महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,35,541

गजासुर संहार | तांडव

By Discover Maharashtra Views: 1505 2 Min Read

गजासुर संहार | तांडव –

असुर किंवा दैत्य हे हिंदू पुराणांत वर्णिलेले लोक आहेत. असुरांकडे देवांप्रमाणेच अमानवी शक्ती असते याची कल्पना आपल्याला आहेच. अगदी सुरुवातीच्या वैदिक ग्रंथांमध्ये अग्नी, इंद्र व इतर देवांचा उल्लेख असुर (ज्ञान, शक्ती आणि प्रदेशांचे अधिपती या अर्थाने) असाच केलेला आहे. नंतरच्या वैदिक साहित्यामध्ये आणि वेदोत्तर साहित्यामध्ये देव आणि असुर हे एकमेकांचे शत्रू असून ते एकमेकांवर सतत कुरघोडी करीत असल्याचे आढळते.गजासुर.

गजासुर राक्षस म्हणजे महिषासुराचा मुलगा, तो इच्छेनुसार कधीही हत्ती होऊ शकत असे. ब्रह्मदेवाकडून कामाच्या आधीन जाणार्‍या कोणत्याही स्त्री- पुरुषाकडून तुझा वध होणार नाही असा वर मिळाल्याने आणि वडीलांच्या (महिषासुर) वधाचा बदला घेण्यासाठी म्हणून राक्षस गजासुर उन्मत्त होउन देवांना त्रास देऊ लागतो; परंतु ज्यांनी कामदेव मदनाला जाळले आणि कामशक्तीवर विजय मिळविला अशा महादेवाकडून गजासुराचा वध होतो. मरणासन्न अवस्थेत गजासुर महादेवाची स्तुती करतो आणि त्यांना विनंती करतो की, तुमच्या त्रिशुळाच्या स्पर्शाने माझी कातडी अत्यंत पवित्र झाली आहे तरी तुम्ही माझी कृत्ती (कातडी, चामडी) तुमच्या अंगावर परिधान करा; शंकर तसे करतात, तेंव्हा गजासुर महादेवास म्हणतो, आजपासून तूम्ही कृत्तीवासा या नावाने ओळखला जाणार , तेंव्हा शंकर प्रसन्न होतात आणि गजासुराला वर देतात, की मी तुझ्या शरीरात वास करुन काशी येथे कृत्तीवासेश्वर म्हणून राहीन, जे सर्वांना मुक्ती मिळविण्यासाठी उपयोगी होईल. तेव्हापासून काशी येथे कृत्तीवासेश्वर या नावाने मंदिरही होते ; दुर्दैवाने १६६९ औरंगजेबाच्या आक्रमणात त्याची पुरती नासधूस करून ते उध्वस्त केले गेले.

उपरोक्त शिल्प चोल अथवा पल्लव साम्राज्य कलेतील असावे . या शिल्पात आपल्याला गजासुराच्या (हत्तीच्या) लपलेल्या जागेत खालच्या बाजूस महादेव  जोरदारपणे ऊभे राहून नृत्य करताना निदर्शनास येतो.

शिवाचा उजवा पाय हत्तीच्या डोक्यावर आहे आणि नृत्य करण्यासाठी डावा पाय किंचित वर उचलला आहे. देवी पार्वतीबरोबर गजसंहार शिल्प सहसा कोरलेले आढळते. ती अनेकदा भयभीत असलेल्या मुद्रेत दिसते आणि शिवाच्या आसपासच असते. महत्त्वाचं म्हणजे शिवाचे एकाधिक हात शिवाच्या मुर्तींमध्ये असामान्य आहेत आणि केवळ त्याच्या लढाऊ स्वरूपात वापरले जातात.

Kiran Hanumant Mengale

Leave a Comment