गणेश मंदिर, जावळे, ता. पारनेर –
पारनेर, पराशर ऋषी यांच्या वास्तव्याने झालेले पावन झालेले गाव. पारनेर तालुक्यातील मौजे जावळे हे सोमवंशी जाहागिरदार यांच्या जहागिरच गाव. जावळे हे सोमवंशींच जहागीरच गाव असल्याने त्यांनी प्रशस्त गढी बांधली व गावच्या सुरक्षितते साठी गावाला गावकुस बांधली. या गावात येताना प्रशस्त आशा गावाच्या वेशीवरील प्रवेशद्वाराने गावात आलो की गावाच्या थोड बाहेरच्या बाजूने सिध्देश्वर नावाचा अोढा वाहातो. या अोढ्याच्या किनारी सुंदर असे घडीव दगडी बांधमाचे आठराव्या शतकाच्या पुर्वाधात बांधलेले गणेशाचे मंदिर आहे.गणेश मंदिर, जावळे.
सभामंडप व गाभारा अशा दोन भागात मंदिर बांधले गेले आहे. गाभा-याच्या प्रवेशद्वारावर गणपती व खाली किर्तिमुख अाहे. गाभार्यातील गणेशाची मुर्ति चर्तुभुज असून दोन हातात आयुध धारण केली आहेत. मुर्तिला शेंदुराचे कवच चढल्याने मुळ स्वरुपातील गणेश झाकला गेला आहे. आनेक धार्मिक कार्यक्रम येथे होत असतात.
श्रावण महिन्यात या गणेशाची स्थापना केली गेली असून बाजी प्रल्हाद यांच्या नावाचा उल्लेख सापडतो. सोमवंशी यांच्या वाड्या समोर हे मंदिर आहे. हा वाडा बांधताना हे मंदिरपण त्या सोबत बांधले गेले. अोढ्याकाठी मंदिर असल्याने परिसर रमणीय झाला आहे. शांत व निर्सगाच्या सानिध्यात गणेश मंदिर असल्याने मनाला शांतता मिळते.
संतोष चंदने, चिंचवड, पुणे.