गायमुख येथील 30 हजार वर्षे जुनि रॉक पेंटिंग अमरावती –
मागील भागात आपण भोरकप येथील 30 हजार वर्षे जुनी असलेली शैलचित्रे (रॉक पेंटिंग) यांची माहिती पाहिली, त्यात आपण भोरकप येथील जंगलात असणाऱ्या अश्मयुगीन चित्रे पहिली, अत्यंत रहस्यमय चित्रे त्या काळातील संस्कृतीचे दर्शन घडवते, कारण या सर्व शैलचित्रा ना तीस हजार वर्षे होऊन सुद्धा आजही त्या तितक्याच सुंदर प्रमाणात आपले अस्तित्व टिकवून आहेत अस कुठलं तंत्रज्ञान या लोकांना अवगत होत हा प्रश्न आपल्याला पडतो त्यात रेखाटलेले विविध प्राणी जे आज आपल्या भागात आढळत सुद्धा नाहित ते खरच या भागात होते का हे सर्व प्रश्न थक्क करून सोडणारे आहेत
खरं तर अमरावती जिल्ह्यातील एवढ्या जवळ असणारे हे वैभव शोधून काढणारे आणि आपल्यापर्यंत पोहोचविणारे डॉ. व्ही.टी. इंगोले , ज्ञानेश्वर दमाये आणि त्यांची टीम यांचे आभार मानावे तितके कमीच आहे, डॉ. व्ही.टी. इंगोले सर यांच्या शी चर्चा केल्या नंतर त्यांनी याच प्रकारची चित्रे गायमुख च्या जंगलात पण आहे असे सांगितले, त्यात त्यांनी सांगितले की गायमुख च्या या भागात जी चित्रे आहेत ती भोरकप येथील कालखंडा पेक्षा पुढच्या काळातली असावी असे वाटते, कारण यातील चित्रे ही प्रगत जीवनशैली चे दर्शन घडविते.
त्यांनी वर्णन केल्याप्रमाणे या चित्रात सैनिकी तुकड्यांचे चित्र आहेत, त्यात हत्तीस्वार, उंट स्वार, घोडे स्वार, पायदळ , ढाल अन तलवार घेऊन उभे असणारे सैनिक, इत्यादी रेखाटले आहेत, खरं तर हे ऐकल्यापासून उत्सुकता होती हे सर्व पाहण्यासाठी, म्हणून आम्ही तीन ते चार वेळा गायमुख ला जाऊन आलो, प्रत्येक वेळी गायमुख च अफाट सौंदर्य नवीन नवीन नयनरम्य नैसर्गिक ठिकाण दृष्ट्रीस पडत होत्या, पण आम्हाला जे हवं ते मात्र दिसत नव्हतं. या सर्वात गायमुख, नागद्वार गुफा, हे पहावयास मिळाले (यांची माहिती आणि व्हिडीओ आधीच्या लेखात दिलेली आहेत ) या भागात अस्वल, बिबट्या आदी प्राण्यांचा मुक्त वावर असतो म्हणून आम्ही प्रत्येक वेळेस सायंकाळच्या अगोदर आमची मोहीम आटोपती घेत,
या वेळी पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने पुन्हा शोध मोहीम हाती घेतली, यात स्वराज्य सेवा प्रतिष्ठान ची पूर्ण टीम, अध्यक्ष शिवा दादा काळे, उपाध्यक्ष नितीन दादा धर्माळे, आणि पूर्ण टीम असे आम्ही 12 लोक या मोहिमेला सोबत होतो, सुरवात ला आमच्या डोक्यात शैलचित्रे शोधायचे हे पक्के असल्यामुळे, बाकी ठिकाणी मन न भटकवता आम्ही फक्त आणि फक्त शैलाश्रय सदृश दिसणारे दगड शोधले, थोडी पायपीट केल्यानंतर अचानक एक शैलाश्रय दृष्टीस पडले, आणि आम्ही थक्क झालो , ज्याच्या शोधत आम्ही चार ते पाच वेळा इतकी पायपीट केली ती पहावयास मिळाली.
आम्ही आनंदाच्या सागरात वाहून इतिहासात कधी पोहचलो हे कळलेच नाही, कारण हे शोधवयास आम्ही खूप दिवसापासून प्रयत्नात होतो आज अखेर त्या काळातील जीवन शैलीचा अस्सल पुरावा त्या पाषाणाच्या कवेत सापडलं त्या काळातील संस्कृती चे दर्शन करण्याचे भाग्य आम्हा भटक्यांना लाभले.
अमरावती च्या इतक्या जवळ हे वैभव असून आम्ही अमरावती कर त्यापासून अनभिज्ञ आहोत याच दुःख आहे, मानव जातीची उत्पत्ती या भूभागावर झाली याचा अस्लल पुरावा हा आहे आदिमानवांची वस्ती स्थाने कित्येक पिढ्या येथे नांदली असणार शिकारी पासून शेती कडे वडण्याचे प्रयोग येथे झाले असणार हे सर्व चित्र डोळ्या समोर आमचे अध्यक्ष त्यांच्या वाणीतून उभे करत होते.
अमरावती पासून उत्तरेकडे जिल्ह्यातील शेवटचे गाव मानी, मध्ये प्रदेश ची सीमा याच गावात येऊन संपते या गावातुन पुढे नडा या गावात आपले वाहने ठेऊन नाडीचून प्रवाहाच्या उलट चालत गेलो की गाय मुख ह्या ठिकाणी आपणास पोहचता येत या ठिकाणी बारमाही पहाडातून झरा वाहत राहतो याच परिसरात त्या रॉक पेंटिंग व आदिमानवाच्या गुफा आहेत.
आपला
प्रतीक पाथरे