महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,25,963

घाटाचा थाट

Views: 1397
2 Min Read

घाटाचा थाट –

अनगळांचा घाट व दुस-या बाजीरावाचा घाट, क्षेत्र माहूली.

मराठेशाहीच्या दानशूरतेचा व कलासंपन्नतेचा थाट पाहायचा असेल तर नद्यांवर बांधलेले आखीवरेखीव घाट बघायलाच हवेत. उत्तरेतील काशी पासून ते दक्षिणेतील रामेश्वर पर्यंत मराठ्यांनी बांधलेले तिर्थक्षेत्रावरील चिरेबंदी घाट आजही आपले पाय पाण्यात घट्ट रोवून ऊभे आहेत. घाटाचा थाट असे घाट म्हणजे नदीचे अलंकारच जणू. कोण्या एका देशाच्या संस्कृतीचे वैभव तपासायचे असेल तर तेथील घाट पाहावे.

कृष्णा नदी काठी आनेक ठिकाणी घाट आहेत.त्यातील एक घाट म्हणजे क्षेत्र माहूलीतील  ‘अनगळांचा घाट’ पेशवाईतील सावकार अनगळ यांनी हा घाट बांधला. ह्या घाटाची रचना व बांधकाम सुरेख आहे.

ह्या घाटा विषयी एक अख्यायिका सांगितली जाते की हा सुंदर बांधलेला घाट  दुस-या बाजीरावाला फार आवडला .तेव्हा बाजीरावाने हा घाट अनगळांना तो घाट आपल्या नावाने करुन द्यायला सांगितला. मात्र अनगळांनी याला नकार दिला. तेव्हा रागाने दुस-या बाजीरावाने त्याच्याच बाजूला दुसरा घाट बांधण्याचा ‘घाट’ घातला. पण या घाटाचे बांधकाम चालू असताना बाजीराव कडून हा घाट पुर्ण झाला नाही. तो अर्धवटच सोडून गेला.त्याने या घाटाच्या पाय-या पाण्यात अशा पुढे आणल्याकी कृष्णेचा प्रवाह अनगळांच्या घाटाला भिडायचा बंद झाला. पण काही निमित्ताने हा घाट अर्धवट राहील्याने हा बाजीरावाचा घाट ‘ पळपूट्या बाजीरावाचा घाट ‘ या नावाने अोळखला जायला लागला.

हे दोन्ही घाट एकमेकाला लागून असून त्यांच्यातील वेगळापणा पाहायचा असेल तर अनगळांचा घाट व बाजीरावाचा घाट पाहण्यासाठी सातारा मधील  क्षेत्र माहूली येथे नक्की भेट द्या.

महाराष्ट्र दर्शन. इतिहासाचे साक्षीदार.

संतोष मु चंदने. चिंचवड, पुणे

Leave a Comment