महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,47,100

घोडखिंड पावन झाली

By Discover Maharashtra Views: 3789 1 Min Read

घोडखिंड पावन झाली

पन्हाळ्यावरुन राजे बांदलसेने सोबत खेळण्याकडे निघाले तेव्हा बाजी महाराजांना म्हणाले-

राजं सुखरूप जा तुम्ही खेळण्यावरी

मी घेतो हे क्रुर सैन्य अंगावरी ॥

खिंड मी लढवुन राहतो चिंता नसावी माझी

गनिम अडवुन धरितो हा बाजी अन् फुलाजी ॥

खेळण्यावर जाऊनी द्या निशानी तोफेची

मग नसेल कसली चिंता मला प्राणाची ॥

तोफेचा आवाज ऐकण्यास असतील कान आतुर

हा बाजी कधीही न होणार स्वराज्याशी फितुर ॥

माझं इमान सदैव राहील राजं तुमच्या चरणी

स्वर्गसुख मिळविल जरी आलं नशीबी मरणी ॥


राजं खिंडीतुन निघाले तोवर खिंडीत गनिम पोहोचला आणि पुढे…

युद्ध जाहले खिंड अडवी बांदल आळी-पाळी

अंग सुन्न झाले सुटती रक्तांच्या धारा कपाळी ॥

बाजींच्या सैतानी पराक्रमाने हैरान होई सिद्दी

खिंडीतला प्रत्येक मावळा बनला तेव्हा जिद्दी ॥

रक्ताचे तळे साचे अन् साचे मृतदेह खिंडीवर

बाजींची नजर अजुनही राजांच्या तोफबत्तीवर ॥

तोफ वाजली हास्य ते बाजींच्या चेहऱ्यावर खुलले

मरणाला बाजींनी अगदी हसत हसत झेलले ॥

बांदल सेनेच्या पराक्रमाची घोडखिंड साक्ष बनली

बाजींच्या रक्ताने आज ती खिंड पावन झाली ॥

सह्याद्री ढासळला कडकडती विजा आकाशी

राजंही गहिवरलं पाहुन बाजींच प्रेम या तक्ताशी ॥

माहिती साभार – मयुर खोपेकर

Leave a Comment