महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,51,303

छञपती शाहू महाराज यांचे गांगवली येथिल जन्मस्थळ

By Discover Maharashtra Views: 1282 2 Min Read

छञपती शाहू महाराज यांचे गांगवली येथिल जन्मस्थळ –

छञपती संभाजी महाराज यांचै पुञ छञपती शाहु महाराज यांचा जन्म गांगवली येथिल वाड्यात झाला. मुळात इथे पुर्वी फार जुना  दगडी वाडा होता,नंतर पेशवेकाळानंतर ब्रिटीश राजवटीत कोणत्या तरी ब्रिटीश अधिकार्याने हा वाडा पाडून इथे हाँस्पीटल उभारलै.हाँस्पिटल ही सध्या पडक्या अवस्थेत आहे,पडक्या अवस्थेत अवस्थेत असले तरी वाड्याचै सर्वाचे खालचै दगडी पायाचे थर अजूनही आपल्याला दीसून येतात.वाड्याच्या समोरच रस्त्याच्या बाजूला झाडीत काही वीरगळी व समाधीस्थळै पडक्या अवस्थेत संवर्धनाच्या प्रतिक्षेत आजही सर्वाची वाट पाहत आहेत.छञपती शाहू महाराज यांचे गांगवली.

वाड्याच्या समोरच शंकराचे पुरातन असे पण नवीन डागडुजी केलेले मंदीर आहे,अस सांगितल जात की  याच मंदीरात छञपती संभाजी महाराज अन स्वराज्यातील सर्व गुप्तहेर खात्यातील लोकांचे खलबती व्हायच्या,अशा या छञपतींचै पदस्पर्श झालेल्या मंदीराचे आम्हा सारख्या भटक्यांना दर्शन लाभले ही आमच्यासारखी फार पुण्याईची गोष्ट.

शंकराच्या मंदिराशेजारी अजून एक पडवीवजा मंदिर आहे त्यात देवीची मुर्ती आहे अन मंदिरात प्रवेश करतेवेळीच एक वीरगळ आपल्या पराक्रमाची साक्ष देत आपले स्वागत करते. मंदीराच्या समोरच प्रशस्त असा  घाट असून पाण्यात उतरण्यासाठी पुरातन अशा पायर्या आहेत.घाटावरील वातावरण पाहता इथेच सर्व विधी पार पाडलै जात असावैत याचा अंदाज येतो. मंदीराच्या समोरच प्रशस्त असा  घाट असून पाण्यात उतरण्यासाठी पुरातन अशा पायर्या आहेत.घाटावरील वातावरण पाहता इथेच सर्व विधी पार पाडलै जात असावैत याचा अंदाज येतो.

माहिती साभार – सुनिल आनंदा सणस 

1 Comment