महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,09,308

दिपमाळेतील गणपती

Views: 1326
2 Min Read

दिपमाळेतील गणपती –

दिपमाळ मंदिर संकल्पनेतील एक वास्तू शिल्पाचा अविष्कार. देवाच्या मूर्ती समोर जशी नंदादिप तेवत ठेवण्याची पध्दत आहे. तशीच पध्दत मंदिरा समोर दिपमाळ लावत अासे.उत्सवाच्या काळात या दिपमाळी उजळ्यात येत असत. भारतात दिपमाळे चे विविध प्रकार पाहायला मिळतात.महाराष्ट्रात सुध्दा दिपमाळेत विविध प्रकार पाहावयाला मिळतात. पश्चिम महाराष्ट्र व कोकणात दिपमाळेत खुप फरक जाणवतो.(दिपमाळेतील गणपती)

दिपमाळ महाराष्ट्रीयन मंदिर रचनेतील खास वैशिष्ठ. उंच व वर निमुळता  होणारा स्तंभ व त्यावर अोळीने हात बसवलेले असतात. या दिपमाळ सुशोभित करण्यासाठी त्यावर आनेक शिल्प,नक्षिकाम,शुभ चिन्ह कोरलेले असतात. याच दिपमाळेत एक कमी प्रमाणात वेगळ वैशिष्ठ पाहायला  मिळते ते म्हणजे यावर कोरलेले गणेश शिल्प किवा त्यात स्थापन केलेले गणपतीची मूर्ती.

गणपती हा अद्य पुजेचा मानकरी. विघ्नांचा विनाश करून मांगल्याची स्थापना करणारा गणपती हा विघ्नेश्वर ,विघ्नर्हता अाहे. पेशवे हे गणपतीचे भक्त असल्याने त्या काळात गणपतीला खुप महत्व आले. त्या कालखंडात बांधली गेलेली मंदिरे,वाडे ,घरे यावर त्याच्या आकृती आढळतात. मंदिरांची भटकंती व अभ्यास करताना दिपमाळेत काही आढळले गणपती.त्या कालखंडात बांधली गेलेली मंदिरे,वाडे ,घरे यावर त्याच्या आकृती आढळतात. मंदिरांची भटकंती व अभ्यास करताना दिपमाळेत काही आढळले गणपती.

सदर गणपती मोरया गोसावी मंदिर  ( चिंचवड) ,संत तुकाराम महाराज मंदिर ( देहू) , सोमेश्वर मंदिर ( पाषाण), विष्णू मंदिर. (  लांझे ) हनुमान मादिर,महादेव. ( नावडी ) व कर्नाटक येथील मंदिर.

दिपमाळ उभी मंदिरी l
ऊंच भिडे जणु गगनी ll

वेध इतिहासाचा.
दिपमाळेतील गणपती भाग. १

संतोष मु चंदने ,चिंचवड ,पुणे.

Leave a Comment