध्ये उलटी, ताप, सर्दी, electrol, ors, bandaid, zole-f मलम ( पावसाळ्यात जांग व पायाची बोटे यांची त्वचा ओली होऊन जो त्रास होतो त्या साठी), iodex, कापूस, bandage, या प्रकारची first aid ठेवावी.

१७) जर कोणाला vertigo, height fobia, hydro fobia, इन्सुलिन dependent diabetic, high/low bp, एखादे operation झाले असल्यास, लीडर व बरोबर च्या मित्रांना सांगावे.

१८) ठरलेल्या ठिकाणी जातांना त्या भागाची शक्य तेवडी माहिती, नकाशे , पुस्तक, इंटरनेट ह्या मधून मिळवावी,

१९) शक्यतो natural कलर चे व वजनाला हलके कपडे 2-3 जोड घ्यावेत. पावसाळ्यात सर्व सामान प्लास्टिक च्या पिशवीत भरून , मुख्य बॅग पण मोठ्या प्लास्टिक पिशवीत ठेवावे.

२०) खाण्यासाठी घरगुती पदार्थ घ्यावेत बरोबर सुका मेवा व फळे घ्यावीत व 2-3 ltr पाणी घ्यावे.

२१) बरोबर खिशात पुरेसे पैसे, ओळख पत्र, महत्वाचे फोन क्र, mobile बॅलन्स ( पैसे व मेमरी), वही, पेन, टॉर्च, सेल घ्यावे.

२२) अनुकूल परिस्थिती होते ती सहल आणि प्रतिकुल परिस्थितीत होतो त्याला ट्रेक म्हणतात.

*असलेल्या परिस्थितीशी जुळवून घेता आलं तरच ट्रेक एंजॉय कराल.* अन्यथा निराशा पदरी पडेल आणि महत्वाचे, आपल्या कडे असलेल्या वस्तू वा जिन्नस, औषधें मिळून मिसळून वापरावे, ना जाणो आपल्या पेक्षा दुसऱ्याला त्याचा उपयोग किंवा गरज जास्त पडेल.गडभ्रमंती टिप्स.

साभार – Harish Pandit बा रायगड मुंबई विभाग

Leave a Comment