महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,26,624

सातपुड्याच्या खुशीत लपलेले गायमुख आणि नागेश्वर गुफा

By Discover Maharashtra Views: 1248 3 Min Read

सातपुड्याच्या खुशीत लपलेले गायमुख आणि नागेश्वर गुफा –

गायमुख हे नाव ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर या नावाच्या उल्लेखाप्रमाणे गाईचे मुख येते , साहजिकच अनेक तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आपण गायमुख  पाहिलेले असेल गायीच्या मुखच्या आकाराच्या मूर्तीच्या तोंडातून पाणी येते ते गायमुख पण असेच गायमुख नैसर्गिकरित्या तयार झालेले आहे ते मोर्शी तालुक्यातील नंदा या गावात, हे गाव मोर्शी वरून अंबाडा मार्गे लागते, सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले हे छोटंसं गाव, पण या गावात निसर्गाची अद्भुत किमया आहे.(नागेश्वर गुफा)

या गावातून पायदळ एका नदीच्या मार्गाने पुढं गेलं की पहाडी रस्ता लागतो हा रस्ता कठीण चढाई चा असून खरपा च्या मोठाल्या दगडी शिळा या नदीत पाहून मन अगदी प्रसन्न होते, थोडी वर नजर टाकली असता मोठाल्या खरपी शिळा जनु अंगावर पडणार की काय असा भास होतो इथून पुढं अंदाजे 3 ते 4 किलोमीटर अंतर जंगलात चालत गेलो की हनुमानजीचे मंदिर लागतेय मंदिरापासून डाव्या बाजूला खाली उतरल की डोळे दिपवणारा निसर्गाचा अदभुत नजारा पाहायला मिळतो

खरं तर इतक्या दूर चालत आल्यानंतर झुळ झुळ वाहणारी गारवा देणारी नदी सोमोर पाहून कोणालाही हर्ष वाटेल , समोर नजर टाकली की नैसर्गिक रित्या तयार झालेले गाईचे मुख आपल्या दृष्टीस पडत त्यातून थंड येणार पाणी हे पाणी इतकं शीतल आहे की प्यायला नंतर मन अगदी तृप्त होते, सोबतच तेथिल दगडी शिळावर देवी ची प्रतिमा कोरली आहे बाजूलाच श्रीगणेश, महादेव आणि बऱ्याच पुरातन प्रतिमा व मूर्ती पाहायला मिळतात, हे दृश्य इतकं मनमोहक आहे की पाहणाऱ्याच्या डोळ्यांचे पारणे फिटल्या शिवाय राहणार नाही.

इथून पुन्हा हनुमान मंदिर कडे परत आलो आणि उजव्या बाजूने काही अंतर गेलो की एक नाला लागतो हा नाला पार केला की साधारणपणे 3 किलोमीटर अंतरावर एक भगवा झेंडा आणि एक मंदिराच्या आकाराची भली मोठी शिळा नजरेस पडते ही शिळा पार केली की एक मोठा त्रिशूळ लागतो आणि येथून सुरू होतो तो एक रोमांचक असा प्रवास

हीच ती नागेश्वर गुफा खरं तो दोन भल्या मोठ्या पहाडाच्या मधात ही गुफा तयार झालेली आहे , कपारी सारखी ही गुफा चढायला खूप कठीण आहे येथून पहाडाच्या भेगांच्या मधात हात आणि पाय रोवत पुढं चालावं लागत, समोर आलं की 3 मोठे गड्डे लागते या गड्ड्याला मोठी गोलाकार छिद्र आहे, नागपंचमी ला यात खूप पाणी असत व भाविक लोक या पाण्यातून एका श्वासात हा गड्डा पार करतात, असे 3 गोलाकार गड्डे आहेत व नंतर मुख्य गुहा लागते, या मुख्य गुहेट नागाची मूर्ती आहे या मूर्तीच्या वर एक छोटी कपार आहे , त्या कपारीत अतिप्राचीन अशी छोटीशी नागाची मूर्ती आहे

खरं तर सातपुड्याच्या खुशीत असे अनेक नैसर्गिक खजिने आहे पण अजूनही दुर्लक्षित अवस्थेत आहे , जमलं तर या सुंदर स्थळाला नक्की भेट द्या

प्रतीक पाथरे

Leave a Comment