डोंगरगावच्या गढेगळी अज्ञात ऐतिहासिक वारसा…
गढेगळ – इतिहासाची आवड आणि ओढ प्रत्येकाला असतेच अस नाही,पण ज्याला कोणाला इतिहासाचा नाद लागतो त्याला सृष्टीतील हर एका घटकात इतिहास दिसतो.गढेगळ.
आज आपण माहिती करुन घेणार आहोत अशा दोन मौल्यवान दगडांची ( साधारण लोक याला दगडच म्हणतात) ज्यांच्याकडे शेकडो वर्ष या भुमीत राहणारे फक्त एक दगड शीळा म्हणुन पाहत होते.
डोंगरगाव पुणे नगर हायवेपासुन पेरणे फाट्यापासुन अवघ्या ७ किलोमीटर आणि आमची कुरस्वामिनी बोल्हाई मातेच्या पंखाखाली अवघ्या ५-६किलोमीटर वर भीमानदितीरावर वसलेल हवेली तालुक्यातल छोटसं खेडेगाव म्हणजे डोंगरगाव!
दिसायला जरी गाव छोटस असल तरी आधुनिकतेने संपन्न या गावाला शेकडो वर्षाचा ऐतिहासिक वारसा लाभलाय त्याचा दाखला देणा-या या गावातील पुरातन गढेगळी.
डोंगरगावच्या बस स्टॅड च्या मागच्या बाजुला अवघ्या शे-दिडशे मीटर वर गावची जुनी चावडी आहे आणि या चावडीला खेटुन दोन गढेगळी उभ्या आहेत,गढेगळी खुप जुन्या असल्याने त्यावरील शिलालेख काळाच्या ओघात नष्ट झाला असला तरी त्यावरील शिल्प व चंद्र,सुर्याची प्रतिके मात्र टिकुन आहेत.लवकर या गढेगळ संवर्धन झाल नाही तर हा अनमोल ठेवा नष्ट होउ शकतो त्यामुळे स्थानिक पातळीवर त्यांच संवर्धन होण हि काळाची गरज आहे.
गढेगळ म्हणजे काय?
एखाद्या मंदिरास दान किंवा इनाम दिला असेल तर तो कोणी भंग करू नये म्हणून शिळा उभी करुन त्यावर गाढव व स्त्री कोरलेली असते त्याला गद्देगळ म्हणतात, हि एक शापवाणी असते जो कोणी याचा गैरवापर करेल त्याला शाप मिळेल, तसेच या शिळेवर चंद्र सुर्य कोरलेले असतात म्हणजे जोपर्यंत चंद्रसुर्य आहेत तोपर्यंत याची शापवाणी अजरामर राहील तसेच ‘एखाद्या राजाचा सक्त आदेश असायचा आणि जर तो कोणी पाळला नाही तर त्याच्या घरदारावर गाढव सोडलं जाईल म्हणजेच त्याच्या घराची अब्रू म्हणजे स्री तिच्यासोबत गाढव (गाढवाएवढी इज्जत नसलेला व्यक्ती) सुद्धा अतिप्रसंग करू शकतो,आशा प्रकारची सक्त ताकीद लावलेला शिलालेख म्हणजे गढेगळ. आशा प्रकारची गढेगळ परिसरात तळेगाव ढमढेरे व पारगाव शालूमालू गावात पाहायला मिळतात
लेखन, शब्द रचना : मंगेश गावडे