मोरे गढी, करंजी | पालांडे गढी, शिरापूर –
मोरे गढी, करंजी –
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट उतरल्यावर करंजी गावात एकच बुरूज नजरेस पडतो तो बुरूज सरदार मोरे घराण्यातील गढीचा आहे. सद्यस्थितीत काहीच अवशेष शिल्लक नाहीत आणि त्यांचे वंशज पुणे – मुंबईकडे आहेत असे स्थानिक गावाकर्यांकडून समजले आणि इतिहासाबद्दल स्थानिंकांकडे उदासीनता दिसून आली. करंजी गाव नगरपासून ३० कि.मी अंतरावर आहे. जाणकारांना काही माहिती असल्यास कृपया यावर प्रकाश टाकावा.(मोरे गढी, करंजी | पालांडे गढी, शिरापूर)
पालांडे गढी, शिरापूर –
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील शिरापूर या गावात पालांडे घराण्याची मोडकळीस आलेली गढी आहे. ही गढी करंजी गावापासून १२ कि.मी अंतरावर आहे. सद्यस्थितीत गढीचे मोडकळीस आलेले प्रवेशद्वार, पडलेली तटबंदी आणि आतमध्ये पूर्ण झाडोरा झालेला आहे. ह्या गढीबद्दल मिळालेली थोडीशी माहिती गयाबाई शिंदे घराण्यातील हा वाडा नंतर मुलीच्या नातवाकडे म्हणजे लवांडे पाटील यांच्याकडे वतन आला. ह्याबद्दल आजून माहिती असल्यास जाणकारांनी प्रकाश टाकावा.
टीम – पुढची मोहीम